'भारत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करु शकतो'; कॅनडाच्या गुप्तचर संस्थेचा दावा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ओटावा: कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी 28 एप्रिल रोजी सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे जाहीर केले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना प्रत्तर देण्यासाठी कार्नी यांनी हा निर्णय घेतला. दरम्यान कॅनडाच्या एका गुप्तचर संस्थेने भारतावर गंभीर आरोप केले आहेत. कॅनडाच्या गुप्तचर संस्थेने दावा केला आहे, भारत त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करु शकतो. या दाव्याने खळबळ माजवली असून दोन्ही देशांचे संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे.
यापूर्वी कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी निज्जर हत्येप्रकरणी भारतावर गंभीर आरोप केले होते. यामुळे दोन्ही देशांंमध्ये संबंध नीचांकी पातळीवर पोहोचले होते. मीडिया रिपोर्टनुसार, कॅनडाडाच्या गुप्तचर संस्थेने भारत आणि चीन त्यांच्या आगामी निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करु शकतो असे म्हटले आहे.
कॅनडियन सिक्युरिटी इंटेलिजेंस सर्व्हिस (CSIS) ने भारताच्या हस्तक्षेपाचा दावा केला आहे. हे विधान अशा वेळी करण्यात आले आहे, जेव्हा दोन्ही देशांमधील संबंध अधिक नाजूक आहे. तसेच कॅनडाने भारविरोधी संघटना खलिस्तानी समर्थकांना सतत प्रोत्साहन दिले आहे आहे, यामुळे कॅनडात अनेक हिंदू धर्मीय स्थळांवर खलिस्तानींनी हल्ले घडवून आणले आहे. दरम्यान कॅनडाने खलिस्तानी हशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येसाठी भारताचा सहभाग असल्याचा देखील आरोप केला आहे.
कॅनडियन सिक्युरिटी इंटेलिजेंस सर्व्हिस (CSIS) च्या उपसंचालक व्हेनेसा लॉयड यांनी दावा केला आहे की, विरोधी सरकार संस्था निवडणुकीत हस्तक्षेप करण्यासाठी AI चा वापर करु शकतात. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना कॅनडाच्या लोकशाहीत, सार्वत्रिक निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी AI चा वापर करण्याची शक्यता अधिक असल्याचे लॉयड यांनी म्हटले आहे. लॉयड यांनी हेही म्हटले त्यांनी असे आहे की, भारत सरकारकडे देखील AI साधनांचा वापर करुन कॅनडाच्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्याचा हेतू आणि क्षणता आहे.
यापूर्वी कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर केलेल्या हरदीप सिंग निज्जर हत्येचा आरोप फेटाळून लावला आहे. 2019 आणि 2021 च्या कॅनडियन निवडणुकीत देखील भारताने हस्तक्षेप केल्याचा आरोप माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. यासाठी चौकशी देखील करण्यात आली होती. भारत आणि कॅनडामध्ये अनेक आरोप-प्रत्योरोप झाले असून दोन्ही देशांतील संबंध या नव्या दव्यामुळे अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
सध्या कार्नी यांची भूमिका याबाबतीत स्पष्ट नाही. त्यांनी खलिस्तानी चळवळींना विरोधही केला नाही आणि उघडपणे समर्थनही दर्शवले नाही. मात्र, कॅनडातील प्रभावशाली शीख लॉबीचा त्यांना पाठिंबा मिळत आहे. लिबरल्सच्या शीख नेत्यांनीच त्यांचा प्रचार करण्यास सुरुवात केली होती, त्यांना राजकीय पाठिंबा दिला होता.