Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Violence : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी रक्ताचा सडा! हिंदू तरुणाची निघृण हत्या, युनूस सरकारचे दावे फोल?

Bangladesh Elections : बांगलादेशात सध्या संससदीय निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. याच वेळ एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. निवडणुकीच्या एक दिवस आधी एका हिंदू तरुणाची निघृणपणे हत्या करण्यात आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 12, 2026 | 10:24 AM
Bangladesh Pre Election Violence

Bangladesh Pre Election Violence

Follow Us
Follow Us:
  • बांगलादेशात निवडणुकीपूर्वी हिंदूचा बळी
  • तरुणाची हात-पाय बांधून निघृणपणे हत्या
  • युनूस सरकारचे दावे फोल?
Bangladesh Pre Election Violence : ढाका : बांगलादेशात (Bangladesh) आज सार्वत्रिक निवडणुका पार पडत आहे. या निवडणुकांसाठी ५२ राजकीय पक्ष आणि २००० उमेदवार उभे राहिले आहेत. पण या निवडणुकीला सुरुवात होण्यापूर्वी बांगलादेशात एक धक्कादायक घटना घडली ज्याने हिंदू समुदायाला हादरवून टाकले आहे. निवडणुकीच्या एक दिवस आधी बुधवारी एका हिंदू तरुणाची निघृणपणे हत्या झाली आहे. या घटनेने जागतिक स्तरावर खळबळ उडाली असून बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नवी सत्ता स्थापन झाल्यावर बांगलादेशातील हिंदू सुरक्षित राहतीला का असा प्रश्न केला जात आहे.

Bangladesh Elections : बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू; ५१ राजकीय पक्षांमध्ये सत्तेसाठी लढत

नेमकं काय आहे प्रकरण?

मीडिया रिपोर्टनुसार, बांगलादेशच्या चम्पारा येथील मौलवी बाजार परिसरात एक २८ वर्षी हिंदू तरुण रतन साहूकारची निघृणपणे हत्या करण्यात आली आहे. रतन साहूकार हा चम्पारा भागातील चहाच्या मळ्यात कामगार होता.  मात्र बुधवारी (११ फेब्रुवारी) सकाळी चहाच्या मळ्यात अस्थाव्यस्थ अवस्थेत त्याचा मृतदेह  सापडला. यावेळी त्याच्या मृतहेदाचे हात-पाय दोरीने घट्ट बांधलेले होते.  त्याच्या शरीरावर धारदार शस्त्रांनी वार केले होता. सध्या त्याचा मृतदेह ढाका पोलिसांच्या ताब्यात असून ही घटना निवडणुक हिंसाचाराशी जोडली जात आहे. या घटनेचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

अल्संख्याक हिंदू समुदायात घबराट

सध्या या घटनेमुळे बांगलादेशातील अल्संख्याक हिंदुंमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. बांगलादेशात माजी पंतप्रधान हसीना यांच्या पतनानंतर हिंसाचारात (Bangladesh Violence) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आतापर्यंत अनेकवेळा हिंदूंना लक्ष करण्यात आले असून गेल्या दोन महिन्यांमध्ये ५ हून अधिक हिंदू तरुणांच्या हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी  अल्संख्याकांच्या सुरक्षेचे आश्वासन दिले होते. मात्र मतदानाच्या काही तास आधीच हिंदू तरुणाची हत्या झाल्याने त्यांचे आश्वासन पोकळ ठरले आहे.

तज्ज्ञांच्या मते, निवडणुकीच्या वातावरणात मतदानासाठी कट्टरपंथींयाकडून हिंदूंना घाबरवण्यासाठी ही हत्या करण्यात आली आहे. यामुळे बांगलादेश अंतरिम सरकारच्या आश्वासनांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्या मतदान सुरु आहे, मात्र या घटनेने बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षित भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा शोध घेत असून ही हत्या नेमकी मतदारांना धमकवण्यासाठी करण्यात आली की आणखी कोणत्या हेतूने याचा शोध घेतला जात आहे.

Bangladesh Elections : ५१ पक्ष, २००० उमेदवार…, शेख हसीना पतनानंतर पहिली लढत, भारतासाठी ठरणार निर्णायक?

💡

Frequently Asked Questions

  • Que: बांगलादेशात पुन्हा कोणाची हत्या करण्यात आली?

    Ans: बांगलादेशात निवडणुकीच्या एक दिवस आधी बुधवारी एका हिंदू तरुणाची निघृणपणे हत्या झाली आहे.

  • Que: बांगलादेशात हिंदू तरुणाची हत्या कधी आणि कुठे करण्यात आली?

    Ans: बांगलादेशच्या चम्पारा येथील मौलवी बाजार परिसरात एक २८ वर्षी हिंदू तरुण रतन साहूकारची ११ फेब्रुवारी २०२६ रोजी निवडणुकीच्या एकदिवस आधी निघृणपणे हत्या करण्यात आली आहे.

  • Que: या घटनेचा बांगलादेशातील हिंदू समुदायवर काय परिणाम झाला आहे?

    Ans: बांगलादेशात निवडणुकीच्या एक दिवस आधी झालेल्या हिंदू तरुणाच्या हत्येने अल्पसंख्याक हिंदू समुदायात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदुंच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Web Title: Bangladesh elections 2026 violence hindu youth killed muhammad yunus government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 10:24 AM

Topics:  

  • Bangladesh
  • Bangladesh violence
  • Muhammad Yunus
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.