नाटोचे महासचिल मार्क रुटो (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नाटोचे महासचिल मार्क रुटो यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी भारत, चीन आणि ब्राझील यांसारख्या देशांना कडक इशारा दिला आहे. त्यांनी या देशांना रशियाशी व्यापार संबंध ठेवल्यास मुख:त तेल आणि वायू क्षेत्रात कायम संबंध ठेवल्यास १००% दुय्यम कर लागू करण्याची धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, रशियाने युक्रेनसोबतच्या शांतता चर्चेला गांभीर्याने न घेतल्यास त्यांच्या तेल खरेदी करणाऱ्या देशांवरही कडक निर्बंध लादले जातील.
अमेरिकेन सिनेटर्ससोबतच्या बैठकीदरम्यान रुटो यांनी हे खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिका रशियावर कठोर निर्बंध लादण्याचा विचार करत आहे. मार्क रुटो यांनी आक्रमक शब्दांत स्पष्ट केले आहे की, या देशांनी रशियावर शांतता चर्चेसाठी दबाव आणावा, अन्यथा त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागले. मग, तुम्ही भारताचे पंतप्रधान असे किंवा चीनचे राष्ट्रपती असा परंतु याचा परिणाम तुम्हालाही भोगावा लागेल, अशा शब्दांत रुटो यांनी कडक इशारा दिला आहे.
मार्क रुटो यांचे हे विधान अशा वेळी आले आहे , जेव्हा दुसरीकडे ट्रम्प युक्रेनला नव्या शस्त्रास्त्रांची मदत पुरवणार आहे. ट्रम्प यांनीही, रशियाला ५० दिवसांत युद्ध थांबवण्याचा संदेश दिला आहे. असे न केल्यास रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर १००% टॅरिफ लागू केले जाईल असे ट्रम्प यांनीही स्पष्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका सिनेटर्स ५००% टॅरिफ लादण्याचा प्रस्ताव मांडत आहेत.
यपूर्वी देखील अमेरिका आणि युरोपियन युनियनने रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. पंरतु यावेळी नाटो प्रमुखांनी केलेल्या थेट विधानामुळे भारत, चीन आणि ब्राझील देशांची चिंता वाढली आहे. यामुळे या देशांच्या परराष्ट्र धोरणामध्ये मोठे समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
भारत आणि चीन रशियाचे सर्वात मोठे तेल ग्राहक आहे. मीडिया रिपोर्टनुसार, डिसेंबदर २०२२ ते २०२५ दरम्यान रशियाच्या तेल निर्यातीचा ३८% भाग भारताने खरेदी केला आहे, तर चीनने ४७% वाटा खरेदी केला आहे. २०२४ मध्ये बारताने १.८ ते २.०७ मिलियन बॅरल तेल रशियाकडून आयात केले असून याची किंमत सुमारे ५२.७३ अब्ज डॉलर्स आहे. परंतु नाटोच्या थेट इशाऱ्यामुळे भारत आणि चीनसारख्या देशांसमोर धोरणात्क आव्हाने उभी राहिली आहेत. रशियाशी भारत आणि चीनचे दीर्घकालीन संबंध आहेत.