Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Iran War: युद्ध कधी थांबेल? इराणच्या विदेश मंत्र्यांनी ठेवली अट; इराणी सैन्याचा ट्रम्प यांना इशारा

इराणचे विदेश मंत्री अब्बास अरागची यांनी अमेरिके सोबतच्या युद्धावर विधान केले आहे . हे युद्ध तोपर्यंत सुरु राहील जोपर्यंत इराण या युद्धात आघाडी घेणार नाही . कारण हे घडल्याशिवाय आम्हाला चर्चेत , वाटाघाटीत आम्हाला हवं ते मिळवणं मुश्किल होईल .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 20, 2026 | 04:41 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:

अमेरिकेने सलग ९ व्या रात्री इराणच्या बऱ्याच भागात बॉम्बिंग केलं . त्याला प्रतिउत्तर म्हणून इराणने सुद्धा आखाती देशांवर हल्ले केले . इराणचे विदेश मंत्री अब्बास अरागची यांनी सांगितले की अमेरिके सोबतचे युद्ध हे तेव्हाच थांबेल जेव्हा आम्ही या युद्धात आघाडी घेऊ . इराणच्या सरकारी वृत्त वहिनी आईआरएनए दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की , चर्चा सुद्धा अश्या परिस्थिती झाल्या पाहिजेत जेव्हा इराण ला वाटेल कि युद्ध परिस्थिती इराणच्या बाजूने आहे . पुढे अरागची यांनी असे सांगितले कि कोणत्याही युद्धाचा अंत दोन पद्धतीने होतो एक म्हणजे दोन पैकी एक पक्ष हरतो किंवा दोन्ही देश मिळून वाटाघाटी आणि चर्चा करण्यास तयार होतात . परंतु चर्चा आणि वाटाघाटी तेव्हाच केल्या पाहिजेत जेव्हा आपण चांगल्या स्थितीत असू घाई गडबडी मध्ये चर्चा करण्याला काहीच अर्थ नाही .

याचबरोबर त्यांनी इराणच्या सुरक्षेला सगळ्यात महत्वाचे प्राधान्य असेल हे देखील सांगितले . ते म्हणाले देश आणि त्याची जनता यांचे भविष्य धोक्यात घालून चालणार नाही . घेणारा प्रत्येक निर्णय हा पूर्ण माहिती आणि अभ्यासाच्या नंतरच घेतला गेला पाहिजे . तसेच सरकारला हे सतत पाहिले पाहिजे कि युद्ध सुरु ठेवल्याने देशाला फायदा होतोय का नुकसान . जर नुकसान होत असेल तर निर्णय त्याच नुसार झाला पाहिजे . आता आम्ही काही नुकसान झेलून जगामध्ये पहिल्यापेक्षा जास्त मजबूत झालो आहोत .

  • अमेरिकेला इराणचा इशारा
  • अमेरिकेवर लावला फूट पाडण्याचा आरोप
GulfTension : आखातात पेटले पाणी युद्ध , जगाची चिंता वाढली

अमेरिकेला इराणचा इशारा

पश्चिम आशियात तणाव शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेने सोमवारी सलग नवव्या रात्री इराणवर हल्ले केले. अमेरिकेच्या सेंट्रल कमांड (सेंटकॉम) नुसार इराणच्या लष्करी कमांड सेंटर, एअर डिफेन्स सिस्टीम, मिसाईल आणि ड्रोन लॉन्च साईट्स सह अनेक लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले. वायव्य इराणमधील तब्रिज मिसाईल फील्डमध्ये आग लागल्याची बातमी आहे. ही मिसाईल फील्ड इस्लामिक रेव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) एरोस्पेस फोर्स चालवते.दुसरीकडे, सेंटकॉमने हे देखील सांगितले की उत्तर इराकमध्ये न फुटलेल्या इराणी ड्रोनला नष्ट करताना एका अमेरिकन सैनिकाचा मृत्यू झाला. आणखी एक अमेरिकन सैनिक जखमी झाला आहे, ज्याच्यावर उपचार सुरू आहेत. यासह युद्धात मारल्या गेलेल्या अमेरिकन सैनिकांची संख्या आता 17 पर्यंत पोहोचली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात दोन्ही बाजूंनी हल्ले केले जात आहेत. इराणच्या हल्ल्यात 2 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकन सैन्याने आक्रमकता वाढवली आहे.

