Bangladesh-China Relations News China's visit to Bangladesh to inspect Lalmonirhat air base.
ढाका: एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चिनी अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळाने अलवीकडेच बांगलादेशला भेट दिली आहे. या भेटीमुळे भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे. चीनी अधिकाऱ्यांच्या या बैठकीचा उद्देश बांदलादेशमधील लालमोनिरहाट येथे एक हवाई तळ बांधण्यात येते आहे. या हवाई तळाची पाहणी करण्यासाठी चिनी अधिकारी बांगलादेशला गले होते. चीनचे हे हवाई भारताच्या सिलगुडी म्हणजेच चिकननेक जवळ आहे.
भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनी अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भारतीय सीमेजवळ अनेक भागांना भेट दिली आहे. मुख्यत: चिकन नेक ला भेट दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बांगलादेशचे युनूस सरकारकडे लालमोनिपहाटमझ्ये विमानतळ बांधण्यासाठी चीनकडे मदत मागितली होती. हे तळ दुसऱ्या महायुद्धनंतर वाईट स्थितीत आहे. भारतीय सीमेपासून हे तळ केवळ २० किलोमीटर अंतरावर आहे. बांगलादेशने या प्रकल्पाची माहिती मार्चमध्ये दिली होती. तेव्हापासून भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच यापूर्वीही युनूस यांनी भारताच्या दिल्लीला ईशान्य भागाशी जोडणाऱ्या चिकन नेकवर ताबा मिळवण्याची अनेक विधाने केली आहे.
भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनी अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भारतीय सीमेजवळ अनेक भागांना भेट दिली आहे. मुख्यत: चिकन नेक ला भेट दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बांगलादेशचे युनूस सरकारकडे लालमोनिपहाटमझ्ये विमानतळ बांधण्यासाठी चीनकडे मदत मागितली होती. हे तळ दुसऱ्या महायुद्धनंतर वाईट स्थितीत आहे. भारतीय सीमेपासून हे तळ केवळ २० किलोमीटर अंतरावर आहे.
बांगलादेशच्या या हवाई तळावर पाकिस्तान किंवा चीनला प्रवेश मिळाल्यास हे भारतासाठी धोक्याची बाब आहे. यापूर्वीही पाकिस्तान आणि चीनने बांगलादेशच्या माध्यमातून ईशान्येकडील भागात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यना चीन अधिकाऱ्यांची बांगलादेशसोबतची ही बैठक अशा वेळी होता आहे, जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. तसेच चीनने आपले पूर्ण समर्थन पाकला दर्शवले आहे. यामुळे या भागातील लष्करी हालचालींवर भारताचे विशेष लक्ष आहे. युनूस नेमकी काय योजना आखत आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भारताला ईशान्येकडील राज्यांशी जोडमारा सिलगुडी कॉरिडॉर हा एकच मार्ग आहे. यामुळे ईशान्येकडील भारताच्या चिकन नेकच्या भागात चीन आणि बांगलादेशची उपस्थिती अत्यंत धोकादायक मानली जात आहे. बांगलादेशचे मोहम्मद युनूस यांचे सरकार सत्तेत आल्यापासून चीनने बांगलादेशला शस्त्रांची मदत केली आहे. तसेच बांगलादेशच्या लष्करी पायाभूत सुविधांचे पुनर्बांधणीत मदत केली आहे. अलीकडच्या काळात बांगलादेश आणि चीनमधील वाढते संबंध भारतासाठी धोकादायक ठरत आहेत.