American Company BlackRock to buy Hong Kong firm's Panama Canal port stake amid Trump pressure
वॉशिंग्टन: अमेरिकेने चीनला टॅरिफ पाठोपाठ आणखी एक धक्का दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे की, पनामा कालव्यावर आता अमेरिकेचे नियंत्रण असणार आहे. अमेरिकन कंपनी ब्लॅक रॉकने पनामा कालव्याचे शेअर्स मोठ्या प्रमाणात विकत घेतले आहेत. ट्रम्प यांनी संसदेत आपल्या अधिवेशनातील भाषणात स्पष्ट केले आहे ती, ” पनामा कालवा अमेरिकन लोकांनी अमेरिकींसाठीच बांधला होता, इतरांसाठी नव्हे, परंतु इतर देश त्याचा वापर करु शकत होते.
इतक्या डॉलर्सला झाली डील
हॉंगकॉंगस्थित कंपनीने पनामा कालव्याच्या दोन प्रमुख बंदरांमधील मोठी हिस्सेदारी अमेरिकेतील ब्लॅकरॉक कंपनीला विकली आहे. ही डील 22.8 अब्जु डॉलर्सला झाली आहे. यामध्ये एकूण 23 देशांमध्ये असलेल्या 43 बंदरांचा समावेश असून यातील दोन टर्मिनल्स हे पनामा कालव्याचे आहेत. मात्र, पनामा सरकारने डीलसाठी कोणतीही अधिकृत मंजूरी दिलेली नाही.
पनामा कालव्याचे महत्त्व
मध्ये अमेरिका खंडातून वाहणार पनामा कालवा 82 किमी लांबीचा आहे. हा अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांना जोडतो. जगभरातील व्यापर आणि नौकावाहनासाठी हा कालवा अत्यंत महत्त्वाचा आहे. दरवर्षी जवळपास 14 हजार जहाजे या कालव्याद्वारे प्रवास करतात. यामध्ये कार्गो जहाजे, नैसर्गिक वायू वाहतूक करणार्या नौका आणि सैन्य जहाजांचा समावेश आहे.
पनामा कालव्याचा इतिहास
पनामा कालव्याची निर्मिती 1900 च्या सुरुवातीला झाला. 1977 पर्यंत या कालव्यावर अमेरिकेचे नियंत्रण होते. मात्र, नंतरच्या करारांनुसार हा कालवा पनामा सरकारकडे हस्तांतरित करण्यात आला. 31 डिसेंबर 1999 रोजी पनामा सरकारने या कालव्याचा पूर्ण ताबा मिळवला.
ट्रम्प यांच्या निर्णयाचा परिणाम
सध्या अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफमध्ये व्यापार युद्ध सुरु असून हे अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान ट्रम्प यांनी पनामा कालव्याच्या संबंधित केलेले हे वक्तव्य मोठ्या वादाला वाचा फोडणारे आहे. चीनकडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, ट्रम्प यांच्या या निर्णयाचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारावर होण्याची शक्यता आहे. या डीलसाठी पनामा सरकारकडून अंतिम मंजूरी मिळाल्यास पुन्हा कालव्यावर अमेरिकेचा ताबा राहिल आणि चीनसोबत युद्ध सुरु होईल.
चीनवरील टॅरिफ
डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून होणाऱ्या आयातींवर 20 टक्के कर 04 मार्चपासून लागू केला आहे. यामुळे अमेरिका आणि चीनमध्ये तीव्र व्यापर युद्ध सुरु झाले आहे. अमेरिका सरकारने चीनी वस्तूंवरील कर 10% वरुन 20% केला आहे. यामुळे या कराच्या प्रत्युत्तरात चीनने काही अमेरिकन उत्पादनांवर 10% ते 15 % पर्यंत अतिरिक्त कराची घोषणा केली आहे. यात सोयाबीन, ज्वारी, पोर्क गोमांस, जल उत्पादने, फळे, भाजीपाला आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे.