Bangladesh News Bangladesh political crisis know the details
ढाका: बांगलादेशात गेल्या काही काळापासून राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. सध्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरु आहे. शेख हसीना यांच्या सत्तापालटापासून बांगलादेशात गोंधळ सुरु असून पुन्हा एकदा मोठे राजकीय संकट उभे राहिले आहे. गेल्या काही काळात बांगलादेशमध्ये अशांतता पसरलेली आहे. कोटाविरोधी विद्यार्थी आंदोलन, शेख हसीन सरकारचे सत्तापालट, अल्पसंख्याकीय हिंदू आणणि बौद्ध धर्मातील लोकांवर अत्याचार अशा अनेक गोष्टी बांगलादेशात घडून गेल्या आहेत. आज आपण शेख हसीनांच्या सत्तापालटापासून ते युनूस यांच्या राजीनाम्यापर्यंत घडलेल्या घटनांवर एक नजर टाकणार आहोत.
जुलै २०२४ मध्ये बांगलादेशमधील विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरीच्या कोटा प्रणाली विरोधात आंदोलन सुरु केली होते. या कोटा प्रणालीत बांगलादेशातील स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ३०% आरक्षण मिळत असे. परंतु यामुळे इतर मुले वंचित राहत होती. यामुळे या विरोधात आंदोलने सुरू झाली. सुरुवातीला ही निदर्शने अहिंसक मार्गाने सुरु होती. परंतु सरकारने विद्यार्थ्यांवर लाठीमार केला आणि या अहिंसक आंदोलनाचे रुपांतर हिंसक संघर्षात झाले.
दरम्यान युनूस राजकीय पक्षांच्या राजकारण सुधारण्यासाठी निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी सत्तेत आले होते, परंतु अद्याप बांगलादेशात निवडणुका झालेल्या नाही. तसेच लोकांकडून सत्ता बदलण्यासाठी आणि व्यवस्था सुधारण्याची मागणी केली जात आहे. परंतु युनूस यांच्या अंतिरम सरकारने यावर कोणतेही कार्य सुरु केलेले नाही. युनूस यांनी अनेक प्रमुख क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अंतर्गत राजकारणामुळे ते अपयशी ठरले. दरम्यान युनूस यांच्यावर दबाव वाढत असून बांगलादेशच्या बीएनपी पार्टीने त्यांना विरोध केला आहे. तसेच निवडणुका लवकर घेण्याची मागणी केली जात आहे.