झेलेन्स्की अभिमानाने दावा करत होते की पुतिन यांच्या घरावर हल्ला झाला नाही, पण आता रशियाने सादर केले पुरावे ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Russia presents evidence of Putin residence attack : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला (Russia-Ukraine War) आता चार वर्षे पूर्ण होत आली आहेत, पण शांततेऐवजी युद्धाची ठिणगी अधिकच वेगाने पसरताना दिसत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या निवासस्थानावर युक्रेनने ड्रोन हल्ला केल्याचा खळबळजनक दावा रशियाने केला होता. सुरुवातीला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी हे आरोप फेटाळून लावत पुराव्यांची मागणी केली होती. मात्र, आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रशियाने या हल्ल्याचे ठोस पुरावे जगासमोर सादर करून खळबळ उडवून दिली आहे.
रशियन संरक्षण मंत्रालयाने एक व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये रशियाच्या वायव्येकडील नोव्हगोरोड प्रदेशातील बर्फाच्छादित जंगलात एका पडलेल्या आणि खराब झालेल्या ड्रोनचे अवशेष दिसत आहेत. रशियाचा दावा आहे की, २८-२९ डिसेंबरच्या रात्री युक्रेनने पुतिन यांच्या अत्यंत सुरक्षित आणि गुप्त ‘वलदाई’ (Valdai) निवासस्थानाला लक्ष्य करण्यासाठी तब्बल ९१ ड्रोन पाठवले होते. रशियाच्या अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणेने हे सर्व ड्रोन हवेतच नष्ट केल्याने मोठा अनर्थ टळला, असे रशियाने म्हटले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘रशियाच्या विजयानेच युद्ध संपेल…’ नवीन वर्षाच्या पहाटे Putin यांची डरकाळी; Ukraine युद्धाबाबत जगाला दिला ‘हा’ मोठा इशारा
क्रेमलिनने या घटनेला केवळ लष्करी कारवाई न म्हणता, पुतिन यांच्यावरील ‘वैयक्तिक आणि दहशतवादी हल्ला’ घोषित केले आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी युक्रेनला निर्वाणीचा इशारा दिला आहे. लावरोव्ह म्हणाले की, “या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी युक्रेनमधील महत्त्वाची ठिकाणे आम्ही आधीच निवडली आहेत आणि लवकरच चोख प्रत्युत्तर दिले जाईल.” रशियाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे युक्रेनमधील प्रमुख शहरांवर पुन्हा एकदा क्षेपणास्त्रांचा पाऊस पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
🚨⚡️Zelensky, who publicly denies attacking Putin’s residence, either is unaware of the reality or is deliberately lying. The agency provided indisputable evidence of the Ukrainian Armed Forces’ attack: ▪️ Wreckage of downed drones, including those carrying warheads loaded with… pic.twitter.com/S1NDKNx0Kj — RussiaNews 🇷🇺 (@mog_russEN) December 31, 2025
credit : social media and Twitter
दुसरीकडे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाचे हे पुरावे खोटे असल्याचे म्हटले आहे. रशिया स्वतःच असे हल्ले घडवून आणत आहे किंवा खोट्या कथा रचत आहे, असा दावा कीव्हने केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा तणाव अशा वेळी वाढला आहे जेव्हा अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन शांतता करार ९५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला होता. युरोपीय देशांच्या मदतीने सुरू असलेल्या या शांतता प्रक्रियेत आता पुतिन यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा मुद्दा मोठा अडथळा ठरू शकतो.
🇷🇺🇺🇦 – RUSSIA | UKRAINE 🔴 The Russian Ministry of Defense has released a video it claims shows the debris of a Ukrainian drone intercepted while heading toward the residence of Vladimir Putin in Valdai. 🔎 However, nighttime conditions and weather limitations make it… pic.twitter.com/PIW2aicE11 — NEXUSx (@Nexus_osintx) December 31, 2025
credit : social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 2026 Predictions: रशिया पुन्हा बनणार जगाचा ‘बॉस; अमेरिका भारतासमोर झुकणार? पाहा काय सांगतेय भविष्याची नांदी
रशियाने सादर केलेले हे पुरावे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरले आहेत. जर हे ड्रोन खरोखरच युक्रेनचे असल्याचे सिद्ध झाले, तर झेलेन्स्की यांची जागतिक स्तरावर अडचण होऊ शकते. तसेच, रशियाकडून होणारा संभाव्य पलटवार या युद्धाला एका अशा वळणावर नेऊन ठेवेल जिथून परत येणे कठीण होईल. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जगाला शांततेऐवजी युद्धाच्या ज्वाला अधिक तीव्र होताना दिसत आहेत.
Ans: रशियाने व्हिडिओ फुटेज आणि ड्रोनचे अवशेष जारी केले आहेत, जे नोव्हगोरोड प्रदेशातील बर्फाच्छादित जंगलात सापडले आहेत.
Ans: हा हल्ला २८-२९ डिसेंबर २०२५ च्या रात्री रशियाच्या वायव्येकडील नोव्हगोरोड प्रदेशातील पुतिन यांच्या वलदाई निवासस्थानावर झाला होता.
Ans: युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून रशिया खोटे पुरावे सादर करत असल्याचा दावा केला आहे.






