फोटो सौजन्य AI
इराण आणि अमेरिकेचे युद्ध आता एकमेकांच्या आर्मी बेसवरून सामान्य नागरिकांच्या मूलभूत आणि खूपच गरजेच्या गोष्टीवर येऊन ठेपले आहे . दोन्ही देशांनी आता समुद्राच्या खाऱ्या पाण्याला गोड पाणी बनवणाऱ्या यंत्रणेला टार्गेट करून नष्ट केले आहे . अर्थात याची सुरवात अमेरिकेने केली . त्यांनी पहिला हल्ला हा इराणच्या डिसलिनेशन प्लांट्स वर केला . त्यावर उत्तर म्हणून इराणने कुवैतच्या डिसलिनेशन प्लांट्स वर हल्ला केला .
इराणच्या स्थानिक प्रशासनाने दावा केला कि अमेरिकेने हॉर्मोजगान मध्ये केलेल्या हल्ल्यात एक मोठा जल शुद्धीकरण प्रकल्प पूर्णपणे नष्ट झाला . या हल्ल्यामुळे या प्रकल्पाच्या शेजारील असणाऱ्या २० गावांमध्ये राहणारे जवळपास १० हजार पेक्षा जास्त लोक आता पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करत आहेत . इराणच्या अधिकाऱ्यांनी या हल्ल्यात फुटलेल्या पाईप लाईन्स आणि नष्ट झालेल्या प्लांट चे व्हिडीओस सोशल मीडियावर टाकले असून यावर निषेध व्यक्त केला आहे .
#Breaking News : होर्मूझ मध्ये दोन तेलाच्या जहाजावर स्फोट ? IRGC ने केला दावा
या हल्ल्यानंतर लगेचच इराणने प्रतिउत्तराची कारवाई करत कुवैतच्या डिसलिनेशन प्लांट्स वर मिसाईल सोडल्या , कुवैत सरकारने या बातमीची पुष्टी केली आहे . कुवैत सरकारने पुष्टी केली आहे , की त्यांच्या प्रमुख जलशुद्धीकरण संयंत्राला मोठे नुकसान झाले आहे. कुवैतसारख्या वाळवंटी देशासाठी हा हल्ला अत्यंत धोकादायक आहे. कारण तिथे पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यापैकी जवळपास 90 टक्के पुरवठा याच संयंत्रांवर अवलंबून आहे. पाण्याच्या स्त्रोतांवर होणारे हे हल्ले आखाती सहकार्य परिषद म्हणजेच GCC देशांसाठी अस्तित्वाचा संकट बनले आहेत.
आकडेवारीनुसार:
बहरीन: पिण्याच्या पाण्यासाठी 100% डिसॅलिनेशन प्लांट्सवर अवलंबून
कतार: 99%
ओमान: 86%
सौदी अरेबिया: 70%
इराण: फक्त 3% पाणी या संयंत्रांमधून घेतोय विषम परिस्थितीमुळे पाकिस्तान आणि कुवैत यांनी युद्ध त्वरित थांबवण्यासाठी राजनैतिक प्रयत्न वेगाने सुरू केले आहेत. स्ट्रेट ऑफ होर्मूझ च्या आसपास वाढणारा लष्करी तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आणि कुवैतचे परराष्ट्र मंत्री यांच्यात दीर्घ चर्चा झाली आहे. कोण किती पाण्यावर अवलंबून आहे हे अमेरिकेला माहिती असून देखील त्यांनी कमी अवलंबून असणाऱ्या इराणच्या प्लान्टवर हल्ला करून एक प्रकारे इराणला मदतच केली आहे . असे मिळालेल्या सूत्रांकडून माहिती मिळत आहे .






