Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेंटागॉनमध्ये मोठा वाद; अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांवर सुरक्षाविषयक नियमांच्या उल्लंघनाचा आरोप

संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांच्यावर त्यांच्या पत्नी जेनिफर हेगसेथ यांना परदेशी लष्करी अधिकाऱ्यांच्या गुप्त आणि उच्चस्तरीय बैठकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 29, 2025 | 03:55 PM
Big controversy in Pentagon US Defense Secretary accused of violating security regulations

Big controversy in Pentagon US Defense Secretary accused of violating security regulations

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयात (पेंटागॉन) मोठा वाद निर्माण झाला आहे. संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांच्यावर त्यांच्या पत्नी जेनिफर हेगसेथ यांना परदेशी लष्करी अधिकाऱ्यांच्या गुप्त आणि उच्चस्तरीय बैठकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हा वाद 6 मार्च रोजी घडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीनंतर उफाळून आला. या बैठकीत अमेरिकन संरक्षण मंत्री पीट हेगसेथ आणि ब्रिटनचे संरक्षण मंत्री जॉन हेली यांच्यात चर्चा झाली होती. विशेष म्हणजे, या गुप्त बैठकीत जेनिफर हेगसेथही उपस्थित असल्याचे समोर आले आहे, आणि त्यानंतर हा मुद्दा चांगलाच गाजू लागला.

पेंटागॉनमध्ये प्रोटोकॉलचे उल्लंघन?

अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्राच्या अहवालानुसार, उच्चस्तरीय संरक्षण बैठकींमध्ये केवळ अधिकृत सुरक्षा मंजुरी असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जातो. मात्र, जेनिफर हेगसेथ यांना अशा प्रकारची कोणतीही सुरक्षा मंजुरी होती का, याबाबत पेंटागॉनने कोणतीही स्पष्टता दिलेली नाही.

ही बैठक पेंटागॉनच्या मुख्यालयात पार पडली, जिथे युक्रेनला गुप्तचर माहिती देण्यावर घालण्यात आलेल्या बंदीबाबत चर्चा झाली होती. या बैठकीत ब्रिटनचे लष्करप्रमुख ॲडमिरल टोनी रडाकिन देखील उपस्थित होते. आश्चर्याची बाब म्हणजे, जेनिफर हेगसेथ बैठकीदरम्यान मंत्र्यांच्या अगदी मागे बसलेल्या दिसल्या, आणि यामुळे सुरक्षाविषयक प्रश्न निर्माण झाले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इराणचे शेवटचे काही क्षण शिल्लक! ट्रम्पच्या आदेशानंतर B-2 अणुबॉम्बर या देशाचा नकाशाच बदलणार

ब्रुसेल्समधील नाटो मुख्यालयातही जेनिफरची उपस्थिती

हा वाद केवळ एका बैठकीपुरता मर्यादित नाही. वृत्तानुसार, गेल्या महिन्यात ब्रुसेल्स येथे नाटो मुख्यालयात झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीतही जेनिफर उपस्थित होत्या. ही बैठक युक्रेन युद्ध आणि कीवला देण्यात येणाऱ्या लष्करी मदतीबाबत होती, आणि यात अमेरिका व त्याच्या सहयोगी देशांचे उच्चस्तरीय संरक्षण अधिकारी सहभागी झाले होते. अशा गोपनीय चर्चेत संरक्षण मंत्र्यांच्या पत्नीला प्रवेश कसा आणि कोणत्या अधिकाराने मिळाला? हा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.

विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

या घटनेनंतर अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात नैतिकता आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या उल्लंघनावरून वादंग सुरू झाले आहे. विरोधी पक्षांनी सरकारवर टीका करत याच्या चौकशीची मागणी केली आहे.

विरोधकांचे म्हणणे आहे की:

  1. पेंटागॉनने जेनिफर हेगसेथ यांना या बैठकांना उपस्थित राहण्याची परवानगी का दिली?
  2. त्यांना अधिकृत सुरक्षा मंजुरी होती का?
  3. अशा संवेदनशील बैठकीत एका अनधिकृत व्यक्तीच्या सहभागामुळे गुप्तचर माहिती गळतीची शक्यता नाही का?

यासोबतच, या वादाने पेंटागॉनच्या कार्यप्रणालीबाबत अनेक प्रश्न निर्माण केले आहेत, कारण अमेरिकेचे संरक्षण धोरण आणि जागतिक लष्करी हालचाली याच मुख्यालयात ठरवल्या जातात.

पेंटागॉनची प्रतिक्रिया आणि पुढील पाऊले

सध्या पेंटागॉनने या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सुरक्षाविषयक नियम मोडले गेले का, याची चौकशी केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, जर एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नीला गुप्त बैठकींमध्ये प्रवेश दिला गेला असेल, तर हा मोठा सुरक्षा त्रुटीचा प्रकार आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने कठोर पावले उचलली नाहीत, तर भविष्यात राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : कोण आहे ‘हा’ मुलगा? ज्याने 3 आठवडे आधीच केली होती म्यानमारच्या भूकंपाची भविष्यवाणी

 अमेरिकेच्या संरक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

या संपूर्ण प्रकरणामुळे पेंटागॉनच्या सुरक्षा नियमांवर आणि अमेरिकेच्या संरक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जगातील सर्वात शक्तिशाली लष्करी केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेंटागॉनमध्ये अशा प्रकारची निष्काळजीपणा होणे चिंतेचा विषय आहे. आता अमेरिकन सरकार आणि संरक्षण मंत्रालय या वादावर कोणते निर्णय घेते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Big controversy in pentagon us defense secretary accused of violating security regulations nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 03:55 PM

Topics:  

  • America
  • America news
  • international news

संबंधित बातम्या

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण
1

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये
2

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
3

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा
4

किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.