Bangladesh Politics Bangladesh Army rejects student-led party leader’s allegation of political interference
ढाका: सध्या बांगलादेशात मोठा राजकीय गोंधळ सुरु आहे. दरम्यान 2025 च्या अखेरीस बांगलादेशात निवडणुका होणार असून यासाठी देशातील काही विद्यार्थ्यांनी नवा राजकीय गट स्थापन केला आहे. नॅशनल सिटीझनशिप पार्टी (NCP) हा विद्यार्थी राजकीय गट आहे. या गटाने पुन्हा एकदा आवामी लीगच्या पुनर्स्थापनेचा बांगलादेश लष्करावर आरोप केला आहे. मात्र बांगलादेश लष्कराने हे आरोप फेटाळून लावले आहेत. लष्कराने या आरोपांना हास्यास्पद आणि कोणत्याही पाठपुराव्यांसह असलेल्या आरोप म्हटले आहे.
ऑगस्ट 2024 मध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना सरकारविरोधात आरक्षणावरुन मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आंदोलन सुरु झाले होते. या विद्यार्थी आंदोलनात नाहिद इस्लामने महत्त्वाची भूमिका बजावली होती. नाहिदच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या नॅशनल सिटीझन पार्टी (NCP) ने हे गंभीर आरोप केले आहेत. नाहिद हा मोहम्मद युनूस यांच्या सरकारमध्ये सल्लागार म्हणून काम करत होता. सध्या बांगलादेशात राजकीय गोंधळ उडाला आहे. लष्करावरील राजकीय हस्तक्षेपाच्या आरोपमुळे हा तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या NCP च्या कार्यकर्त्यांनी ढाका येथे लष्कराविरोधात निदर्शने सुरु केली आहेत.
बांगलादेशच्या लष्कराने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात लष्कराने म्हटले आहे की, बांगलादेश सैन्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, NCP चे हे आरोप केवळ राजकीय स्टंट आहेत.
NCP पक्षाचे प्रमुळे नेते आणि विद्यार्थी नेता अब्दुला यांनी लष्कराविरोधी या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. लष्कराविरोधी आंदोलनांमध्ये घोषणाबाजी करण्यात आली असून यादरम्यान भारतावरही बांगलादेश राजकारणात हस्तक्षेपाचा आरोप केला आहे. अब्दुलाला यांनी भारताच्या सांगण्यावरुन शेख हसीना यांच्या आवामी लीगला लष्कराकडून मदत केली जात आहे. अब्दुल्ला यांनी लष्करालाला इशारा दिला आहे की, राजकारणात सैन्याचा कोणताही हस्तक्षेप स्वीकारला जाणार नाही.
ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनाचा प्रमुख चेहरा नाहिद नाजिम अब्दुल्ला गेल्या काही कालापासून चर्चेत आले आहेत. स्टुडंट्स अगेन्स्ट डेमिक्रेशनचे प्रमुख म्हणून त्यांनी कामकाज पाहिले आहे. सध्या त्यांची एक प्रभावी राजकीय व्यक्तीमत्व म्हणून ओळख वाढत आहे. हिंसक आंदोलनामुळे शेख हसीना यांना देशातून पलायन करायला लागले आणि देशात सत्तापालट झाला. सध्या बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतिरम सरकार बांगलादेशात सत्तेत आहे.
गेल्या काही काळापासून बांगलादेशात मोठी राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. हिंदूंवरील आणि अल्पसंख्यांक धर्मीयंवरील अत्याचारामुळे, तसेच महिला आणि मुलींवर अत्याचारामुळे देखील देशात मोठा गोंधळ सुरु आहे. शिवाय, नवीन राजकीय पक्षाने लष्करावरी केलेल्या आरोपमुळे तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.