Bangladesh's Mohammad Yunus' 'Mango Diplomacy', Special mangoes sent to Prime Minister Modi
ढाका : गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि बांगलादेशमध्ये तणावाचे वातावरण आहे. बांगलादेशमध्ये हिंदूवरील हिंसाचार, शेख हसीनांचा भारतात आश्रय आणि भारतावर केलेल्या अनेक गंभीर आरोपांमुळे दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले आहेत. दरम्यान बांगलादेशच्या अंतिरम सरकारचे मोहम्मद युनूस यांनी भारतासोबत संबंध सुधारण्यासाठी एक नवीन खेळी खेळली आहे.
मोहम्मद युनूस यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खास भेट पाठवली आहे. या भेटीकडे मॅंगो डिप्लोमसी म्हणून पाहिले जात आहेत. मोहम्मद युनूस यांनी भारतासोबत संबंध सुधारण्याच्या दिशेने पाऊल घेत पंतप्रधान मोदींनी १००० किलो विशेष हरिभंगा आंबे पाठवले आहे. भारतीय राजदूत आणि इतर अधिकाऱ्यांसाठी भेट म्हणून हे आंबे सादर केले जाणार आहे.
केवळ पंतप्रधानच नव्हे तर ममता बॅनर्जी आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनाही मोहम्मद युनूस यांनी ही भेट पाठवली आहे. हरिभंगा आंबा बांगलादेशात उच्च दर्जाचा मानला जातो. भारतासह संपूर्ण जगभरात त्याला पसंती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी औखरा लॅंड पोर्टवरुन हे आंबे भारताकडे रवाना करण्यात आले आहेत.
बांगलादेशच्या उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, ही भेट सामान्य सद्भावनेचे प्रतीक म्हणून पाठवली जात आहे. नवी दिल्लींपर्यंत सोमवारी ही भेट पोहोचेल असे अधिकाऱ्यांने म्हटले. बांगलादेशाकडून आंब्याची भेट ही पहिल्यांदाच मिळालेली नाही. यापूर्वी देखील बांगलादेशाने भारताला ही भेट पाठवली आहे. परंतु गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर शेख हसीनांना सत्ता सोडावी लागली होती. त्यानंतर त्यांनी भारतात आश्रय घेतला होता.
हसीना यांना भारताचे जवळचे मित्र मानले जाते. या सर्व घडामोडींमुळे भारत आणि बांगलादेशातील संबंध बिघडले होते. दोन्ही देशांत तणावाचे वातावरण होते.दरम्यान मोहम्मद युनूस यांनी पाठवलेली ही भेट भारत आणि बांगालदेशचे संबंध सुधारण्यासाठी एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे.
गेल्या वर्षी कोटाविरोधात बांगलादेशात विद्यार्थी आंदोलन झाले होते. या दरम्यान आंदोलनकर्त्यांनी शेख हसीनांच्या घरावर हल्ला केला होता. यामुळे त्यांनी देशातून पळ काढला आणि बारता आश्रय घेतला. त्यानंतर बांगलादेशात मोहम्मद युनूस यांचे सरकार स्थापन झाले. अंतिरम सरकारने भारताला हिलसा माशांच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घातली, ज्याला ‘हिलसा डिप्लोमसी’ म्हणून ओळखले जाते. ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना सरकार पडल्यानंतर हिल्साच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ होती.