annabelle doll goes missing after dan rivera's death,
पुन्हा एकदा भुताटकी डॉल ॲनाबेल ची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. प्रसिद्ध पॅरानॉर्मल इनव्हेस्टिगेटर डॅन रिवेरा यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर ही डॉल सध्या चर्चेचा विषय बनत आहे. दरम्यान ही डॉल डॅन रिवेरा यांच्या मृत्यूनंतर अचानक गायब झाली आहे. यामुळे संपूर्ण जगभर सध्या दहशतीचे वातावरण पसरले आहे.
ॲडम्स काऊंटीचे कोरोनर फ्रान्सिस ड्युट्रो यांनी मंगळवारी (२२ जुलै) ही माहिती दिली. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले की, रिवेराच्या मृत्यूनंतर ही डॉल त्यांच्या खोलीतून गायब झाली आहे. या घटनेने संपूर्ण जगभर खळबळ उडाली आहे. अद्याप डॅन रिवेरा यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. सध्या त्यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टची वाट सर्वजन पाहत आहे. रिवेरा यांचा मृत्यू नेमका कसा झाला हे जाणून घेण्यासाठी सर्वांच लक्ष्य याकडे लागले आहे. अशातच ॲनाबेलच्या गायब होण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॅन रिवेरा न्यू इंग्लंड सोसायटी फॉर सायंटिफिक रिसर्चच्या सदस्यांसबोत होते. ही एक संशोधक एड लॉरन वॉरेन यांनी स्थापन केलीली संस्था आहे. डॅन रिवेरा अमेरिकन आर्मीचे रिटार्यड जवान आहे. रिवेरा ॲनाबेल डॉलसोबत संपूर्ण अमेरिकेत प्रदर्शन करत फिरत होते. परंतु पेन्सिलव्हेनियाच्या गेटिसबर्गमधील एका शो नंतर त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडाला होता. त्यांच्या मृत्यूने जगभर खळबळ उडाली होती.
पॅरानॉर्मल इनव्हेस्टिगेट एड आणि लॉरेन वॉरेन यांनी या अनाबेल डॉलबद्दल खुलासा केला होता. १९७० च्या दशकात ही डॉल डोना या नर्सिंग विद्यार्थीनाला भेट म्हणून देण्यात आली होती. यानंतर डोना आणि तिच्या रुममेटला विचित्र आणि भयावह घटनांचा अनुभव आहे. त्यानंतर परिस्थिती बिकच झाल्याने डोनाने एड आणि लॉरेन वॉरेनची मदत घेण्याचे ठरवले.
त्यानंतर विचित्र घटना ॲनाबेल डॉलमुळे होत असल्याच्या चर्चा रंगल्या. पॅरानॉर्मल इनव्हेस्टिगेटर एड आणि वॉरेन लॉरेन यांनी ही डॉल स्वत:हा हालचाली करु शकते असा दावा केला होता. ही डॉल लोकांचा पाठलाग करते असे त्यांनी म्हटले होते. एका पोलिस कर्मऱ्यावर देखील या बाहुलीने चाकूने हल्ला केला होता.
या घटनेनंतर कनेक्टिकटमधील संग्रहायलयात एका काचेच्या पेटीत या अनाबेल डॉलला बंद करुन ठेवण्यात आले होती. संग्रहायल बंद झाल्यानंतरही डॉल पेटीमध्ये कैद करुन तिथेच ठेवण्यात आली होती. या ॲनाबेल डॉलमध्ये एका लहान मुलीची आत्मा असल्याच्या चर्चा संपूर्ण जगभर रंगल्या होत्या.