OnePlus 15 5G Vs Samsung Galaxy S25: कोणता फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे अधिक दमदार? बेस्ट किंमतीत कोण ऑफर करतो कमाल फीचर्स?
OnePlus 15 स्मार्टफोन येत्या काहि दिवसांतच लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनची लाँच डेट अद्याप जाहीर करण्यात आली नाही. मात्र या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती मिळाली आहे. या स्मार्टफोनमध्ये नवीन डिझाइन, पावरफुल परफॉर्मेंस आणि शानदार कॅमेरा सेटअप मिळणार आहे. या वर्षीच्या सुरुवातीला Samsung Galaxy S25 5G हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता. हा स्मार्टफोन त्याच्या AI-आधारित फीचर्ससाठी ओळखला जातो. आता आम्ही तुम्हाला या दोन्ही स्मार्टफोन्सच्या फीचर्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला समजू शकेल की तुमच्यासाठी कोणता स्मार्टफोन बेस्ट ठरणार आहे.
Amazon Vs Flipkart: iPhone 16 वर कुठे मिळतेय बेस्ट डिल? ऑर्डर करण्यापूर्वी तपासा किंमत
OnePlus 15 5G मध्ये कंपनी गोलाकार कॅमेरा मॉड्यूल नाही तर स्क्वेअर शेप कॅमेरा मॉड्यूल असलेले कॅमेरा डिझाईन ऑफर करणार आहे. यामध्ये एयरोस्पेस-ग्रेड नैनो-सिरेमिक मेटल फ्रेम दिली जाणार आहे. या स्मार्टफोनचा फ्रंट आणि बॅक लूक आकर्षणाचा विषय ठरणार आहे. Samsung Galaxy S25 5G मध्ये क्लासिक फ्लॅट डिजाइनसह एल्युमिनियम फ्रेम दिली जाणार आहे आणि यामध्ये सिग्नेचर ट्रिपल-कॅमेरा सेटअप देखील उपलब्ध आहे. OnePlus 15 5G मध्ये 6.78-इंच OLED स्क्रीन दिली जाण्याची शक्यता आहे, जी 165Hz रिफ्रेश रेट आणि 1.5K रेजोल्यूशनसह येणार आहे. Samsung Galaxy S25 5G मध्ये 6.2-इंच Dynamic AMOLED 2X डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो.(फोटो सौजन्य – Pinterest)
OnePlus 15 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये 50MP मेन कॅमेरा, 50MP अल्ट्रा-वाइड आणि 50MP पेरिस्कोप टेलीफोटो लेंस (3x ऑप्टिकल जूम) यांचा समावेश असणार आहे. Samsung Galaxy S25 5G मध्ये देखील ट्रिपल कैमरा सिस्टम आहे. ज्यामध्ये 50MP मेन सेंसर, 12MP अल्ट्रा-वाइड आणि 10MP टेलीफोटो कैमरा (3x जूम) यांचा समावेश आहे. सेल्फीसाठी OnePlus 15 मध्ये 32MP फ्रंट कॅमेरा तर Galaxy S25 मध्ये 12MP सेल्फी कॅमेरा आहे.
OnePlus 15 5G नवीन Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेटसह लाँच केला जाण्याची शक्यता आहे, जो 16GB रॅम आणि 512GB इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करणार आहे. हे चिपसेट AI आणि गेमिंग परफॉर्मेंस अतिशय पावरफुल मानले जाते. तर, Samsung Galaxy S25 मध्ये Snapdragon 8 Elite (For Galaxy) प्रोसेसर देण्यात आला आहे, जो फ्लॅगशिप लेव्हलवर परफॉर्म करतो. या डिव्हाईसमध्ये 12GB रॅम देण्यात आला आहे. OnePlus 15 5G मध्ये 7300mAh बॅटरीसह 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाण्याची शक्यता आहे. Galaxy S25 5G मध्ये 4000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
OnePlus 15 5G स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 75,000 रुपये असण्याची शक्यता आहे. तर Samsung Galaxy S25 5G हा स्मार्टफोन 80,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे.