Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Los Angeles Fire: धुराने माखले आकाश, रिफायनरीला भीषण आग, Video पाहून अंगावर येईल काटा

लॉस एंजेलिसमधील एका रिफायनरीला भीषण आग लागली. आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ही आग पाहून तुमच्याही अंगाचा थरकाप उडेल. पहा व्हायरल व्हिडिओ

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 03, 2025 | 01:00 PM
लॉस एंजेलिसमध्ये भयानक आग (फोटो सौजन्य - X.com)

लॉस एंजेलिसमध्ये भयानक आग (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Close
Follow Us:
  • लॉस एंजेलिसमध्ये मोठी दुर्घटना 
  • रिफायनरीला लागली आग 
  • व्हिडिओ झाला व्हायरल 

गुरुवारी (२ ऑक्टोबर) कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील सर्वात मोठ्या रिफायनरींपैकी एक असलेल्या शेवरॉनच्या एल सेगुंडो रिफायनरीला आग लागली. आगीमुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. आग इतकी भीषण होती की ज्वाला उंच उसळताना दिसत होत्या. तथापि, माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, लॉस एंजेलिस काउंटी सुपरवायझर हॉली मिशेल यांनी सांगितले की आग आटोक्यात आणण्यात आली आहे. आग रिफायनरीच्या फक्त एका भागात मर्यादित होती, ज्यामुळे मोठे नुकसान टाळता आले. अग्निशमन दलाच्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लॉस एंजेलिसमध्ये आगीत 3 अब्ज रुपयांचे आलिशान घर जळून खाक; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओ झाले व्हायरल

आगीच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. या व्हिडिओंमध्ये रात्रीच्या आकाशात तीव्र नारंगी ज्वाळा उठताना दिसत आहेत. रिफायनरीमधून दाट धुराचे लोट येत होते, ज्यामुळे संपूर्ण परिसर धुक्यात झाकला जात होता. रहिवाशांच्या मते, स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आला आणि परिसरात काही वेळासाठी वीज चमकली. लॉस एंजेलिसमध्ये यावर्षी आग लागण्याचे प्रमाण अधिक असून वर्षाच्या सुरूवातीपासूनच आगीच्या बातम्यांनी हैराण झाले आहेत. 

🚨🇺🇸 MASSIVE EXPLOSION ROCKS CHEVRON REFINERY IN LOS ANGELES, LARGEST ON WEST COAST A major fire erupted at the Chevron El Segundo refinery around 9:30pm, lighting up the night sky with a towering fireball and sending thick smoke billowing across Los Angeles. “I thought we got… https://t.co/x9Bdhza7NT pic.twitter.com/eLIeRgRCTD — Mario Nawfal (@MarioNawfal) October 3, 2025

कारण मात्र अज्ञात 

शेवरॉनने अद्याप या घटनेवर अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. आगीचे कारण किंवा स्फोट सध्या अज्ञात आहे. अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि तपास सुरू करण्यात आला आहे. आगीनंतर, रिफायनरी कॉम्प्लेक्स पूर्णपणे सील करण्यात आला आहे. आग विझवण्यासाठी बचाव पथके सतत काम करत आहेत. प्रशासनाने रहिवाशांना शांत राहण्याचे आणि अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

🚨🇺🇸 BREAKING: CALIFORNIA CAMERAS CAPTURE EXPLOSION AT CHEVRON EL SEGUNDO UC San Diego’s monitoring cameras recorded the initial blast tonight at the Chevron Oil Refinery near Los Angeles. The explosion triggered a massive fire, but officials report the flames are contained to… https://t.co/myH1Ak0pbS pic.twitter.com/jvFw7mABk9 — Mario Nawfal (@MarioNawfal) October 3, 2025

भारतातही अशा घटना घडल्यात 

भारतातही आगीच्या घटना घडल्या आहेत. नोव्हेंबर २०२४ मध्ये गुजरातमधील वडोदरा येथील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन रिफायनरीला आग लागली. स्टोरेज टँकमध्ये स्फोट झाल्याने आग लागली आणि त्यात दोन जणांचा मृत्यू झाला. दोन दिवसांनंतर, मथुरा रिफायनरीला आग लागली. या वर्षी जानेवारीमध्ये चीनमधील सिनोपेक झेनहाई रिफायनरीला आग लागली होती.

लॉस एंजेलिसच्या आगीने घेतले विक्राळ रुप; आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू, हजारो घरे उद्ध्वस्त

Web Title: Fire breaks out at chevron refinery in los angeles country world news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 01:00 PM

Topics:  

  • Fire News
  • Los Angeles
  • World news

संबंधित बातम्या

PoK मध्ये पाकिस्तानची ‘गजब बेईज्जती’, 10-10 रूपयात सैनिकांच्या पोषाखाची-हेल्मटची विक्री, Video Viral
1

PoK मध्ये पाकिस्तानची ‘गजब बेईज्जती’, 10-10 रूपयात सैनिकांच्या पोषाखाची-हेल्मटची विक्री, Video Viral

पाकिस्तानला मोठा झटका! तालिबानी विदेशी मंत्री येणार भारतात, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची मंजुरी
2

पाकिस्तानला मोठा झटका! तालिबानी विदेशी मंत्री येणार भारतात, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची मंजुरी

रशियाचे अध्यक्ष लवकरच भारत दौऱ्यावर ; डिसेंबरधील मोदी-पुतिन भेटीने दोन्ही देशांच्या संबंधांना मिळणार नवी गती
3

रशियाचे अध्यक्ष लवकरच भारत दौऱ्यावर ; डिसेंबरधील मोदी-पुतिन भेटीने दोन्ही देशांच्या संबंधांना मिळणार नवी गती

ढाकाच्या रुग्णालयात हसीनाच्या मंत्र्याने घेतला शेवटचा श्वास, मेल्यानंतरही युनूसच्या पोलिसांनी ठेवल्या हातात बेड्या; Photo Viral
4

ढाकाच्या रुग्णालयात हसीनाच्या मंत्र्याने घेतला शेवटचा श्वास, मेल्यानंतरही युनूसच्या पोलिसांनी ठेवल्या हातात बेड्या; Photo Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.