Baloch Liberation Army killed ISI agent Babul Hasni
इस्लामाबाद: सध्या पाकिस्तानमध्ये अंतर्गत संघर्ष सुरु आहे. पाकिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मी आणि लष्करी सैन्यात संघर्ष सुरु आहे. बलुच लिबरेशन आर्मीने स्वातंत्र्याची मागणी केली आहे. तसेच पाकिस्तानवर पूर्ण नियंत्रम मिळवण्याच्या तयारी देखील बलुच आर्मीने केली आहे. याअंतर्गत बलुच लिबरेशन आर्मीची पाकिस्तानमध्ये कारवाई देखील सुरु आहे.
नुकतेच बलुच आर्मीच्या स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन्स स्क्वॉडने क्वेटामध्ये मोठी ल्ष्करी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान पाकिस्तानी लष्कराचा प्रमुख एजंट बाबुल मुहम्मद हसनी याला ठार मारले असल्याचे बीएलएने म्हटले आहे.बीएलएच्या गुप्तचर विभाग झिराबने याची माहिती दिली.
बीएलएच्या आर्मीने क्वेटामधील बरुरू रोडवर एका थांब्यावर पाकिस्तानी लष्कराचा एजंट मुहम्मद हसनीच्या वाहनाला लक्ष्य केले. मुहम्मद हसीनीच्या वाहनावर बॉम्ब हल्ला करण्यात आला. या हल्ल्या हसनीचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे साथीदार गंभीर जखमी झाल्याचे बीएलएने म्हटले आहे.
बाबुल मोहम्मद हसनी हा पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा प्रमुख एसजंट होता. मुहम्मद हसनीचे जिहादी स्क्वॉडशी थेट संबंध होते. त्याने कलाटमध्ये एका सशस्त्र टोळीचे नेतृत्व केले होते. तसेच कलाटच्या आसपासच्या भागातही तो सक्रिय होता. मुहम्मह हसनीने बलुच तरुणांन जबरदस्तीने गायब केल्याचा आरोप बीएलएच्या आर्मीने केला होता.
तसेच बीएलएने महट्ल होते की, मुहम्मद हसीनेने पाकिस्तान लष्करासोबत मिळून बलुचांविरोधात कारवाया केला होता. यामुळे त्याला ठार करण्यात आले.
सध्या पाकिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मी पाकिस्तान लष्कराविरोधात सतत कारवाई करत आहे. बीएलएने पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील सुरब शहरावर देखील नियंत्रण मिळवले असल्याचे म्हटले आहे. दिवसेंदिवस पाकिस्तानी लष्कराविरोधात बीएलएच्या कारवायांमध्ये वाढ होत आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये लवकरच बलुच लिबरेशन आर्मीचे राज्य असेल असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
बलुच लिबरेशन आर्मीने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यची मागणी केली आहे. गेल्या काही काळापासून पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. यामुळे बलुचिस्तानमधील नागरिकांनी पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तान लष्कराविरोधात बंड पुकारला आहे.
याशिवाय पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात देखील पाकिस्तानी सरकार आणि लष्कराविरोधात बंड पुकारला जात आहे. तसेच पाकिस्तानच्या सिंध प्रांतात देखील समान परिस्थिती उत्पन्न झाली आहे. पाकिस्तानचे शाहबाज सरकार आणि असीम मुनीर यांच्या नेतृत्त्वाखालील लष्करामध्ये सध्या चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.