
Muhammad Yunus
बांगलादेशमध्ये गेल्या वर्षी २०२४ मध्ये शेख हसीना सरकार कोसळले. यानंतर युनूस यांच्या नेतृत्त्वाखाली अंतरिम सरकारची स्थापना झाली. मात्र या सरकारने भारतविरोेधी धोरण स्वीकारले होते. युनूस सरकार सत्तेत आल्यापासून दोन्ही देशांचे संबंध अधिक बिघडत गेले. भारतावर अनेक गंभीर आरोपही बांगलादेशने केले. शिवाय बांगलादेशमधील हिंदू अल्पसंख्याकांवरील हल्ल्यामुळे देखील दोन्ही देशांतील वातावरण तापले होते. यामुळे बांगलदेशने आणि भारताने देखील व्हिसा सेवा एकमेकांसाठी स्थगित केल्या होत्या.
दरम्यान आता युनूस सरकारने आपली चाल बदलली असून अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार सालेहुद्दीन अहमद यांनी भारताशी संबंध सुधारण्यासाठी बांगलादेश प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, युनूस भारतातील विविध घटकांशी संवाद साधत आहेत. तसेच भारतासोबत पुन्हा एकदा राजनैतिक संबंध सुधारण्यावरही त्यांनी भर दिला आहे. परंतु सध्या भारताच्या अधिकृत प्रतिनिधींशी कोणताही संपर्क झाला नसल्याचेही त्यांनी म्हटले.
सध्या बांगलादेश भारत आणि पाकिस्तानकडून एकणू १ लाख टन तांदूळ खरेदी करणार आहे. भारताकडून नृन-बासमती तांदूळ कमी किमतीत मिळत असल्याने याचा बांगलादेशला मोठा फायदा होत आहे. यातून युनूस यांचे दुटप्पी निकष स्पष्ट होतात. कारण एकीकडे बांगलादेशने व्हिसा सेवा स्थगित केल्या असून दुसरीकडे व्यापाराच्या माध्यमातून संबंध सुधारण्याची भाषा युनूस सरकार करत आहे. युनूस सरकारच्या या दुटप्पी चेहऱ्याकडे धोका म्हणून पाहिले जात आहे.
गेल्या काही काळात बांगलादेशने भारतविरोधी अनेक वादग्रस्त राजकीय विधाने केली आहे. मात्र ही विधाने आर्थिक धोरणांपेक्षा पूर्णपमे वेगळी असवल्याचे स्पष्ट होते. भारताशी व्यापार आणि आर्थिक सहकार्य हे राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे बांगलादेश सरकारचे मत आहे. यावरुन बांगलादेश भारताशी पूर्णपणे संबंध तोडणार नाही, हे दिसून येते.