ISRO आणि NASA पुन्हा येणार एकत्र; 'NISAR MISSION' ठेवणार पृथ्वीवरील हालचालींवर लक्ष
नवी दिल्ली : भारताचे आता अंतराळातून पृथ्वीच्या हालचालींवर नजर राहणार आहे. कारण भारताची अंतराळ संस्था इस्रो आणि अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने संयुक्तपणे एका मोहीमेची सुरवात केली आहे. या मोहिमेचे नाव NISAR MISSION ठेवण्यात आले आहे. निसार हा एक सॅटेलाइट उपग्रह असून या उपग्रहाचे प्रक्षेपण ३० जुलै रोजी करण्यात येणार आहे. याचे प्रक्षेपण ३० जुलै रोजी संध्याकाळी ५. ४० वाजता श्रीहरिकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून केले जाणार आहे.
निसार हा उपग्रह जीएसएलव्ही-एफ १६ रॉकेटच्या मदतीने अंतराळात प्रक्षेपित केला जाणार आहे. ७४३ किमी उंचीच्या सूर्यच्या समान कक्षेत या उपग्रहाला पाठवले जाणार आहे. ही मोहीम भारत आणि अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
निसार उपग्रहाध्ये नासाच्या एल-बॅंड आणि इस्रोच्या एस-बॅंड या दुहेर फ्रिक्वेनसीच्या सिंथेटिक अपर्चर रडार (SAR) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे हा उपग्रह २४२ किमी रुंद पट्ट्याचे अचूकपणे निरिक्षण करण्यात सक्षम आहे. इस्रो आणि नासाने दिलेल्या माहितीनुसार, दर १२ दिवसांनी हा उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागाचे हवामाना पूर्णत: निरीक्षण करणार आहे. दिवसा आणि रात्री ढगाळ वातावरणातही हे उपग्रह निरीक्षण करणार आहे.
निसार उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हालाचालींचे निरीक्षण करणार आहे. यामध्ये भूकंप, ज्वालामुखी, भूस्खलन, जमिनीवरील हालचाली, बर्फांच्या थराच्या हलाचाली, वनस्पतींची बदलाचा मागोवा घेण्यात येणार आहे. तसेच समुद्रातील बदल, जहाजांचे ठिकाण, किनार्यावरील स्थिती, चक्रीवादळांचे परीक्षण, जल स्त्रोतांचे आणि नैसर्गिक आपत्तीनंतरच्या स्थितीचे मॅपिंग निसार उपग्रहाद्वारे केली जाणार आहे.
🌍 Historic Launch Ahead: ISRO Set to Launch NISAR, a joint satellite with NASA !
🚀 On July 30, 2025 at 17:40 IST, ISRO’s GSLV-F16 will launch #NISAR, the first joint Earth observation satellite by ISRO & NASA, from Sriharikota.
🛰️ NISAR will scan the entire globe every 12… pic.twitter.com/4Mry076XSZ
— ISRO (@isro) July 21, 2025
हा उपग्रह हजार किलोग्रॅमहून अधिक वजनाचा आहे. यामध्ये १२ मीटर लां मेष रिफ्लेक्टर अँटेना बसवण्यात आला आहे. या पृथ्वीवरील अनेक सूक्ष्म घटनांचे आपल्याला निरीक्षण करता येणार आहे. हे जगातील पहिले सॅटेलाईट वेगवेळ्या बॅंडमध्ये होणार आहे. ही मोहीम इस्रो आणि नासाच्या दशकभराच्या सहकार्याचे प्रतीक आहे. यामुळे भारताला पृथ्वीविषय अचूक माहिती मिळणार आहे. यापूर्वी देखील नासा आणि इस्रोने संयुक्तपणे अनेक मोहीमेंवर काम केले आहे.