Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रपतीपदासाठी बांग्लादेशात उलटी गिनती सुरू; निवडणूक आयोगाने जाहीर केले संपूर्ण वेळापत्रक, या तारखेला होणार मतदान

Bangladesh Presidential Election: बांग्लादेश निवडणूक आयोगाने 20 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती निवडणूक घेण्याची घोषणा केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 13 ऑगस्ट असून, माजी राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या राजीनाम्यानंतर ही निवडणूक होत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 06, 2026 | 06:56 PM
राष्ट्रपतीपदासाठी बांग्लादेशात उलटी गिनती सुरू; निवडणूक आयोगाने जाहीर केले संपूर्ण वेळापत्रक, या तारखेला होणार मतदान

राष्ट्रपतीपदासाठी बांग्लादेशात उलटी गिनती सुरू; निवडणूक आयोगाने जाहीर केले संपूर्ण वेळापत्रक, या तारखेला होणार मतदान

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रपतीपदासाठी बांग्लादेशात उलटी गिनती सुरू
  • निवडणूक आयोगाने जाहीर केले संपूर्ण वेळापत्रक
  • या तारखेला होणार मतदान
 

Bangladesh Presidential Election 2026 News Marathi: बांग्लादेशात राष्ट्रपतीपदासाठी उलटी गिनती सुरू झाली असून बांग्लादेशमध्ये राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे 20 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. बांग्लादेशच्या निवडणूक आयोगाने गुरुवारी याबाबत अधिकृत घोषणा केली. माजी राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी 24 जुलै रोजी राजीनामा दिल्यानंतर ही निवडणूक घेतली जात आहे.

निवडणूक आयोगाचे वरिष्ठ सचिव अख्तर अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. अर्जांची छाननी 16 ऑगस्ट रोजी होणार असून, उमेदवारांना 18 ऑगस्ट सायंकाळी 4 वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची संधी असेल.

Taiwan War Drills: सायरन वाजले अन् राष्ट्राध्यक्षांनी घातले बुलेटप्रूफ जॅकेट; तैवानच्या ‘हान कुआंग’ सरावाने ड्रॅगॉनचा थरकाप

20 ऑगस्टला संसदेत मतदान

राष्ट्रपतीपदासाठी मतदान 20 ऑगस्ट रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत जातीय संसद (राष्ट्रीय संसद) भवनातील सत्र कक्षात होणार आहे. बांग्लादेशच्या संविधानानुसार राष्ट्रपतींची निवड थेट जनतेकडून होत नाही, तर संसद सदस्य मतदान करून राष्ट्रपतींची निवड करतात. जर एकमताने एकच उमेदवार उभा राहिला, तर मतदानाची आवश्यकता भासणार नाही.

शहाबुद्दीन यांच्या राजीनाम्यानंतर निवडणूक

मोहम्मद शहाबुद्दीन यांनी 24 जुलै 2026 रोजी आरोग्याच्या कारणास्तव राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी एप्रिल 2023 मध्ये पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी पदाची शपथ घेतली होती. त्यांचा कार्यकाळ संपण्यासाठी अजून सुमारे दोन वर्षे बाकी होती.

कार्यवाहक राष्ट्रपतींकडे जबाबदारी

संसदेचे अध्यक्ष हाफिज उद्दीन अहमद हे संविधानातील तरतुदीनुसार 90 दिवसांसाठी कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून काम पाहत आहेत. या कालावधीत नव्या राष्ट्रपतींची निवड पूर्ण करणे बंधनकारक असल्याने निवडणुकीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

संसदेतील स्थिती

सध्या पंतप्रधान रहमान यांच्या नेतृत्वाखालील बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) कडे 350 सदस्यांच्या संसदेत दोन-तृतीयांश बहुमत आहे. मात्र, पक्षाने अद्याप राष्ट्रपतीपदासाठी आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, संसदेच्या अध्यक्षांशी सल्लामसलत करूनच निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, संपूर्ण प्रक्रिया संविधानाच्या चौकटीत पार पाडली जाईल.

US-Iran Tension: ट्रम्प यांनी दुसऱ्या महायुद्धासारखा भीषण हल्ला का रोखला? इराणच्या ‘अशा’ एका कॉलमुळे टळले महायुद्ध

Web Title: Bangladesh presidential election 2026 voting on august 20 nomination deadline august 13

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 06:56 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Election

संबंधित बातम्या

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क
1

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

Bangladesh ICT Verdict : बांगलादेशात राजकीय भूकंप! 500 दिवसांनंतर बदला राजकीय? अवामी लीगच्या 7 बड्या नेत्यांना फाशीची शिक्षा
2

Bangladesh ICT Verdict : बांगलादेशात राजकीय भूकंप! 500 दिवसांनंतर बदला राजकीय? अवामी लीगच्या 7 बड्या नेत्यांना फाशीची शिक्षा

India-Bangladesh Ties : शेख हसीनांचा काळ ‘अस्वस्थ करणारा’; बांगलादेशची भारतासोबत ‘रिसेट’ची मागणी, 101 करार होणार रद्द?
3

India-Bangladesh Ties : शेख हसीनांचा काळ ‘अस्वस्थ करणारा’; बांगलादेशची भारतासोबत ‘रिसेट’ची मागणी, 101 करार होणार रद्द?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.