Blackout : ’अंधार कायम राहू द्या!’ आखातात तणाव शिगेला; इराणचे भीषण हल्ले; वीज निर्मिती केंद्रही उद्ध्वस्त

अमेरिकेवर लावला फूट पाडण्याचा आरोप

इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने अमेरिकेवर लोकांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा आरोप करत इशारा दिला आहे की, कोणत्याही प्रकारच्या लष्करी कारवाईला किंवा दबावाला त्याचे उत्तर पूर्ण ताकदीने दिले जाईल.इराणच्या सरकारी वृत्तसंस्था IRNA नुसार, इराणच्या सेंट्रल खातम अल-अंबिया मुख्यालयाचे कमांडर मेजर जनरल अली अब्दुल्लाही म्हणाले की, लष्करी पातळीवर अनेक वेळा अपयश आल्यानंतर आता शत्रू लोकांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. पण इराणची अंतर्गत एकता ही या “शैतानी कटाला” हरवण्याची सर्वात मोठी ताकद आहे.अब्दुल्लाही यांनी अमेरिकेला इशारा दिला की जर त्यांनी कोणत्याही प्रकारची आक्रमक कारवाई केली, तर इराणचे सशस्त्र दल त्याला अतिशय कडक उत्तर देतील.IRNA नुसार, अब्दुल्लाही यांनी रविवारी सांगितले की अमेरिकेच्या कोणत्याही लालसेला, दबाव टाकण्याच्या प्रयत्नांना, विस्तारवादी धोरणाला किंवा हिंसक कारवाईला इराणकडून असा निर्णायक आणि नुकसान करणारा प्रतिसाद मिळेल, ज्याची किंमत “दुसऱ्या आणि तिसऱ्या लादलेल्या युद्धांपेक्षाही जास्त भारी” असेल.

 

 

Web Title: America vs iran when will the war end irans foreign minister sets a condition iranian military issues a warning to trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • Fights
  • iran
  • USA

संबंधित बातम्या

Iran Attacks US : जॉर्डनच्या सैन्यानेच केला अमेरिकेचा गेम? इराणच्या 20 तळांवरील भीषण हल्ल्याने वॉशिंग्टन हादरले; 2 सैनिक ठार
1

Iran Attacks US : जॉर्डनच्या सैन्यानेच केला अमेरिकेचा गेम? इराणच्या 20 तळांवरील भीषण हल्ल्याने वॉशिंग्टन हादरले; 2 सैनिक ठार

GulfTension : आखातात पेटले पाणी युद्ध , जगाची चिंता वाढली
2

GulfTension : आखातात पेटले पाणी युद्ध , जगाची चिंता वाढली

#Breaking News :होर्मूझ मध्ये दोन तेलाच्या जहाजावर स्फोट ? IRGC ने केला दावा
3

#Breaking News :होर्मूझ मध्ये दोन तेलाच्या जहाजावर स्फोट ? IRGC ने केला दावा

US-Iran War: इराणसमोर महासत्ता हतबल! जॉर्डनसह 5 देशांतील अमेरिकन एअरबेस उडवले; ‘पॅट्रियट’ सिस्टीम फेल, 13 सैनिक जखमी
4

US-Iran War: इराणसमोर महासत्ता हतबल! जॉर्डनसह 5 देशांतील अमेरिकन एअरबेस उडवले; ‘पॅट्रियट’ सिस्टीम फेल, 13 सैनिक जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.