Awami League calls for protests in Feb demanding to quash criminal cases against Sheikh Hasina
ढाका: बांगलादेशात सध्या मोठी राजकीय उलथापालथ सुरु आहे. बांंगलादेशात येत्या काही काळात निवडणुका होणार असून यामध्ये शेख हसीना आणि त्यांच्या आवामी लीगला निवडणुका लढवून दिल्या जाणार नसल्याचे युनूस सरकारने म्हटले आहे. यामुळे अवामी लीगल संत्पत झाला आहे. आता आणखी एक माहिती समोर आली आहे. आवामी लीग 6 फेब्रुवारीपासून देशव्यापी आंदोलन, बंद आणि रास्ता रोको करणार असल्याची घोषणा केली आहे.
आंदोलनाचे कारण
या आंदोलनात शेख हसीनांवरील गुन्हेगारी खटले मागे घेण्याची मागणी करण्यात येणार आहे. या आंदोलनाचा उद्देश केवळ शेख हसीना यांच्यावरील आरोप हटवणे नसून, बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचारांविरोधात आवाज उठवणे आहे.
आवामी लीगने चार प्रमुख मागण्या केल्या आहेत-
अवामी लीगचे देशव्यापी आंदोलन
मंगळवारी रात्री पक्षाने आपल्या आंदोलनाची रूपरेषा स्पष्ट केली. पक्षाच्या नेत्यांनी इशारा दिला की, जर प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाला अडथळा आणला, तर अधिक तीव्र आंदोलन करण्यात जाईल. मागील वर्षी ५ ऑगस्टला झालेल्या सत्तापालटानंतर हे अवामी लीगचे पहिले मोठे आंदोलन असणार आहे.
भारताविरोधात बांगलादेशचा आरोप
दरम्यान, बांगलादेशच्या गृह व्यवहार सल्लागार मोहम्मद जहांगीर आलम चौधरी यांनी बुधवारी भारतावर गंभीर आरोप लावले. त्यांनी शेख हसीना यांच्या कार्यकाळात भारतासोबत झालेल्या सर्व असमान करारांवर पुनर्विचार केला जाईल असे म्हटले आहे.
बांगलादेशच्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मते, भारताकडून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी केली जाते. चौधरी यांनी म्हटले आहे की, सीमेवर निहत्थ्या बांगलादेशी नागरिकांवर गोळीबार केल्याचा आरोपही भारतावर केला आहे.
सीमा सुरक्षा आणि जलसंपत्तीवर चर्चा
याशिवाय, बांगलादेशने सीमावर्ती भागातील समस्या सोडवण्यासाठी भारतासोबत चर्चा करण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये सीमा उल्लंघन, घुसखोरी, शस्त्रास्त्र आणि स्फोटकांची तस्करी, नद्यांचे पाणी वाटप, आणि रहीमपूर कालव्याचा मुद्दा महत्त्वाचा असेल. या सर्व घटनांमुळे भारत-बांगलादेश संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.