ढाका: सध्या भारत आणि बांगलादेशातील संबंध गेल्या काही काळापासून ताणले गेले आहेत. दोन्ही देशांतील संबंध बिकट परिस्थितीवर पोहोचले सध्या भारत आणि बांगलादेश संबंध गेल्या काही काळापासून ताणले गेले आहेत. दोन्ही देशांतील संबंध बिकट परिस्थितीवर पोहोचले असून अनेकांनी बांगलादेशला संबंध सुधारण्याचा सल्ला दिला.
दरम्यान अमेरिकेने देखील दोन्ही देशांनी मिळून शांततेच्या मार्ग काढावा असे म्हटले आहे. अलीकडे काही घडामोडींमुळे बांगलादेशातील अंतरिम सरकारचा दृष्टीकोन बदलत असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच भारताच्या परराष्ट्र सचिवांनी बांगलादेशची भेट घेऊन परस्पर हितसंबंध प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
बांगलादेशचे भारताला मैत्रीचे संकेत
विक्रम मिसरी यांनी म्हटले होते की, बांगलादेश अंतरिम सरकारने भारतासह सर्व देशांशी समानतेच्या आणि परस्पर आदरावर आधारित संबंध प्रस्थापित करावेत. विक्रम मिसरी यांच्या या इच्छेवर बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे परराष्ट्र सल्लागार मोहम्मद तौहीद हुसैन यांनी एका बैठकीत या बदलत्या धोरणावर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, बांगलादेशने भारताला मैत्रीचे संकेत दिले असून, संबंध परस्पर हितावर आधारित असावेत, असे सरकारचे मत आहे.
तसेच, बांगलादेश सर्व देशांशी आदर आणि समानतेच्या तत्त्वांवर आधारित संबंध मजबूत करू इच्छित आहे.हुसैन यांनी असेही स्पष्ट केले की, अंतरिम सरकारच्या उद्दिष्टांमध्ये निष्पक्ष आणि पारदर्शक प्रशासन व्यवस्था प्रस्थापित करणे, विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या चिंतेचा विचार करणे, आणि आगामी निवडणुकीसाठी आवश्यक सुधारणा करणे हे समाविष्ट आहे.
बांगलादेशातील सध्याची राजकीय परिस्थिती
बांगलादेशमध्ये मागील वर्षी झालेल्या निवडणुकांमध्ये शेख हसीना यांच्या अवामी लीगला बहुमत मिळाले होते. पण, त्यानंतर निवडणुकांवर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. तसेच, देशभरात विद्यार्थी आंदोलन आणि हिंसाचार उफाळला. या परिस्थितीत शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला. त्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले.
मात्र, नागरिकांमध्ये ही प्रश्न उपस्थित होत आहेत की, देशाची सत्ता जनतेने निवडलेल्या सरकारकडे कधी हस्तांतरित होईल. यावर परराष्ट्र सल्लागार तौहीद हुसैन यांनी सांगितले की, सरकार सध्या काही सुधारणा करत आहे. या सुधारणा पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीद्वारे सत्तांतरण केले जाईल.
भारत आणि बांगलादेशातील संबंधांमध्ये सकारात्मक बदल?
सध्या बांगलादेशाकडे भारताने मैत्रीपूर्ण संकेत दिल्यानंकर बांगलादेशानेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मोहम्मद युनूसच्या अंतरिम सराकारच्या नेतृत्वाखालील सरकारने भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध विकसित करण्यासाठी नवीन धोरण आखले आहे. भारत-बांगलादेश संबंधांमध्ये ही बदलती भूमिका दोन्ही देशांसाठी नवे पर्व ठरू शकते. यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारत आणि बांगलादेश यांच्या सकारात्मक बदल होतील का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.