Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Israel War : ‘अशी शक्ती बनू की शत्रू हल्ला करू शकणार नाही’; इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिका-इस्रायलला थेट इशारा

US-Israel War : अलिकडच्या काळात अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर वारंवार हल्ले झाले आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये आणि या वर्षी फेब्रुवारीमध्ये इराणवर हल्ला झाला होता. याबाबत वाचा सविस्तर अपडेट.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 17, 2026 | 05:55 PM
Masoud Pezeshkian Iran speech Iran military power missile capabilities

Masoud Pezeshkian Iran speech Iran military power missile capabilities

Follow Us
Follow Us:
  • लष्करी व तांत्रिक क्षमतेत प्रचंड वाढीचा निर्धार
  • अण्वस्त्रांचा वापर आणि विकासाचा इन्कार
  • बळाचा वापर न स्वीकारता वाटाघाटींची तयारी

पश्चिम आशियामध्ये (Middle East) अमेरिका, इस्रायल (US-Israel War) आणि इराण यांच्यातील लष्करी संघर्ष अत्यंत गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे. गेल्या काही वर्षांत इराणच्या विविध तळांवर आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर झालेले हल्ले पाहता, इराणने आता आपली संरक्षण यंत्रणा आणि लष्करी ताकद नव्या स्तरावर नेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी नुकतीच देशाच्या लष्करी आणि तांत्रिक धोरणाबाबत एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. “इराणला आपल्या प्रगत तंत्रज्ञानातील क्षमता अशी मजबूत करायची आहे, ज्यामुळे जगातील कोणताही शत्रू आमच्यावर हल्ला करण्याचे धाडस करू शकणार नाही,” असा थेट आणि स्पष्ट संदेश त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला दिला आहे.

पण क्षेपणास्त्र आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या जोरावर बनणार ‘अभेद्य ताकद’

गेल्या वर्षी जूनमध्ये आणि त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला इराणवर झालेल्या लष्करी कारवाईनंतर, तेहरानने आपल्या रणनीतीत मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी देशाच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे आणि आधुनिक तंत्रज्ञानातील कामगिरीचे कौतुक करताना स्पष्ट केले की, हे यश इराणच्या वैज्ञानिक क्षमतांचे आणि मानवी संसाधनांचे जिवंत उदाहरण आहे. तस्निम या निम-सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पेझेश्कियान यांनी एका सभेला संबोधित करताना सांगितले की, इराणने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असली तरी देशाच्या सुरक्षेसाठी आणि भविष्यासाठी सध्याच्या स्थितीपेक्षा खूप जास्त प्रगती करण्याची गरज आहे.

अणुबॉम्बचा इशारा की स्वसंरक्षणाचा प्रयत्न?

इराणच्या या वक्तव्यानंतर जागतिक स्तरावर, विशेषतः पाश्चात्य देशांमध्ये, असा प्रश्न उपस्थित केला जात होता की इराण गुप्तपणे अणुबॉम्ब बनवण्याच्या दिशेने पावले टाकत आहे का? यावर राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी सर्व शंकांचे निरसन केले. इराणचा अण्वस्त्रे विकसित करण्याचा कोणताही हेतू नाही आणि भविष्यातही तसा विचार नाही, असे त्यांनी अत्यंत ठामपणे स्पष्ट केले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Donald Trump: इराणी राजकारण अन् ‘मोहम्मद’ नाव! डोनाल्ड ट्रम्प यांची जिभ पुन्हा घसरली; मुस्लिम समुदाय आणि मानवाधिकार संघटना आक्रमक

आपल्या वक्तव्याला बळकटी देताना त्यांनी इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयतुल्य अली खामेनी यांच्या त्या प्रसिद्ध फतव्याचा (Fatwa) पुनरुच्चार केला, ज्यामध्ये अण्वस्त्रांच्या निर्मितीवर आणि वापरावर इस्लामिक तत्त्वांच्या आधारे पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अमेरिका आणि इस्रायल सातत्याने इराणवर पडद्याआडून अण्वस्त्र कार्यक्रम चालवल्याचा आरोप करत असले, तरी इराणने हा आरोप नेहमीप्रमाणे फेटाळून लावला असून आपली अण्वस्त्र निर्मितीची भूमिका ही केवळ नागरी आणि ऊर्जेच्या गरजांपुरती मर्यादित असल्याचे सांगितले आहे.

