Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan : पाकिस्तानच्या तुरुंगात नेमकं चाललंय काय? इम्रान खाननंतर आता माजी परराष्ट्रमंत्री कोसळले, हातांना आणि पायांना दुखापत

Pakistan : पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना तुरुंगात चक्कर आल्याने ते कोसळले. त्यांच्या गुडघ्याला आणि हाताला दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या मुलीने सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 11, 2026 | 12:22 PM
Shah Mahmood Qureshi health update Pakistan former foreign minister collapsed in jail

Shah Mahmood Qureshi health update Pakistan former foreign minister collapsed in jail

Follow Us
Follow Us:
  • तुरुंगात प्रकृती खालावली
  • हाताला व गुढघ्याला दुखापत
  • मुलीचा संताप आणि न्याय्य मागणी

शेजारील देश पाकिस्तानमधून (Pakistan) एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या जवळचे सहकारी मानले जाणारे पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (PTI) चे उपाध्यक्ष शाह महमूद कुरेशी यांची तुरुंगात अचानक प्रकृती बिघडली आहे. लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात चालत असताना त्यांना अचानक तीव्र चक्कर आली, ज्यामुळे त्यांचा तोल गेला आणि ते जमिनीवर जोरात कोसळले. या दुर्दैवी घटनेत त्यांच्या हाताला आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात एकच खाडबळ उडाली आहे.

 नेमकी घटना कशी घडली? तुरुंगातील प्रशासनाचा खुलासा

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, ही घटना सोमवारी लाहोरमधील कुख्यात कोट लखपत तुरुंगात घडली. ७० वर्षीय शाह महमूद कुरेशी हे आपल्या बॅरेकमध्ये नेहमीप्रमाणे फिरत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. डोळ्यांसमोर अंधारी आल्याने त्यांना चक्कर आली आणि ते थेट जमिनीवर आदळले. या पडझडीत त्यांच्या हाताला आणि पायाच्या गुढघ्याला मुक्कामार लागून गंभीर जखमा झाल्या.

प्रकृती खालावल्याचे लक्षात येताच तुरुंग प्रशासनाची धावपळ उडाली. प्रशासनाने तातडीच्या हालचाली करत त्यांना लाहोरमधील पंजाब इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी (PIC) मध्ये हलवले. पीटीआयचे कायदेशीर सਲਾहकार आणि वकील राणा मुदस्सिर उमर यांनी सांगितले की, प्रकृती अत्यंत खालावल्यामुळे त्यांना तातडीने वैद्यकीय सहाय्याची गरज होती. सध्या डॉक्टरांचे एक विशेष पथक त्यांच्या प्रकृतीवर २४ तास कडक नजर ठेवून आहे. २४ तासांच्या निरीक्षणानंतरच ते रुग्णालयातच राहणार की त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवले जाणार, याचा अंतिम निर्णय घेतला जाईल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Origami Day: कसा झाला कागद दुमडण्याच्या सुंदर जपानी कलेचा उगम? वाचा यामागील रंजक इतिहास

 ऑगस्ट २०२३ पासून तुरुंगात आहेत कुरेशी

शाह महमूद कुरेशी हे गेल्या काही काळापासून अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहेत. ९ मे २०२३ रोजी पाकिस्तानात झालेल्या हिंसक निदर्शने आणि दंग्याशी संबंधित विविध प्रकरणांमध्ये त्यांना ऑगस्ट २०२३ मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते वेगवेगळ्या कारागृहात बंदी आहेत. याआधीही प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे त्यांना विविध वैद्यकीय तपासण्यांसाठी आणि उपचारांसाठी रुग्णालयात न्यावे लागले होते. राजकीय कटकारस्थानामुळेच त्यांना हेतुपसर डांबण्यात आल्याचा आरोप पक्षाकडून सतत केला जात आहे.

 मुलीचा टाहो आणि पाकिस्तान सरकारच्या हेतूंवर गंभीर सवाल

वडिलांच्या प्रकृती बिघडल्याची आणि ते तुरुंगात पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर त्यांची मुलगी मेहेर बानो यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी थेट पाकिस्तान सरकारवर निशाणा साधत आपल्या वडिलांच्या सुरक्षिततेबद्दल आणि सुटकेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

मेहेर बानो यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अत्यंत भावूक होत सांगितले की, “साडेतीन वर्षांपूर्वी माझे वडील पूर्णपणे निरोगी, कणखर आणि स्वाभिमानी व्यक्ती होते. परंतु, राजकीय द्वेषापोटी त्यांना पूर्णपणे खोट्या आणि बनावट आरोपांखाली तुरुंगात खितपत ठेवण्यात आले आहे. त्यांनी अत्यंत धैर्याने ‘सिफर प्रकरण’ (Cypher Case) लढले आणि आपल्या तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : North Korea : किम जोंग उनच्या घराण्यात मुलगी विरुद्ध बहीण; उत्तर कोरियाच्या सत्तेची सूत्रे नेमकी कोणाच्या हातात जाणार?

