
balochistan bla attack operation herof 2 pakistan army casualty
BLA Operation Herof 2.0 Balochistan : पाकिस्तानचा (Pakistan) सर्वात मोठा आणि नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असलेला प्रांत ‘बलुचिस्तान’ सध्या युद्धभूमी बनला आहे. गेल्या ३५ तासांपासून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन हेरोफ २.०’ ने पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे काढले आहेत. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (BLA) दावा केला आहे की, त्यांच्या ‘मजीद ब्रिगेड’ आणि ‘फतेह स्क्वॉड’ने १५० हून अधिक पाकिस्तानी सैनिक आणि निमलष्करी दलाच्या जवानांना कंठस्नान घातले आहे. हे हल्ले इतके नियोजनबद्ध होते की, एकाच वेळी १२ जिल्ह्यांमध्ये स्फोट आणि गोळीबाराचे आवाज ऐकू येत होते.
एका वर्षापूर्वी पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी बलुच बंडखोरांना कमी लेखत म्हटले होते की, त्यांच्याशी लढायला लष्कराची गरज नाही, एक ‘एसएचओ’च पुरेसा आहे. मात्र, आज त्याच बलुच सैनिकांनी पाकिस्तानच्या शक्तिशाली लष्कराला (Pak Army) घाम फोडला आहे. बीएलएने नोशकी, ग्वादर, मस्तुंग आणि पंजगुर सारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. विशेष म्हणजे, बीएलएने दावा केला आहे की त्यांचा संघर्ष केवळ सैन्याशी आहे, सामान्य पोलीस किंवा कर्मचाऱ्यांशी नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Currency War: डॉलरला चेकमेट अन् युआनचा उदय; शी जिनपिंग आणि ट्रम्पमध्ये सुरु झालाय इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक संघर्ष
पाकिस्तानी लष्कराने या हल्ल्यांना ‘फिटना-अल-हिंदुस्थान’ असे नाव देऊन भारतावर आरोप करण्याचा जुनाच प्रयत्न केला आहे. लष्कराच्या दाव्यानुसार, त्यांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात ९२ बंडखोर ठार झाले आहेत. मात्र, माजी लष्करी अधिकारी मेजर (नि.) आदिल राजा यांनी पाकिस्तान सरकारवर सडकून टीका केली आहे. राजा यांच्या मते, लोकांची मते चोरून सत्तेवर आलेले सरकार आणि लष्कर आपली अक्षमता लपवण्यासाठी बाहेरील देशांवर आरोप करत आहे. बलुचिस्तानमधील उठाव हा तिथल्या लोकांच्या असंतोषाचा परिणाम असल्याचे त्यांनी नमूद केले.
BLA Strikes Deep in Pakistani Army Base Balochistan witnessed one of its deadliest escalations in years as the Baloch Liberation Army claimed coordinated attacks under Operation Herof Phase II across multiple army bases, killing over 80 Pakistani security personnel. Pakistani… pic.twitter.com/Ss65DmjXWA — The GEOSTRATA (@TheGeostrata) February 1, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Election : नेपाळमध्ये ‘MI-6’ चा गुप्त प्रवेश! माजी RAW एजंटचा खळबळजनक खुलासा; भारतावर होणार आघात?
परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पाहून बलुचिस्तानच्या गृहमंत्रालयाने संपूर्ण प्रांतात कडक निर्बंध लादले आहेत. पुढील एक महिन्यासाठी मोटारसायकलवर दोन व्यक्तींना बसण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच, शस्त्र प्रदर्शन, कारच्या काचांना काळी फिल्म लावणे आणि सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकून फिरण्यावरही बंदी आहे. पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यावर बंदी घालून एकप्रकारे तिथे अघोषित आणीबाणीच लागू करण्यात आली आहे.
Ans: हे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (BLA) पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात सुरू केलेले एक मोठे लष्करी अभियान आहे, ज्याचा उद्देश बलुचिस्तानला स्वतंत्र करणे आहे.
Ans: बीएलएने १५० पेक्षा जास्त सैनिक मारल्याचा दावा केला आहे, तर पाकिस्तानी लष्कराने १८ अधिकारी आणि ९२ बंडखोर ठार झाल्याचे अधिकृतपणे सांगितले आहे.
Ans: वाढत्या हिंसाचारामुळे दुचाकीवर डबल सीट फिरणे, शस्त्र प्रदर्शन, चेहरा झाकणे आणि ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यावर एक महिन्यासाठी बंदी आहे.