शिक्षणाच्या जोरावर मानवी संसाधनांचा विकास आणि भविष्याची पायाभरणी

आपल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी केवळ लष्करी ताकदीवरच भर दिला नाही, तर देशाच्या अंतर्गत विकासाचा आणि शिक्षणाचा विचारही समोर ठेवला. “इराणचे भविष्य हे आमच्या तरुण पिढीच्या हातात आहे. आपण सर्व मिळून एक अशी पिढी घडवली पाहिजे जी अत्यंत संवेदनशील, नैतिक, सर्जनशील आणि प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यास सक्षम असेल,” असे ते म्हणाले.

देशाला एक अभेद्य शक्ती बनवण्यासाठी केवळ शस्त्रे पुरेशी नसून, देशातील शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा घडवून आणणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सक्षम आणि पात्र नागरिक घडवण्यात शिक्षण ही पायाभूत भूमिका बजावते, त्यामुळेच इराण आपल्या वैज्ञानिक आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड गुंतवणूक करत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  India-pakistan war : ‘भारत आता शांत बसणार नाही’, राजनाथ सिंह यांच्या विधानाने सीमापार राजकारण तापले; पाकिस्तानकडूनही पलटवार

अमेरिकेचे निर्बंध आणि इस्रायलच्या हल्ल्यांवर कडक प्रहार

इराणच्या राजकीय भूमिकेचा पुनरुच्चार करताना पेझेश्कियान यांनी स्पष्ट केले की, त्यांचा देश आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही संघर्षाऐवजी वाटाघाटींसाठी (Negotiations) नेहमीच तयार आहे. मात्र, ही चर्चा समान पातळीवर आणि आदराच्या वातावरणात झाली पाहिजे. “अमेरिकेला असे वाटते की ते आमच्यावर आर्थिक निर्बंध लादुन आणि लष्करी दबाव आणून आम्हाला शरणागती पत्करण्यास भाग पाडू शकतात. परंतु, इराण कधीही कोणत्याही दादागिरीपुढे किंवा बळाच्या वापरापुढे झुकणार नाही,” असा इशारा त्यांनी वॉशिंग्टनला दिला.

अमेरिकेने इराणवर लादलेले कठोर आर्थिक निर्बंध हे मानवी हक्कांच्या चौकटीत बसणारे नाहीत, तसेच अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर झालेले अलीकडील हल्ले अत्यंत अमानवी आहेत, अशी टीका त्यांनी केली. इराण आता आपल्या लष्करी आणि क्षेपणास्त्र क्षमतेमध्ये अशी क्रांती घडवून आणण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे संपूर्ण मध्य पूर्वेत शक्ती संतुलन (Balance of Power) बदलेल आणि शत्रूला इराणवर पाऊल ठेवण्यापूर्वी शंभर वेळा विचार करावा लागेल.

Web Title: Iran president masoud pezeshkian statement on military power and nuclear weapons hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 05:55 PM

Topics:  

  • iran
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Marco Rubio: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो 200 दिग्गज उद्योगपतींसह भारत दौऱ्यावर; मुंबई आणि जामनगरवरच का आहे मुख्य भर?
1

Marco Rubio: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो 200 दिग्गज उद्योगपतींसह भारत दौऱ्यावर; मुंबई आणि जामनगरवरच का आहे मुख्य भर?

Mark Carney: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कॅनडा दौरा अन् अल्बर्टातील सार्वमत; मार्क कार्नी यांच्या मोठ्या खेळीमागे काय आहे कारण?
2

Mark Carney: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कॅनडा दौरा अन् अल्बर्टातील सार्वमत; मार्क कार्नी यांच्या मोठ्या खेळीमागे काय आहे कारण?

China Gold: जागतिक अर्थकारणात मोठी उलथापालथ! चीनने जमवला 2,410 टन सोन्याचा साठा, अमेरिकन डॉलरची चिंता का वाढली?
3

China Gold: जागतिक अर्थकारणात मोठी उलथापालथ! चीनने जमवला 2,410 टन सोन्याचा साठा, अमेरिकन डॉलरची चिंता का वाढली?

Donald Trump: इराणी राजकारण अन् ‘मोहम्मद’ नाव! डोनाल्ड ट्रम्प यांची जिभ पुन्हा घसरली; मुस्लिम समुदाय आणि मानवाधिकार संघटना आक्रमक
4

Donald Trump: इराणी राजकारण अन् ‘मोहम्मद’ नाव! डोनाल्ड ट्रम्प यांची जिभ पुन्हा घसरली; मुस्लिम समुदाय आणि मानवाधिकार संघटना आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.