Bangladesh's Islamic fundamentalists threaten Mohammad Yunus
ढाका: सध्या संपूर्ण जगाचे लक्ष भारतातील जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याकडे आहे. याच दरम्यान प्रत्येक देशाचे अंतर्गत वाद देखील सुरु आहेत. दरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे. बांगलादेशमधील कट्टरपंथी इस्लामिक गट हिफाजत-ए-इस्लामने युनूस सरकारला धमकी दिली आहे. कट्टरपंथींनी म्हटले आहे की, महिला सुरक्षा व्यवहार आयोगात सुधारणा करण्यात आल्या नाही तर अंतरिम सरकारचे मोहम्मद युनूस यांचेही हाल शेख हसीयांच्यासारखे होतील. या धमकीमुळे बांगलादेशात मोठी खळबळ उडाली आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशात विविध निदर्शने आणि मोर्चे सुरु आहेत. इस्लामिक संघटना हिफाजतने सरकारला इशारा दिला आहे. तसेच आयोगाच्या प्रस्तावांना इस्लामविरोधी म्हटले आहे. या निदर्शनांमध्ये आयोग रद्द करण्याची मागणी केली जात आहे. इस्लामिक संघटनेने 3 मे रोजी ढाक्याच्या सुहरावर्दी येथे मोठ्या मोर्चाची घोषणा केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, शुक्रवारी बांगलादेशच्या चितगावच्या अंदरकिल भागामध्ये इस्लामिक संघटनेने मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. तसेच नारायणगंजच्या चशारा शहीद मीनार येथे झालेल्या सभेत इस्लामिक संघटना हिफाजत चे संयुक्त महासचिव मामुनुव यांनी भाषण केले. त्यांनी म्हटले की, महिला सुधार आयोगाने देशीतील महिलांवरी अन्यायाचे मुख्य कारण आणि धार्मिक सामाजिक नियम सांगून इस्लामिक कायद्याचा अपमान केला आहे.
तसेच आणखी एका खिलाफत मजलिस या कट्टरपंथी इस्लामिक संघटनेने पक्षाच्या महासचिव अहमद अब्दुर कादर यांनी, आयोगाला सर्व धर्मांच्या महिलांसाठी एकसामान कौटुंबिक कायदा करण्याचे सुटवले आहेय यामध्ये त्यांनी विवाह, घटस्फोट, वारसा आणि भरणपोषण याचा समावेश आहे. त्यांनी या थेट कुराण आणि सुन्नहाच्या विरोधात ठरवले आणि तीव्र निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, इस्लामविरोधी कारवाय स्वीकारल्या जाणार नाहीत.
तसेच महिला सुधार आयोगाने अलीकडे 433 शिफारसींचा अहवाल सादर केला होता. या अहवालावर बांगलादेशातील कट्टरपंथी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच सरकारचडे त्वरित अहवाल फेटाळून लावण्याची मागणी केली आहे. सध्या हबीगंजच्या नौगाव येथे बांगलादेश नॅशनल पार्टी (BNP) आणि अवामी लीग समर्थकांमध्ये वर्चस्वासाठी संघर्ष झाला. या हिंसाचारात 50 हून अधिक लोक जखमी झाले असून, त्यातील पाच जणांची स्थिती गंभीर आहे. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.