Before Eid U.S. and Israel attack three Arab nations killing hundreds
जेरुसलेम/वॉशिंग्टन : इस्रायल आणि अमेरिका यांनी संयुक्तरित्या मध्यपूर्वेतील तीन प्रमुख अरब देशांमध्ये हल्ले चढवले आहेत. ईदच्या तोंडावर झालेल्या या आक्रमणांमुळे संपूर्ण इस्लामिक जगतात तीव्र संताप उसळला आहे. इस्रायलने गाझा आणि लेबनॉनवर हवाई हल्ले केले असून, अमेरिकेने येमेनवर बॉम्बस्फोटांचा मारा केला आहे. या भयंकर हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून, शेकडो लोक मारले गेले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून गाझामध्ये सुरू असलेल्या संघर्षाने शनिवारी नवीन टोक गाठले. इस्रायलने हमासविरोधात युद्धविराम तोडत मोठ्या प्रमाणावर बॉम्बफेक केली. गाझातील मृतांचा आकडा 700 पार गेला आहे, तर हजारो लोक जखमी झाले आहेत. इस्रायलचा पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी स्पष्ट केले आहे की, गाझावर कोणतीही दया दाखवली जाणार नाही आणि इस्रायलचे लष्कर पूर्ण क्षमतेने हे युद्ध लढणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘हा पुनर्जन्मच म्हणावा…’ नवा रशिया म्हणजे युद्धाच्या धगधगत्या आगीतून बाहेर पडणारी महासत्ता
गाझासोबतच इस्रायलने दक्षिण आणि पूर्व लेबनॉनमधील अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले चढवले. वाडी जिबकिन, शरीफा, फ्रुन आणि घंडौरिया या भागांना या हल्ल्यांचा जबरदस्त फटका बसला आहे. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, लेबनॉनमध्ये इस्रायलविरोधी हिजबुल्लाह संघटना कार्यरत आहे. हिजबुल्लाहने इस्रायली हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.
من مكان الغارة الإسرائيلية التي استهدفت حي الآثار في مدينة #صور. #لبنان #الميادين_لبنان pic.twitter.com/lo6q4j2COo
— الميادين لبنان (@mayadeenlebanon) March 22, 2025
credit : social media
अमेरिकेने शनिवारी रात्री येमेनवर बॉम्बहल्ले करत होदेदाह आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन मोठे हल्ले केले. तसेच, उत्तर-पूर्व येमेनमधील मांजर निदेशालयालाही पाच हवाई हल्ल्यांचा फटका बसला. गेल्या दोन आठवड्यांपासून अमेरिका सातत्याने येमेनी हौथी बंडखोरांवर हल्ले करत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा हत्याकांडावर निषेध नोंदवणाऱ्या हौथी गटाला उत्तर देण्यासाठी 17 मार्च रोजी लष्करी कारवाईचे आदेश दिले होते. त्यामुळे अमेरिकेने हा मोठा हल्ला चढवल्याचे मानले जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : सौदी अरेबिया: 120 देशांतील 4000 मुस्लिमांना पैगंबर मोहम्मद यांच्या मशिदीत का देण्यात आले विशेष स्थान?
ईदच्या काही दिवस आधीच इस्लामिक जगतात मोठ्या आनंदाचे वातावरण असते. मात्र, इस्रायल आणि अमेरिकेच्या आक्रमणांमुळे अरब देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक इस्लामिक देशांनी या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला असून, इस्रायल आणि अमेरिकेविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघानेही या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेला संघर्ष आता युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता असून, संपूर्ण जग या युद्धाकडे लक्ष ठेवून आहे.