Baba Venga's terrifying prediction for humans
बाबा वेंगा कोण आहेत, तसेच त्यांनी केलेल्या भविष्यवाणींबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाहीच. त्यांनी अनेक भविष्यवाणी केल्या आहेत, ज्या आतापर्यंत खऱ्या झाल्या आहेत. त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी अनेक भाकितं केली होती. कधी, कुठे कोणत्या देशावर काय संकट येणार ही सर्व भाकित आतापर्यंत खरी ठरलेली आहेत. दरम्यान त्यांच्या आणखी एका भविष्यवाणीने सर्वांना मोठा धक्का दिला आहे. त्यांनी 3797 मध्ये मानवांना पृथ्वी सोडून जावी लागणार असल्याचे म्हटले होते. यामागचे कारण म्हणजे 3797 पर्यंत पृथ्वी राहण्यायोग्य राहणार नाही असे बाबा वेंगा यांनी म्हटले होते.
दरम्यान यापूर्वी बाबा वेंगा यांनी केल्या 9/11 वर्ल्ड ट्रेड सेंटवरील हल्ला, राजकुमारी डायनाचा मृत्यू, सोव्हिएत युनियनचे पतन आणि चीन महासत्ता बनणार असल्याची सर्व भाकिते खरी ठरली. त्यांच्या या भविष्यवाण्या अगदी रहस्यमयी होत्या. त्यांना यामुळे पाश्चात्य देशांमध्ये बाल्कन नोस्ट्राडेमस म्हणून संबोधले जाते. बालपणी एका अपघातात त्यांनी आपली दृष्टी गमावली होती. असा दावा केल्या जातो की, त्यानंतरच त्यांना भविष्य पाहण्याची शक्ती मिळाली. यानंतर त्यांनी अनेक भाकिते केली.
बाबा वेंगाच्या या भविष्यवाण्या भिती निर्माण करणाऱ्या असल्या तरी याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत योग्य मानवाच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावले उचलण्याची गरज आहे.