Battery boom drives Bangladesh lead poisoning among children blood
ढाका: सध्या बांग्लादेश मोठ्या आर्थिक संकटाशी झुंजत आहे. दरम्यान एक मोठा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. बांगलादेशात गंभीर आरोग्य संकट उद्भवले आहे. हे संकट लहान मुलांच्या भविष्यासाठी घातक ठरु शकते. एका अहवालानुसार, या संकटाचे मूळ कारण शिशा( लेड) प्रदूषण आहे. यामुळे बांगलादेशातील सुमारे 3.5 कोटी मुलांवर म्हणजेच देशातील 60% मुलांना या धोकादायक धातूमुळे त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येचा परिणाम लहान मुलांचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यवर नव्हे, तर संपूर्ण आयुष्यवर होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिशा धातूमुळे प्रदूषणात वाढ होत असून या प्रदूषणाचे प्रमुख कारण म्हणजे जुन्या बॅटरींचा पुनर्वापर आहे. बांगलदेशात जुनी आणि खराब झालेली बॅटरी मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे वापरली जात आहे. कोणत्याही सुरक्षा उपयांशिवाय पुनर्वापरासाठी बॅटरीचे वितरण केले जात आहे. या प्रक्रियेतून हवेत आणि जमीनत शिशाचे प्रमाण वाढत आहे. यामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. विशेष करुन यामुळे सर्वाधिक जास्त त्रास लहान मुलांना सहन करावा लागत आहे.
जागतिक संघटनेच्या (WHO) मानकांपेक्षा बांगलादेशमध्ये सीसाचे प्रमाण वाढत आहे. यामुळे मुलांच्या मेंदूच्या विकासावर परिणाम होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका 12 वर्षीय मुलाच्या रक्ताती शिशाचे प्रमाण वाढल्याने त्याचा मानविकास होण बंद झाले आहे. यामुळे मुलाचे शाळेत जाणे बंद झाल आहे. शिशाच्या वाढत्या प्रमाणामुळे मुलांमध्ये मानसिक विकलांगता येत आहे, हाडे कमकुवत होत आहेत, तसेच न्यूरोलॉजिकल विकाराचा धोका वाढला आहे.
बांगलादेशमध्ये ई-रिक्शांची मागणी झपाच्याने वाडत आहे. यामुळे खराब झालेल्या बॅटरींचा पुनर्वापर वाढत आहे. या बॅरीतून बाहेर पडणारे विषारी घटक मानवालाच नव्हे, तर पर्यावरणाला हानी पोहोटवत आहेत. शेतातील पिकांवर आणि प्राण्यांवरही याचा परिणाम होत आहे.
बांगलादेशच्या आरोग्य मंत्रालयाने इशारा दिला आहे की, या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर येत्या दोन वर्षा बांगलादेशात शिशाच्या वाढत्या प्रमाणामुळे मोठे संकट निर्माण होऊ शकते. यामुळे अनेक लोकांचा बळी जाऊ शकतो. अनेक पर्यावरणीय संस्थांच्या म्हणण्यांनुसार, बॅटरी पुनर्वापर करणाऱ्या अनधिकृत कंपन्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. तसेच लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे अत्यंक महत्वाचे आहे.
या संकटामुळे बांगलादेशातील 3.5 टी मुलांचे भविष्य धोक्यात आहे. सरकारकडून त्वरित कठोर उपाय न झाल्यास मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे योग्य ती पाऊले उचलण्याची गरज आहे. अन्यथा पुढील काही वर्षांत बांगलादेशची परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे.