Attack on Trump again, Suspicious movement outside the White House causes panic
वॉशिंग्टन : एक मोठी खळबळजनक बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला आहे. मंगळवारी (१५ जुलै) रोजी ही घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच सुरक्षा यंत्रणा अलर्टमोडवर आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हाईट हाऊसच्या नॉर्थ लॉनवर एका अज्ञात व्यक्तीने अचानक हल्ला केला. यावेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पेनसिल्व्हेनियातील एका कार्यक्रमासाठी निघाले होते. या घटनेने संपूर्ण व्हाऊट हाऊसमध्ये खळबळ उडाली आहे. शिवाय सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले असून परिसरात बंदोबस्त करण्यात आला आहे.
याच वेळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सुरक्षा यंत्रणांनी मीडियाला तात्काळ ब्रीफींग रुममध्ये पाठवले. तसेच सर्वांची तपासणी करण्यात आली. आसपासच्या परिसरात अधिक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे. सर्व तपासणी झाल्यानंतर सर्व पत्रकारांना बाहेर सोडण्यात आले. या घटनेने अमेरिकन राजकारणात मोठा गोंधळ उडाला आहे.
सुरक्षा यंत्रणांना तपासात एक मोबाईल फोन व्हाईट हाऊसच्या कुंपणावरुन फेकल्याचे दिसून आहे. दरम्यान व्हाईट हाऊसच्या सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी या घटनेवर एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात सांगण्यात आले आहे की, व्हाईट हाऊसच्या कुंपणावरुन एक मोबाईल फोन फेकण्यात आला होता, परंतु त्यानंतर सर्व सुरक्षा बंदोबस्त कडक करण्यात आला आहे.
यापूर्वी ट्रम्प यांच्यावर २०२४ च्या अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचारादरम्यान हल्ला झाला होता. त्यावेळी ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता, परंतु गोळी त्यांच्या कानाला लागून गेली होती. यानंतर हल्लेखोर थॉमस क्रूसला जागीच ठर करण्यात आले होते. यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता, तर दोघे गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेतील सहा सीक्रेट सर्व्हिस एजंट्सना निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या बेजबाबदारपणामुळे हल्ला झाल्या असल्याचे सांगून त्यांना निलंबित केले आहे.
सध्या पुन्हा एकदा ट्रम्पवरील हल्ल्याने अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे. तसेच व्हाईट हाऊसच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. सध्या मंगळवारी घडलेल्या हल्ल्याचा तपास सुरु आहे.