 “जामीन मिळूनही तुरुंगात ठेवणे अन्यायकारक”

मेहेर बानो यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर ताशेरे ओढत म्हटले की, न्यायालयात अनेकदा सुनावणी होऊनही त्यांच्या वडिलांना अडकवून ठेवण्याचे षड्यंत्र सुरू आहे. कुरेशी यांच्या जामीन अर्जांवर ९० पेक्षा जास्त वेळा सुनावणी पार पडली आहे, परंतु सरकारकडून किंवा यंत्रणांकडून जाणूनबुजून आवश्यक कागदपत्रे व रेकॉर्ड न्यायालयात सादर केले जात नाहीयेत.

ज्या व्यक्तीने आपल्या आयुष्याची तब्बल चार दशकांहून अधिक वर्षे पाकिस्तानच्या राजकारणाला आणि देशाच्या सेवाभावाला दिली आहेत, ज्यांनी दोनदा देशाचे परराष्ट्र मंत्री म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळली आहे आणि पीटीआयचे उपाध्यक्ष म्हणून देशातील संविधान व लोकशाही टिकवण्यासाठी लढा दिला आहे, त्यांच्यासोबत असा अमानुष व्यवहार होणे अत्यंत निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी तात्काळ न्याय आणि आपल्या वृद्ध वडिलांच्या सुटकेची तीव्र मागणी केली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: शाह महमूद कुरेशी कोण आहेत?

    Ans: शाह महमूद कुरेशी हे पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि इम्रान खान यांच्या 'पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ' (PTI) पक्षाचे उपाध्यक्ष आहेत.

  • Que: तुरुंगात त्यांना काय दुखापत झाली?

    Ans: लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात चालत असताना चक्कर आल्याने ते खाली कोसळले, ज्यामुळे त्यांच्या हाताला आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झाली.

  • Que: त्यांच्या प्रकृतीनंतर कुणी प्रतिक्रिया दिली?

    Ans: त्यांची मुलगी मेहेर बानो यांनी चिंता व्यक्त केली असून, वडिलांच्या सुटकेची आणि न्यायाची मागणी केली आहे.

Web Title: Pakistan former foreign minister shah mahmood qureshi collapses in jail injured hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 12:22 PM

Topics:  

  • Imran khan
  • pakistan army
  • Pakistan News

संबंधित बातम्या

Pakistan News : पाकिस्तानात प्रसिद्ध महिला टीव्ही अँकर राबिया अहसान यांची गोळ्या झाडून हत्या; पती पोलिसांच्या ताब्यात
1

Pakistan News : पाकिस्तानात प्रसिद्ध महिला टीव्ही अँकर राबिया अहसान यांची गोळ्या झाडून हत्या; पती पोलिसांच्या ताब्यात

Pakistan : पाकिस्तानात दिवाळीच्या दिवशी हिंदूंचे कौतुक; पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जिनांचा उल्लेख करत केला मोठा दावा
2

Pakistan : पाकिस्तानात दिवाळीच्या दिवशी हिंदूंचे कौतुक; पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जिनांचा उल्लेख करत केला मोठा दावा

Pakistan News : मुख्यमंत्र्यांच्या पाकिस्तान दौऱ्यादौऱ्यापूर्वी शिक्षण व्यवस्था ठप्प; मरियम नवाज यांच्यामुळे परीक्षा रद्द
3

Pakistan News : मुख्यमंत्र्यांच्या पाकिस्तान दौऱ्यादौऱ्यापूर्वी शिक्षण व्यवस्था ठप्प; मरियम नवाज यांच्यामुळे परीक्षा रद्द

Pakistan Breaking : पाकिस्तान बुडाला दुप्पट कर्जात; १३५ अब्ज डॉलर पार,चीन सर्वात मोठा कर्जदाता
4

Pakistan Breaking : पाकिस्तान बुडाला दुप्पट कर्जात; १३५ अब्ज डॉलर पार,चीन सर्वात मोठा कर्जदाता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.