Dire Wolves Return: 'गेम ऑफ थ्रोन्स'मध्ये दाखवलेली 'ही' प्रजाती अवतरली प्रत्यक्षात; 12 हजार वर्षांनंतर झाला तीन पिल्लांचा जन्म (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: अमेरिकेच्या डलास येथे 12 हजार 500 वर्षापूर्वी नामशेष झालेल्या लांडग्यांच्या डायर वुल्फ या प्राजाती पुन्हा जिवंत झाल्या आहेत. डॅलस्थित बायोटेक कंपनी कोलॉसल बायोसायन्सेनेस च्या शास्त्रज्ञांनची या प्रजातीला पुन्हा जीवनदान दिले आहे. ही जगातील पहिली यशस्वी डि-एक्सटिंक्ट प्रजाती असल्याचे म्हटले जात आहे. डायरल वुल्फ प्रजातीचे शावक नुकतेच जन्माला आले असून रेमस, रोम्युलस आणि खलेसी अशी त्यांची नावे ठेवण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शास्त्रज्ञांनी जुना DNA, क्लोनिंग व जिन एडिटिंग तंत्रज्ञानाचा वापर करुन ग्रे वुल्फच्या जीनमध्ये बदल केले. यातून तीन डायर वुल्फ पिल्लांचा जन्म झाली. ग्रे वुल्फ ही प्रजाती डायर वुल्फच्या सर्वात जवळची प्रजाती मानली जाते. यामुळे नवीन तयार झालेली प्रजाती खऱ्या डायरे वुल्फसारखीच एक हायब्रीड प्रजाती आहे.
‘De-extinction’ startup Colossal Biosciences claims it has brought dire wolves back from extinction.
The company said it has created three dire wolves, a species popularised by the fantasy series Game of Thrones but not seen on Earth in more than 12,000 years. pic.twitter.com/qCLLxrhGpr
— The National (@TheNationalNews) April 7, 2025
उत्तर अमेरिकेत सापडणारी एक मोठी, बलाढ्य शिकारी प्रजाती म्हणून डायरे वुल्फ (Aenocyon dirus) होती. ही प्रजाती ग्रे वुल्फपेक्षा अधिक मोठी, रुंद डोके, जाड पांढरट फर आणि मजबूत जबड्यांसह ओळकली जात होती. या वुल्पवर आधारित एक पात्र “गेम ऑफ थ्रोन्स” मध्ये दाखवण्यात आले होते.
शास्त्रज्ञांनी 13 हजार वर्षे जुने दात आणि 72 हजार वर्षे जुन्या कवटीपासून DNA घेतला. यातून संपूर्ण जनुकीय विश्लेषण केले आणि नंतर त्याचे आधुनिक लांडग्याच्या DNA मध्ये रुपांतर केले. यामधून त्यांनी खास वैशिष्ट्ये असणारी जीन शोधले. नंतर CRISPR तंत्रज्ञानाने ग्रे वुल्फच्या पेशींमध्ये 10 जनुकांमध्ये बदल केले. यातून तयार झालेल्या पेशींपासून क्लोनिंग तयार केले आणि तीन शावक जन्माला आली.
जन्माला आलेल्या लांडग्याच्या तीन पिल्लांपैकी एक नर पिल्लाचा जन्म 1 ऑक्टोबर 2024 रोजी, एका मादी पिल्लाचा जन्म 30 जाेनवारी 2025 रोजी झाला. या पिल्लांना 2 हजार एकरच्या संरक्षित क्षेत्रात ठेवण्यात आले आहे. सुरक्षाबंदोबस्त कडक करण्यात आला आहे. शास्त्रज्ञांचे उद्दिष्ट केवळ लुप्त जालेल्या प्रजातींची निर्मिती करण नव्हे तर तंत्रज्ञानाचा वापर करुन संकटग्रस्त प्रजातींना मदत करणे आहे. परंतु अनेक तज्ज्ञांनी यावर टीका केली आहे. अनेकांनी हे नैसर्गिक प्रकृतीच्या विरोधात मोठे पाऊल असल्याचे म्हटले आहे. यामुळे अनेक नैर्गिक नियम मोडले गेले आहेत.