Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BLA Attack on Pakistan: तालिबानशी सामंजस्य करारानंतर BLA चा पाकिस्तानच्या लष्करी वाहनावर हल्ला; सात सैनिक ठार

यापूर्वीही बलुचिस्तानने पाकिस्तानमध्ये असेच हल्ले केले होते. सप्टेंबरच्या सुरुवातीला, बलुचिस्तानमधील मास्तुंग येथील दश्त भागात रेल्वे ट्रॅकवर झालेल्या हल्ल्यात जाफर एक्सप्रेसवर हल्ला करण्यात आला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 21, 2025 | 03:51 PM
BLA Attack on Paksitan:

BLA Attack on Paksitan:

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानने तालिबानसोबत युद्धबंदीचा करार
  • BLAच्या हल्ल्यात पाकिस्तानचे सात सैनिक ठार
  • पाकिस्तान-बलुचिस्तानमध्ये वाढता तणाव

BLA Attack on Pakistan Army: आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला प्रासंगिक आणि प्रभावी दाखवण्यासाठी पाकिस्तानकडून विविध राजनैतिक प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे बलुचिस्तान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील अंतर्गत संघर्ष आणि दहशतवादविरोधी मोहिमाही वाढत चालल्या आहेत. एकीकडे पाकिस्तान तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) विरुद्ध लढा देत आहे, तर दुसरीकडे बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट (बीएलएफ) सारख्या संघटनेने पाकिस्तानचे तीन तेरा वाजवले आहेत. अफगाणिस्तानशी झालेल्या युद्धात, पाकिस्तानने आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी निष्पाप लोकांवर बॉम्बफेक करताना मागेपुढे पाहिले नाही. त्यानंतर कतार आणि सौदी अरेबियामध्ये मध्यस्थी करत दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीची घोषणा करण्यात आली.

Bihar मध्ये उडणार राजकीय धुरळा; आरजेडीने अवलंबवले तर M-Y समीकरण; तर NDA ने थेट सवर्णांनाच…

एकीकडे अफगाण सीमावरील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानने तालिबानसोबत युद्धबंदीचा करार केला. पण त्याचवेळी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (BLA) पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला करत ७ सैनिकांना ठार केले. मिळालेल्या माहितीनुसार, बीएलएने केवळ पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्लाच केला नाही तर सैनिकांनाही ठार मारले. पाकिस्तानच्या लष्करी वाहनावर झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे सात सैनिक मारले गेले. बलुचिस्तान प्रांतात वाढत्या चकमकींमुळे पाकिस्तानच्या सुरक्षादलांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. अलीकडेच पाकिस्तान सरकारने अफगाणिस्तानातील तालिबानसोबत सीमा भागात शांतता राखण्यासाठी करार केला होता. मात्र, बलुचिस्तानमधील हल्ल्यामुळे या कराराचा परिणाम कितपत होईल, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बीएलएचा सैन्यावर हल्ला

बलुचिस्तानच्या मांड भागात माहिर आणि रुदिग दरम्यान हा हल्ला झाला, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने केलेल्या या हल्ल्यात पाकिस्तानचे सात सैनिक ठार झाले तर दोन सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने बलुचिस्तान बंडखोरांच्या वर्चस्व असलेल्या भागात हा हल्ला केला. याआधी, टीटीपीने पाकिस्तानी लष्कराच्या छावणीवर स्फोटकांनी भरलेल्या कारने हल्ला केला होता, या हल्ल्यातही पाकिस्तानचे जवळपास २० सैनिक मारले गेले होते.

OnePlus 15 5G Vs Samsung Galaxy S25: कोणता फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे अधिक दमदार? बेस्ट किंमतीत

यापूर्वीही बलुचिस्तानने पाकिस्तानमध्ये असेच हल्ले केले होते. सप्टेंबरच्या सुरुवातीला, बलुचिस्तानमधील मास्तुंग येथील दश्त भागात रेल्वे ट्रॅकवर झालेल्या हल्ल्यात जाफर एक्सप्रेसवर हल्ला करण्यात आला. या हलल्यात एक्सप्रेसचा एक डबा उद्ध्वस्त झाला आणि सहा डबे रुळावरून घसरले. १० ऑगस्ट रोजी मास्तुंग जिल्ह्यातही आयईडी स्फोट कऱण्यात आला होता. याही हल्ल्यात याच ट्रेनचे सहा डबे रुळावरून घसरले आणि चार जण जखमी झाले. ४ ऑगस्ट रोजी कोलपूरजवळ झालेल्या गोळीबाराची जबाबदारीही बीएलएने स्वीकारली. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचारांविरुद्ध आणि स्वातंत्र्यासाठी लढा उभारला आहे. पण याला पाकिस्तानी सरकारकडून दहशतवाद म्हटले जात आहे.

 

Web Title: Bla attack on pakistan bla attacks pakistan military vehicle after peace deal with taliban seven soldiers killed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 02:53 PM

Topics:  

  • Afganistan
  • international news
  • pakistan

संबंधित बातम्या

Donald Trump on Hamas: युद्धविरामानंतरही संघर्ष थांबेना! ट्रम्प यांची हमासला थेट धमकी; “चांगले वागा, नाहीतर…
1

Donald Trump on Hamas: युद्धविरामानंतरही संघर्ष थांबेना! ट्रम्प यांची हमासला थेट धमकी; “चांगले वागा, नाहीतर…

Japan’s 1st Women Prime Minister: साने ताकाइची बनणार जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान
2

Japan’s 1st Women Prime Minister: साने ताकाइची बनणार जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान

अमेरिकेला चीनचा मोठा झटका; ट्रंपच्या टॅरिफमुळे चीनने ‘हा’ करार मोडला, जागतिक बाजारपेठेत खळबळ
3

अमेरिकेला चीनचा मोठा झटका; ट्रंपच्या टॅरिफमुळे चीनने ‘हा’ करार मोडला, जागतिक बाजारपेठेत खळबळ

आता Imran Khan ची बहीण अलिमा खानचीही पाकिस्तानला अडचण, दिले अटकेचे आदेश
4

आता Imran Khan ची बहीण अलिमा खानचीही पाकिस्तानला अडचण, दिले अटकेचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.