फोटो सौजन्य: सोशल मीडिया
ढाका: सध्या भारत आणि बांगलादेशातील तणाव वाढत चालला आहे. बांगलादेशाच्या आणखी एका निर्णयामुळे भारताला सतर्क राहण्याची गरज आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेश सरकराने पाकिस्तान नागरिकांना असलेल्या व्हिसा नियमांमधील काही अटी काढून टाकल्या आहेत. यामुळे ISI एजंटचा पाकिस्तानमध्ये प्रवेश करणे सोपे झाले असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. युनूस सरकारच्या या निर्णयाने भारतीय सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहण्याची गरज असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे.
बांगलादेश पाकिस्तान वाढते संबंध भारताला धोका
इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेश अंकरिम सरकारचा हा निर्णय पाकिस्तान आणि बांगलादेशाती वाढत्या संबंधांचा इशारा असल्याचे प्रादेशिक विश्लेषकांनी म्हटले आहे. याचा परिणाम थेट भारतावर होऊ शकतो असे त्यांचे म्हणणे आहे. संरक्षण आणि धोरणात्मक तज्ज्ञ निवृत्त कर्नल अजय रैना यांनी म्हटले आहे की, बांगलादेशातील सत्ता परिवर्तन पाकिस्तानच्या ISI च्या माध्यमातून अमेरिकेच्या डीपी स्टेटने केले असल्याची माहिती समोर आली आहे.
याशिवाय कर्नल अजय यांनी असेही म्हटले आहे की, जर बांगलादेश अंतरिम सरकार आणि पाकिस्तानच्या योजनेनुसांर घडले तर लवकरच बांगलादेश पूर्वीसारखा पाकिस्तान होण्याची शक्यता आहे. बांगलादेशात कट्टरवादी गट अधिक सक्रिय होऊ लागल्याचे त्यांनी म्हटले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, भारताच्या ईशान्येकडील भागांत दहशतवादी गट घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतील. कारण पाकिस्तानशी संलग्न बांगलादेशातील अंबरखानामध्ये अनेक गट एकत्र आल्याची माहिती समोर आली आहे.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
भारताची चिंता का वाढत आहे?
दुसरीकडे बांगलादेशात अनेक राजकीय बदल होत आहेत. हिंदू आणि अवामी लीग समर्थकांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. यामुळे जमातीशी संबंधित अधिकाऱ्यांना पक्षात जागा मिळू शकेल. बांगलादेशाच्या नव्या राजकीय बदलांमुळे धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही तत्त्वे धोक्यात आल्याचे तज्ञांनी म्हटेल आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, बांगलादेशाने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसाच्या तरतुदींमध्ये केलेल्या बदलांमुळे भारतासाठी धोका निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे भारताची स्थिती अस्थिर होण्याची शक्यता आहे.
ढाका आणि इस्लामाबाद यांच्या गुप्तचर सहकार्य वाढत चालले आहे. भारताच्या ईशान्येकडी भागांतील राज्य, विशेषत: आसाम, अंतर्गत अशांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने घुसखोरी आणि कट्टरतावादी कारवायांसाठी महत्तवाचे ठिकाण ठरु शकते. बांगलादेशातील बदलांवर भारतीय सुरक्षा यंत्रणा सतत लक्ष ठेवून आहेत आणि सतर्क आहेत. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील वाढता समन्वय हे भारतासमोरील धोरणात्मक आव्हान असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.