Bangladesh supreme court acquits former pm Khaleda Zia in corruption case
ढाका: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांची भ्रष्टाचार प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. बांगलादेश सर्वाच्चे न्यालयाने उच्च न्यायालयाच्या 10 वर्षांच्या शिक्षा सुनावणीच्या निर्णयाला पलटवत खालिदा यांना दिलासा दिला आहे. खालिदा झिया यांना मागील वर्षी ऑगस्टमध्ये तुरुंगातून मुक्त करण्यात आले होते. 79 वर्षीय खालिदा झिया यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील केले होते. मुख्य न्यायाधीश डॉ. सैयद रैफात यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय दिला. कोर्टाने नमूद केले की, खालिदा आणि अन्य आरोपींविरुद्ध बदलेच्या हेतूने ही कारवाई करण्यात आली होती.
काय आहे जिया अनाथालय ट्रस्ट घोटाळा प्रकरण?
2018 साली, खालिदा जिया यांना ढाका येथील विषेष न्यालयाने जिया अनाथालय ट्रस्टच्या नावाखील रसकारी निधीचा दुरुपयोग केल्याच्या आरोपाखाली दोषी करार दिला होता. मिळालेल्या माहितीनुसार, खालिदा यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. नंतर ही शिक्षा वाढवून उच्च न्यालयाने 10 वर्षे केली.
या प्रकरणामध्ये खालिदा यांच्याशिवाय त्यांचे पुत्र तारिक रहमान आणि इतर 5आरोपींना देखील शिक्षा ठोठावण्यात आली होती. आरोपींवर 2.1 कोटी बांगलादेशी टका दंडही लावण्यात आला होती. तारिक रहमान आणि अन्य दोन आरोपी फरार झाले होते. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर खालिदा यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केली, परंतु या प्रकरणात न्यायप्रक्रियेच्या विलंबामुळे निर्णयासाठी 5 वर्षे लागली.
आरोग्याच्या कारणाने लंडनला रवाना
काही काळापूर्वी खालिदा झिया याही देश सोडून लंडनला गेल्या होत्या. यामागचे कारण म्हणजे खालिदा झिया यांची प्रकृती बऱ्याच काळापासून खालावलेली असल्याच्या बातम्या संमोर आल्या. त्यांना यकृत सिरोसिस, हृदयविकार आणि मूत्रपिंडाशी संबंधित समस्या आहेत. या महिन्याच्या सुरुवातीस, 7 जानेवारी रोजी, त्या उपचारांसाठी लंडनला गेल्या. विशेष म्हणजे त्यांचा हा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा बांगलादेशचे सर्वोच्च न्यायालय झिया अनाथालय ट्रस्ट प्रकरणी निकाल देणार होता.
राजकीय कारकिर्द
खालिदा झिया दोन वेळा बांगलादेशच्या पंतप्रधान राहिल्या आहेत – पहिल्यांदा 1991 ते 1996 आणि दुसऱ्यांदा 2001 ते 2006 दरम्यान. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे खालिदा झिया आणि BNP पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, या प्रकरणाने बांगलादेशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.