चीनने आता नेपाळच्या राजकारणात खुपसले डोके; 'या' खतरनाक सल्ल्यामुळे भारताची डोकेदुखी वाढणार? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बिजिंग: बांगलादेश आणि पाकिस्ताननंतर आता नेपाळमध्येही चीनने राजकीय हलचाली सुरु केल्या आहेत. सध्या नेपाळच्या माजी राष्ट्रपती बिजिंग दौऱ्यावर गेल्या आहेत. त्यांनी रविवारी (१ जून) चीनला भेट दिली. यावेळी चीनने त्यांच्याकडे एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. यावेळी चीनने विद्या देवी भंडारी यांना नेपाळमधील सर्व कम्युनिस्ट पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी दिली आहे. चीनच्या म्हणण्यानुसार, नेपाळमधील सर्व कम्युनिस्ट पक्ष एकत्र आले तरच नेपाळचा विकास होईल.
राष्ट्रपतीपद सोडल्यानंतर दोन वर्षांनी विद्या देवी भंडारी पुन्हा एकदा राजकारणात येत आहेत. विद्या देवी भंडारी नेपाळचे पंतप्रधान के.पी शर्मा ओली यांच्या पक्षाच्या आहे. 2027 मध्ये नेपाळमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यामध्ये नवीन सरकार स्थापन होणार आहे. भंडारी यांना पुढील पंतप्रधान होण्याची इच्छा आहे. याच अनुषंगाने भंडारी यांनी बिजिंगला भेट दिली असल्याचे म्हटले जात आहे. नेपाळ हा भारतासह चीनचाही शेजारी देश आहे. नेपाळणध्ये कम्युनिस्टॉ विचारसरमीचा प्रभाव जास्त आहे. यामुळे येथील अंतर्गत राजकारणामध्ये चीनला अधिक पसंती मिळत आहे.
नेपाळमध्ये सध्या तीन प्रमुख कम्युनिस्ट पक्ष आहे. के. पी. ओली शर्मा यांचा सीपीएन(यूएमएल) पक्ष, दुसरा पुष्पकमल दहल प्रचंड यांचे माओवादी केंद्र आणि माधव कुमार नेपाळ यांचे सीपीएनम युनिफाइड पक्ष आहेत.
माधव कुमार आणि प्रचंड यांनी नेपाळच्या पंतप्रधान पदाची भूमिका बजावली आहे. दोन्ही नेत्यांना राजकारणातचील दिग्गज नेते म्हणून ओळखले जाते.
सध्या नेपाळमधील सीपीएन(यूएमएल) आणि कॉंग्रस पक्षाचे सरकार आहे.
कॉंग्रेसचा कल भारताकडे आहे. यामुळे नेपाळमध्ये चीनचे काही हेतू पूर्ण होण्यास अडथळ येत आहे. केपी शर्मा ओली यांच्या राजवटीत चीनचा बीआरआय प्रकल्प देखील मंदावला आहे.
तसेच नेपाळमध्ये सध्या राजेशाही समर्थनार्थ तीव्र आंदोलन सुरु आहे. यामुळे कम्युनिस्ट पक्षामध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. राजेशाही चळवळीमुळे भविष्यात नेपाळमध्ये उजव्या विचारसरणीच्या पक्षाचे वर्चस्व वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नेपाळमध्ये चीनला आपला हेतू साध्य करणे कठी होऊ शकते.
पण नेपाळमध्ये तीन कम्युनिस्टपक्ष एकत्र आले तर याठिकाणी कोणताही दुसरा पक्ष सत्तेत येणार नाही. यामुळे चीन सहजपण नेपाळमधील सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु यामुळे भारतविरोधी खेळी देखील रचली जाण्याची शक्यता आहे. आता भारत याकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो हे पाहणे महत्त्वाचे ठरमार आहे.