Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठा खुलासा! देश सोडण्यापूर्वी ‘असद’ने केली होती शत्रूशी हातमिळवणी; इस्त्रायलला दिली गुप्त माहिती

सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांनी बंडखोरांच्या विद्रोहानंतर देश सोडला. त्यांच्या देश सोडून गेल्यानंतर सीरिया बंडखोर गट हयात-तह रहरी गटाच्या नेतृत्त्वाखाली आला.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 19, 2024 | 12:00 PM
मोठा खुलासा! देश सोडण्यापूर्वी 'असद'ने केली होती शत्रूशी हातमिळवणी; इस्त्रायलला दिली गुप्त महिती

मोठा खुलासा! देश सोडण्यापूर्वी 'असद'ने केली होती शत्रूशी हातमिळवणी; इस्त्रायलला दिली गुप्त महिती

Follow Us
Follow Us:

दमास्कस: सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांनी बंडखोरांच्या विद्रोहानंतर देश सोडला. त्यांच्या देश सोडून गेल्यानंतर सीरिया बंडखोर गट हयात-तह रहरी गटाच्या नेतृत्त्वाखाली आला. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष असद यांचे मोठे वक्तव्य देखील समोर आले. त्यांनी देश सोडून जाण्याचा त्यांचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले. सध्या आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

प्रसिद्ध पत्रकार अब्दुलकादिर सेलवी यांचा दावा 

बशर अल-असद यांनी देश सोडण्यापूर्वी शत्रू देश इस्त्रायलला गुप्त माहिती दिल्याचा मोठा खुलासा समोर आला आहे. तुर्कीतील प्रसिद्ध पत्रकार अब्दुलकादिर सेलवी यांनी हा दावा केला आहे. त्यांनी आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, असद यांनी सीरियातील महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांबाबतची माहिती इस्त्रायलला दिली होती. यामध्ये शस्त्रागार, क्षेपणास्त्र प्रणाली आणि लढाऊ विमानांच्या स्थानांची माहिती समाविष्ट होती. या माहितीच्या आधारावर इस्त्रायलने सीरियातील अनेक ठिकाणी हवाई हल्ले केले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- India-Bangladesh Relations: भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूला बांगलादेशने केले निर्दोष मुक्त; देशाच्या सुरक्षेला धोका

इस्त्रायलसोबत गुप्त करार

अब्दुलकादिर सेलवी यांच्या म्हणण्यानुसार, बशर अल-असद यांनी देश सोडून पळून जाण्याच्या काळात स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला होता. इस्त्रायलकडून हवाई हल्ले होण्याची शक्यता टाळण्यासाठी त्यांनी गुप्त लष्करी माहिती दिल्याचे म्हटले जाते. असद यांनी इस्त्रायलला माहिती पुरवल्यानंतर इस्त्रायलने लगेचच सीरियातील महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांवर हल्ले सुरू केले.

सीरियातील परिस्थिती आणि असद यांचा पलायन

नोव्हेंबरच्या शेवटी सीरियात विद्रोह सुरू झाला होता. विद्रोही सैन्यांनी काही दिवसांतच राजधानी दमास्कसवर कब्जा केला. या परिस्थितीत बशर अल-असद यांनी देश सोडून रशियात पलायन केले, जिथे त्यांना राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आश्रय दिला. बशर अल-असद यांनी मात्र देश सोडण्याच्या निर्णयामागे कोणताही पूर्वनियोजित हेतू नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, देश सोडण्याचा निर्णय अचानक परिस्थितीमुळे घ्यावा लागला.

अब्दुलकादिर सेलवी यांच्या मते, असद यांचा इस्त्रायलसोबतचा संबंध आणि पलायनामागील इतरही अनेक गुप्त गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली नाही. विद्रोहाच्या काळातइस्त्रायलच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. इस्त्रायलने सीरियातील लष्करी ठिकाणांवर केलेले हल्ले आणि त्यावेळी असद यांच्या पलायनाची वेळ यामध्ये काही संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बशर अल-असद यांचे प्रतिपादन

बशर अल-असद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, देश सोडण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता. त्यांनी 8 डिसेंबरपर्यंत आपल्या राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतरच त्यांनी देश सोडला. मात्र, विद्रोहाच्या पार्श्वभूमीवर आणि इस्त्रायलच्या भूमिकेमुळे असद यांच्यावरील आरोप आणि संशय अधिक गडद झाले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- श्रीलंका राष्ट्रपती दिसानायके भारताला ‘असे’ काय म्हणाले यामुळे उडाली ड्रॅगनची झोप? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Web Title: Assad made a pact with the enemy country gave secrect information to israel about syria nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 11:55 AM

Topics:  

  • Israel
  • Syria
  • World news

संबंधित बातम्या

Independence Day: पाकिस्तान ते बीजिंगपर्यंत फडकला तिरंगा; जगभरात भारतीय दूतावासांमध्ये 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
1

Independence Day: पाकिस्तान ते बीजिंगपर्यंत फडकला तिरंगा; जगभरात भारतीय दूतावासांमध्ये 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Indonesia Earthquake: ‘सर्वत्र किंकाळ्या आणि शोक…’ इंडोनेशियात भूकंपाचा कहर, 38 जणांचा मृत्यू, 2,000 बेघर, पहा VIDEO
2

Indonesia Earthquake: ‘सर्वत्र किंकाळ्या आणि शोक…’ इंडोनेशियात भूकंपाचा कहर, 38 जणांचा मृत्यू, 2,000 बेघर, पहा VIDEO

Giorgia Meloni vs Gen Z: इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्यावर का भडकली तरुण पिढी? 2027 मध्ये सत्तापालटाची शक्यता
3

Giorgia Meloni vs Gen Z: इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्यावर का भडकली तरुण पिढी? 2027 मध्ये सत्तापालटाची शक्यता

Rohingya Crisis: म्यानमार सरकारची मोठी घोषणा; बांगलादेशातून 3 लाखांहून अधिक रोहिंग्या मुस्लिमांची स्वदेशी वापसी होणार
4

Rohingya Crisis: म्यानमार सरकारची मोठी घोषणा; बांगलादेशातून 3 लाखांहून अधिक रोहिंग्या मुस्लिमांची स्वदेशी वापसी होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.