US-China Tariff War: चीनची अमेरिकेच्या टॅरिफ प्रत्युत्तरात 'इतका' कर लादण्याची घोषणा(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बिजिंग: डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिकोमधून होणाऱ्या आयातींवर 25 टक्के कर आणि चीनमधून होणाऱ्या आयातींवर 20 टक्के कर आजपासून (04 मार्च) लागू केला आहे. यामुळे अमेरिका आणि चीनमध्ये तीव्र व्यापर युद्ध सुरु झाले आहे. अमेरिका सरकारने चीनी वस्तूंवरील कर 10% वरुन 20% केला आहे. यामुळे या कराच्या प्रत्युत्तरात चीनने काही अमेरिकन उत्पादनांवर 10% ते 15 % पर्यंत अतिरिक्त कराची घोणा केली आहे. यात सोयाबीन, ज्वारी, पोर्क गोमांस, जल उत्पादने, फळे, भाजीपाला आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे.
अमेरिकन शेतकऱ्यांवर परिणाम
या नव्या टॅरिफमुळे अमेरिकन कृषी क्षेत्रांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. चीन हा अमेरिकन उत्पादनांचा मोठा ग्राहक आहे. विशेषत: सोयाबीन आणि पोर्कसाठी चीन मोठा ग्राहक असून यावर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. चीनकडून आयात होणाऱ्या वस्तूंमध्ये घट झाल्यास याचा मोठा फटका अमेरिकन शेतकऱ्यांना बसणार आहे. यामुळे उत्पादनांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा होईल. शिवाय हा तणाव दिर्घकाळ राहिला तर अमेरिकन शेतकऱ्यांना उत्पादन निर्मितीसाठी नवीन बाजारपेठांची गरज भासेल. अमेरिकेच्या कृषी क्षेत्रावर मोठे संकट निर्माण होईल.
चीनवरील परिणाम
अमेरिकेने लागून केलेल्या टॅरिफमुळे चीनच्या ग्राहकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकन उत्पादने महाग झाल्यास त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खरेदीवर होईल. चीनला देखील पर्यायी बाजारपेठा शोधाव्या लागतील. ब्राझील आणि अर्जेंटिना हे देश चीनला मोठ्या प्रमाणावर कृषी उत्पादने पुरवू शकतात. त्यामुळे अमेरिकेच्या जागी हे देश चीनच्या प्रमुख पुरवठादारांपैकी एक बनू शकतात.
जागतिक अर्थव्यवस्थवर परिणाम
अमेरिका आणि चीनमधील व्यापर युद्धाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर देखील होईल. दोन्ही देश जागतिक बाजारपेठांमध्ये मोठी भूमिका बजावतात. मात्र या व्यापर युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्ळीत होण्याची शक्यता आहे. यामुळे उत्पादन खर्च वाढून महागाई वाढेल. केवळ कृषी क्षेत्रच नव्हे तर उत्पादन, तंत्रज्ञान आणि वाहन उद्योगाला मोठा फटका बसू शकतो. या व्यापर युद्धामुळे जागतिक आर्थिक मंदीचाही धोका वाढू शकतो. अनेक देशांसाठी अमेरिका आणि चीन मोठी बाजारपेठ असून या वादाचा धक्का इतर देशांनाही बसू शकतो.