Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेच्या धमक्यांना इराणचे कडवे उत्तर! भूमिगत मिसाईल शहराचा धक्कादायक VIDEO झाला व्हायरल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांमुळे इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढत असताना, इराणने आपल्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन घडवणारा एक धक्कादायक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 26, 2025 | 11:12 AM
Amid U.S.-Iran tensions Iran reveals underground missile city

Amid U.S.-Iran tensions Iran reveals underground missile city

Follow Us
Close
Follow Us:

तेहरान : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांमुळे इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढत असताना, इराणने आपल्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन घडवणारा एक धक्कादायक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये इराणने आपल्या ‘अंडरग्राउंड मिसाईल सिटी’चे दर्शन घडवत, भूमिगत बोगद्यांमध्ये ठेवण्यात आलेल्या प्रगत क्षेपणास्त्रांचा साठा जगासमोर उघड केला आहे.

85 सेकंदाचा लष्करी सामर्थ्याचा व्हिडिओ

इराणच्या सरकारी माध्यमांनी मंगळवारी (25 मार्च) हा 85 सेकंदांचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. या व्हिडिओमध्ये, इराणी सशस्त्र दलाचे प्रमुख जनरल मोहम्मद होसेन बगेरी आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) एरोस्पेस फोर्सचे कमांडर अमीर अली हाजीजादेह हे एका लांब बोगद्याच्या आत प्रवेश करताना आणि विविध प्रगत क्षेपणास्त्रे आणि रॉकेटच्या साठ्याची पाहणी करताना दिसत आहेत. या गुप्त ठिकाणी ठेवण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये खैबर शिकन, कादर-प्रत्येक सजील, हज कासिम, सेजिल्स, आणि पेव्ह लँड अटॅक क्रूझ मिसाईल्स यांचा समावेश आहे.

यापैकी अनेक क्षेपणास्त्र आणि शस्त्रे इराणने गेल्या वर्षी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात वापरल्याचे सांगितले जाते. या व्हिडिओच्या प्रसिद्धीमुळे अमेरिका आणि इस्रायलमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : आता संपूर्ण जगाचे इंटरनेट कनेक्शन जाणार ड्रॅगनच्या ताब्यात; चिनी शास्त्रज्ञांनी तयार केले ‘डीप सी’ केबल कटर

अमेरिकेच्या धमक्यांना इराणचे प्रत्युत्तर

हा व्हिडिओ अशा वेळी प्रसिद्ध करण्यात आला आहे, जेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नव्या अण्वस्त्र करारावर पुन्हा वाटाघाटी करण्यासाठी दोन महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. 2018 मध्ये ट्रम्प यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात स्वाक्षरी झालेल्या जुन्या अणुकरारातून अमेरिकेची माघार घेतली होती. त्यानंतर अमेरिकेने इराणवर कठोर निर्बंध लादले, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिकच तणावपूर्ण झाले.

Iran is responding to external threats by releasing a new video showcasing one of its underground missile tunnel systems, packed with missile engines, mobile launchers, and a range of advanced weaponry. The footage prominently features the Paveh cruise missile, the Ghadr-380… pic.twitter.com/ILsdlrPtQy — Basha باشا (@BashaReport) March 25, 2025

credit : social media

इराणची लष्करी सामर्थ्य वाढवण्याची योजना

IRGC-AF कमांडर अमीर अली हाजीजादेह यांनी या भूमिगत क्षेपणास्त्र शहराविषयी माहिती देताना सांगितले, “आम्ही आजपासून सुरुवात केली, तर दर आठवड्याला नवीन क्षेपणास्त्र शहराचे अनावरण करू शकतो. हा प्रकल्प पुढील दोन वर्षे सुरू राहील.” त्यांच्या या विधानावरून स्पष्ट होते की, इराण आपल्या लष्करी क्षमतांना आणखी मजबूत करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.

Post Oct 2024, 🇮🇱 clearly possesses the capability to strike any above ground target in 🇮🇷. The IRGC is therefore doubling down on underground facilities, both to decrease the effectiveness of an attack and increase the cost by preserving the tools by which Iran would respond. pic.twitter.com/B34oGoUKhO — Behnam Ben Taleblu بهنام بن طالب لو (@therealBehnamBT) March 25, 2025

credit : social media

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ट्रम्प यांचा आणखी एक धक्कादायक निर्णय; निवडणूक प्रक्रियेत मोठा बदल

जागतिक स्तरावर चिंता वाढली

इराणच्या या भूमिगत क्षेपणास्त्र शहराच्या उघडकीमुळे अमेरिका, इस्रायल आणि पश्चिमी देशांमध्ये चिंता वाढली आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, इराणने अशा प्रकारे आपल्या लष्करी क्षमतांचे प्रात्यक्षिक दाखवणे म्हणजे जागतिक स्तरावर तणाव वाढण्याची शक्यता अधिक आहे. इराणच्या भूमिगत क्षेपणास्त्र शहराच्या प्रदर्शनामुळे अमेरिका आणि त्याच्या मित्रदेशांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे मध्य-पूर्वेतील भू-राजकीय परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Amid us iran tensions iran reveals underground missile city nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2025 | 11:05 AM

Topics:  

  • America
  • international news
  • iran

संबंधित बातम्या

America Shutdown: अमेरिकेत शटडाऊन लागू, ट्रम्पच्या राष्ट्रपतीकाळात 3 वेळा सरकार ठप्प; आतातरी झुकणार का?
1

America Shutdown: अमेरिकेत शटडाऊन लागू, ट्रम्पच्या राष्ट्रपतीकाळात 3 वेळा सरकार ठप्प; आतातरी झुकणार का?

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता
2

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता

Afghanistan Internet Ban: अफगाणिस्तानचा जगाशी संपर्क तुटला! तालिबानने देशभरात इंटरनेट केले बंद; नागरिकांचे हाल
3

Afghanistan Internet Ban: अफगाणिस्तानचा जगाशी संपर्क तुटला! तालिबानने देशभरात इंटरनेट केले बंद; नागरिकांचे हाल

Bishnoi Gang as Terrorist: कॅनडा सरकारचा मोठा निर्णय! लॉरेन्स बिश्नोई टोळीला ‘दहशतवादी गट’ म्हणून घोषित
4

Bishnoi Gang as Terrorist: कॅनडा सरकारचा मोठा निर्णय! लॉरेन्स बिश्नोई टोळीला ‘दहशतवादी गट’ म्हणून घोषित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.