American Airlines catches fore on runway at Denver Airport
वॉशिंग्टन : अमेरिकेत एक मोठी दुर्घटना होता होता टळली हे. शनिवारी (२६ जुलै) रोजी अमेरिकेच्या डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानातळावरी ही घटना घडली. अमेरिकन एअरलाइन्सची फ्लाइट AA3023 च्या लॅंडिंग गियरलामध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे टेकऑफ थांबावावे लागले. दरम्यान लॅंडिग गियरच्या बिघाडामुळे विमानाला आगा लागली. यामध्ये १७९ प्रवासी होती. परंतु त्यांना वेळेत बाहेर काढण्यात आल्याने मोठी जीवीतहानी टळली.
विमानामध्ये ६ क्रू मेंबर्ससह १७३ प्रवासी होते. सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती आहे, पण एका प्रवाशाला किरकोळ दुकापत झाली आहे. सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर प्रवाशांचे घटनास्थळी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी स्थानिक वेळेनुसार २.४५ च्या सुमारास ही घटना घडली. जेव्हा अमेरिकन एअरलाइन्सचे विमान डेन्व्हरहून मियामी आंतरराष्ट्रीय विमानातळासाठी उड्डाण घेणाक होते. यावेळी विमान धावपट्टी ३४एल वर उड्डाणास सज्ज होत होते. अचानक लॅंडिग गियरचा एक टायर निकामी झाल्याने भीषण आग लागली.
घटनेची माहिती मिळताच डेन्व्हर अग्निशमन विभाग आणि विमानतळावरील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवली. तसेच या दरम्यान बचाव पथकाने तातडीने विमानातील सर्व प्रवाशांना आपत्काली मार्गातून बाहेर काढले. सर्व प्रवासी सुखरुप आहेत.
🔴 Évacuation d’un Boeing 737 MAX 8 d’American Airlines à l’aéroport de Denver après un incendie de train d’atterrissage lors du décollage.
Les 173 passagers et les 6 membres d’équipage ont pu être évacués en toute sécurité sur la piste.
Le vol 3023 d’American Airlines était à… pic.twitter.com/xzXemRpYju
— air plus news (@airplusnews) July 26, 2025
अमेरिकन एअरलाइन्सने घटनेची पुष्टी केली असून हे विमान बोईंग ७३७ मॅक्स ८ विमान होते. प्राथमिक तापासानुसार, या विमानाच्या टायरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला. सध्या हे विमान सेवेतून काढून टाकण्यातले आहे. या घटनेची चौकशी देखील सुरु करण्यात आली हे.
या घटमेमुळे डेन्व्हर विमानतळावरील अनेक उड्डाणे दुपारी २ ते ३ पर्यंत थांबवण्यात आली होती. यामुळे ८७ उड्डाणे उशिराने झाली. संध्याकाळपर्यंत सर्व सेवा पूर्ववत करण्यात आली. यापूर्वी देखील अमेरिक एअरलाइन्सचा मार्च २०२५ मध्ये भीषण अपघात झाला होता. इंजिनच्या विघाडामुले आपत्कालीन लॅंडिग करावे लागले होते. सध्या या घटनेने अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे.