Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Blast in Pakistan : चिथडे उडाले , सात जणांचा मृत्यू ;खैबर पख्तूनख्वात आत्मघाती बॉम्बहल्ला

Blast in Pakistan : पाकिस्तानच्या स्वातमधील काबूल पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात सात जण ठार आणि १८ जण जखमी झाले. शांतता आंदोलनादरम्यान झालेल्या या स्फोटानंतर परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 02, 2026 | 09:10 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • परिसर सील करण्यात आला असून, तपास सुरू आहे.
  • हल्ला शांतता रॅलीदरम्यान झाला.
  • वाचा सविस्तर बातमी!
Blast in Pakistan : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील स्वात जिल्ह्यात रविवारी एक आत्मघाती हल्ला झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काबल पोलीस ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर झालेल्या या स्फोटात किमान सात जण ठार झाले आणि १८ जण जखमी झाले.

स्वात जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांच्या (डीपीओ) म्हणण्यानुसार, आत्मघाती हल्लेखोर पोलीस ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्याला प्रवेशद्वारावर अडवून त्याची झडती घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने आपल्या शरीराला बांधलेल्या स्फोटकांचा स्फोट घडवून आणला.

या भागात अशा प्रकारचे हल्ले नवीन नाहीत. खैबर पख्तूनख्वा हा अफगाणिस्तानच्या सीमेलगतचा प्रांत असून तेथे Tehrik-e-Taliban Pakistan (TTP) आणि इतर दहशतवादी गटांची हालचाल वारंवार दिसून येते. त्यामुळे सुरक्षा चौक्या, पोलीस, लष्कर किंवा सरकारसमर्थक गट हे अनेकदा हल्ल्यांचे लक्ष्य ठरतात

Iran US War : मोजतबा खामेनी कुठे लपले आहेत? गेल्या १५० दिवसांपासून कोणताही सुगावा लागलेला नाही .

परिसर सील करण्यात आला असून, तपास सुरू आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’नुसार, पोलिसांनी सांगितले की, घटनेनंतर सुरक्षा दलांनी तात्काळ परिसर सील केला. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले, तर फॉरेन्सिक पथके आणि तपास यंत्रणा घटनास्थळावरून पुरावे गोळा करत होत्या. पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर असून कोणत्याही संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी अतिरिक्त दल तैनात करण्यात आले आहे.

Defense News : ब्रह्मोसवर थायलंडची नजर; भारताच्या क्षेपणास्त्र प्रणालीत वाढला रस..

हल्ला शांतता रॅलीदरम्यान झाला.

अलिकडच्या काही महिन्यांत स्वात खोऱ्यात वाढलेल्या दहशतवादी कारवायांविरोधात कबाल चौकात मोठ्या संख्येने लोक निदर्शने करत असताना हा स्फोट झाला. स्वात अमन जिरगा या स्थानिक संघटनेने आयोजित केलेल्या या शांतता रॅलीमध्ये लोकांनी परिसरात सुरक्षा बहाल करण्याची आणि दहशतवादी हिंसाचार थांबवण्याची मागणी केली.स्फोटामुळे घटनास्थळी घबराट पसरली आणि पोलीस, बचाव पथके व स्थानिक प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य सुरू केले. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. सुरक्षा यंत्रणा या हल्ल्यामागील व्यक्ती आणि संभाव्य कटाचा तपास करत आहेत.

 

Web Title: Blast in pakistan bodies blown to pieces seven dead suicide bombing in khyber pakhtunkhwa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 09:04 PM

Topics:  

  • Blast in Pakistan
  • Sucide News
  • Terrorist Attack

संबंधित बातम्या

डॉ मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणात मोठी कारवाई; पतीलाच पोलिसांनी ठोकल्या बेड्या
1

डॉ मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणात मोठी कारवाई; पतीलाच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.