'या' देशाच्या संसदेत मोठा गदारोळ; खासदारांनी फेकेल ग्रेनेड बॉम्ब अन् सभागृहात धराचे लोट, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
युरोपीय देश सर्बियाच्या संसदेत मोठा गोंधळ उडाला आहे. मंगळवारी (04 मार्च) सर्बियाच्या संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी ग्रेनेड बॉम्ब फेकला. यामुळे संपूर्ण संसदेत धुराचे लोट पाहायला मिळाले. संपूर्ण संसद धुराने भरली होती, यामुळे अनेक खासदारांना श्वास घेण्याचा त्रास होत होता. संसदेच्या कामकाजाचे प्रक्षेपण सुरु असताना ही घटना घडली. सध्या याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यामध्ये दिसत आहे की, संसदेत काळ्या आणि गुलाबी रंगाचा धूर पसरलेला आहे.
सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ आणि निदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांना समर्थन म्हणून विरोधी पक्षांचे संसदेत आंदोलन सुरु होते. मी़डिया रिपोर्टनुसार, चार महिन्यांपूर्वी सर्बियातील मोठे शहर नोव्ही सॅडमध्ये एका स्टेशनचे छत कोसळून यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला होता.
या घटनेचा आरोप विद्यार्थ्यांनी सर्बियन सरकारवर लावला आणि भ्रष्टाचाराविरोधात निदर्शन सुरु झाले. विद्यार्थ्यांनी दावा केला आहे की, पूल कोसळल्याची घटना बांधकाम भ्रष्टाचाराचा परिणाम आहे. यामुळे या घटनेची जबाबदारी घेण्याची मागणी करण्यात आली. यामुळे सध्या सर्बियनमध्ये परिस्थिती गंभीर असून विद्यार्थ्यांची निदर्शने सुरु आहेत.
JUST IN: 🇷🇸 Chaos in Serbian parliament as opposition sets off smoke grenades and tear gas to protest against the government. pic.twitter.com/DBtOluCmSU
— BRICS News (@BRICSinfo) March 4, 2025
संसदेत वादविवाद
सर्बियन प्रोगेसिव्ह पार्टीच्या नेतृत्त्वाखाली सत्ताधारी आघाडी पक्षाने अधिवेशनच्या अजेंडाला मंजूरी दिली. यानंतर लगेचच विरोधकांनी मोठा गोंधळ सुरु केला. विरोधकांनी सभागृहात स्मोक ग्रेनेड फेकले, यामुळे संपूर्ण सभागृह काळ्या आणि गुलाबी धुराने भरले होते. या दरम्यान विरोधी पक्ष आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झटापट झाली. या झटापटीत एकाने स्मोक ग्रेनेड संसदेत फेकला. यामुळे काळा आणि गुलाबी धूर पसरला, तसेच यावेळी दोन खासदार जखमी झाले असून त्यापैकी एका गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.
पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
सर्बियच्या संसदेत मंगळवारी (04 मार्च) देशांतील विद्यापीठांसाठी निधीच वाढ करण्यासाठी कायद्याला मंजूरी देण्यात आली. याचवेळी पंतप्रधान मिलोस वुसेसिक यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली होती. पंरतु सत्ताधारी पक्षाने मांडलेल्या आजेंडामुळे विरोधी पक्ष नाराज झाला आणि त्यानंतर गोंधळ उडाला.
पंतप्रधानांनी राजीनामा का?
गेल्या वर्षी घडलेल्या पूल कोसळल्याच्या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला आणि यानंतर सरकारविरोधात तीव्र आंदोलन सुरु झाले. लोकांनी कामकाजावर जाणे बंद केले आणि पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. लोकांचा राग वाढत होता, यामुळे पंतप्रधान मिलोस वुसेसिक यांनी राजीनामा देण्याचे ठरवले.