Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Measles vaccine : बांगलादेशात गोवराचा उद्रेक, 32 हजारांहून अधिक संशयित रुग्ण, भारताबाबत काय परिस्थिती?

Measles vaccine : बांगलादेशात लसीच्या कमतरतेमुळे गोवरचा संसर्ग वेगाने पसरत आहे. यात आतापर्यंत शेकडो जणांचा मृत्यू झाल्याचेही सांगण्यात येत आहे. याचा परिणाम बांगलादेशच्या आजूबाजूला असणाऱ्या राष्ट्रांच्या वैद्यकीय सेवेवरही पडणार आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 08, 2026 | 06:23 PM
Measles vaccine : बांगलादेशात गोवराचा उद्रेक, 32 हजारांहून अधिक संशयित रुग्ण, भारताबाबत काय परिस्थिती?

Measles vaccine : बांगलादेशात गोवराचा उद्रेक, 32 हजारांहून अधिक संशयित रुग्ण, भारताबाबत काय परिस्थिती?

Follow Us
Follow Us:
  • बांगलादेशात गोवराचे 32 हजारांहून अधिक संशयित रुग्ण
  • गोवरामुळे 250 पेक्षा जास्त मृत्यू झाल्याचा दावा
  • लसीकरणातील घसरणीमुळे गोवर वाढल्याचे तज्ज्ञांचे मत
बांगलादेशात गोवराचा (Measles vaccine) उद्रेक गंभीर झाला असून, मार्चच्या मध्यापासून आतापर्यंत 32 हजारांहून अधिक संशयित रुग्ण आढळले आहेत. या काळात 250 पेक्षा अधिक मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. लस खरेदी प्रक्रियेत झालेला विलंब आणि लसीकरणाच्या कमी झालेल्या कव्हरेजमुळे परिस्थिती आणखी गंभीर झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सुदैवाने हा संसर्ग सध्या बांगलादेशातील काही जिल्ह्यांमध्ये सुरू असून सीमावर्ती भागापर्यंत तो पोहचला नाहीय. त्यामुळे भारतात त्याचा कोणताच परिणाम जाणवत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

बांगलादेशच्या ‘द डेली स्टार’मधील वृत्तानुसार, सप्टेंबर 2025 मध्ये अंतरिम सरकारने युनिसेफच्या माध्यमातून लस खरेदी थांबवून खुल्या निविदा प्रक्रियेचा पर्याय स्वीकारला. मात्र, या प्रक्रियेला विलंब झाल्याने लसींच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आणि नियमित लसीकरण मोहिमेला फटका बसला.

‘सायन्स डॉट ओआरजी’च्या अहवालाचा हवाला देत ‘द डेली स्टार’ने म्हटले आहे की, लस खरेदी थांबवल्याने नियमित लसीकरणात अडथळा निर्माण होऊन गोवरचा पसार होण्याचा धोका आधीच व्यक्त करण्यात आला होता. यापूर्वी बांगलादेश सरकार गोवर आणि रुबेला लसीच्या पुरवठ्यासाठी मोठ्या प्रमाणात युनिसेफवर अवलंबून होते.

जानेवारीपासूनच गोवरचा उद्रेक

या आजाराचा संसर्ग जानेवारीमध्ये म्यानमार सीमेजवळील रोहिंग्या निर्वासितांच्या छावण्यांमध्ये सुरू झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर गोवराचा संसर्ग देशातील 64 पैकी 58 जिल्ह्यांमध्ये पोहोचला. 21 हजारांहून अधिक रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

सरकारी आकडेवारीनुसार, 2025 मध्ये गोवराची लस घेण्यासाठी पात्र असलेल्या मुलांपैकी केवळ 59 टक्के मुलांचे लसीकरण झाले होते. मात्र, नंतर ही आकडेवारी अधिकृत वेबसाइटवरून हटवण्यात आल्याचे वृत्तात म्हटले आहे. निविदा प्रक्रियेतील प्रशासकीय विलंबामुळे लसींचा तुटवडा निर्माण झाला आणि नियमित लसीकरणावर परिणाम झाला.

IEDCRचे माजी प्रिन्सिपल सायंटिस्ट एएसएम आलमगीर यांनी 2024 पासून व्हिटॅमिन ए वितरण मोहिमेला आलेल्या अपयशामुळे मुलांची रोगप्रतिकारक क्षमता आणखी कमी झाल्याचे म्हटले आहे.

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?

युनिसेफच्या माध्यमातून पुन्हा लस खरेदी

DGHSमधील रोग नियंत्रण विभागाचे माजी संचालक बे-नजीर अहमद यांच्या मते, बांगलादेशने एप्रिलमध्ये युनिसेफच्या माध्यमातून पुन्हा लस खरेदी सुरू केली. तसेच आपत्कालीन लसीकरण मोहीमही राबवण्यात आली. मात्र, गोवराचा फैलाव ज्या वेगाने होत आहे, ते पाहता परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी वेळ लागू शकतो.

दरम्यान, लस खरेदीतील कथित अनियमितता आणि अपयशाबाबत सुप्रीम कोर्टातील वकील बिप्लब कुमार दास यांनी भ्रष्टाचारविरोधी आयोगाकडे तक्रार दाखल केल्याचे वृत्त आहे.

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट

बांगलादेशच्या ‘कव्हरेज इव्हॅल्युएशन सर्व्हे 2026’ नुसार, गोवर-रुबेलाच्या पहिल्या डोसचे लसीकरण 2019 मधील 88.6 टक्क्यांवरून 2023 मध्ये 86 टक्क्यांवर आले. दुसऱ्या डोसचे कव्हरेजही याच काळात 89 टक्क्यांवरून 80.7 टक्क्यांवर घसरले. गोवराचा प्रसार रोखण्यासाठी साधारणपणे 95 टक्क्यांपर्यंत लसीकरण कव्हरेज आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

Web Title: Bangladesh measles vaccine shortage cases deaths rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 06:23 PM

Topics:  

  • Bangaldesh
  • unicef
  • Vaccine

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.