Bangladesh Plane Crash India, China, Singapore sends medical aid to Bangladesh for accident victims
बिजिंग : बांगलादेशात २१ जुलै रोजी भीषण विमान दुर्घटना घडली. बांगलादेशच्या हवाई दलाचे जेट ढाकातील एका शाळेवर कोसळले. या अपघातात ३२ जणांचा मृत्यू झाला असून शेकडोहून अधिक लोक जखणी आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयाता उपचार सुरु आहे. याच दरम्यान चीनच्या दूतावासेन एक निवेदन जारी केले आहे. चीनीने विमान दुर्घटनेत जखमी झालेल्यांसाठी एक वैद्यकीय पथक पाठवणार असल्याचे म्हटले आहे.
निवेदनात सांगण्यात आले आहे की, अंतरिम सरकारच्या निवेदनानुसार, चिनीचे आपत्कालीन वैद्यकीय पथर गुरुवारी २४ जुलै रोजी ढाक्यात पोहोचेल. हे पथक जखमींवर उपचार करले. या वैद्यकीय पथकात पाच वर्न स्पेशलिस्ट डॉक्टर आणि अनेक पारिचारिकांचा समावेश आहे. चीनचे आपत्कालीन वैद्यकीय पथक राष्ट्रीय बर्न आणि प्लास्टिक सर्जरी संस्थेलाही भेट देणार आहे.
बुधावरी रात्री भारत आणि सिंगापूरने देखील बांगलादेशला मदत पाठवली आहे. भारताचे आणि सिंगापूर एक वैद्यकीय पथक अपघातात आगीत भाजले गेलेलल्या लोकांसाठी ढाकाला पाठवण्यात आले आहे. सध्या जखमींवर रुग्णालयात उपाचर सुरु आहेत.
बांगलादेशच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातानंतर मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. आतापर्यंत केवळ एकाच कुटुंबाने डीएने नमुना दिला आहे. ओळख प्रक्रिया जलद करण्यासाठी नागरिकांना मदतीचे, तसेच डीएनए देण्याचे आवाहन केले जात आहे. बांगलादेशच्या सीआयडी प्रयोगशालेत डीएनए प्रोफाइलिंग सुरु आहे.
सध्या या अपघातामुळे बांगलादेशात तीव्र संतापाचे वातावरण आहे. मोहम्मद युनूस यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्यान या निदर्शनांना रोखण्यासाठी पोलिसांना कारवाईचे आदेश देण्यात आले होते. यावेळी ७५ विद्यार्थी जखमी झाले आहे. परंतु हे आंदोलन तीव्र झाले होते. अंतरिम सरकारच्या कायदेशीर आणि शिक्षक सल्लागारांना विद्यार्थ्यांचा तीव्र रोष सहन करावा लागत आहे. अपघातानंतरच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी अधिकारी आले असताना विद्यार्थ्यांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली आहे.
याच वेळी शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने अंतरिम सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. अवामी लीग पक्षाने अंतरिम सरकार मृतांची संख्या लपवत असल्याचे म्हटले आहे. तसेच परिस्थिती हातळण्याऐवजी लोकांवर ग्रेनेड, अश्रूदुराचा वापर केला जात असल्याचेही सांगितले. अंतरिम सरकार राष्ट्रपती जबाबादारी घेण्यात अपयशी ठरले असल्याचा आरोप अवामी लीगने केला आहे. अवामी लीग ने संयुक्त राष्ट्राकडे अंतिरम सराकरविरोधात कारवाईची आणि अपघातातील नातेवाईकांसाठी मदतीची मागणी केली आहे.