
Breaking Latest World News International News Headlines Live updates News in marathi
International breaking Live News Marathi : इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदीवर स्वाक्षरी झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धबंदीत महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा केला आहे. दरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ट्रम्प यांनी आणखी एक दावा केला होता की इराणची सर्व अणुस्थळे पूर्णपणे नष्ट झाली आहेत, परंतु अमेरिकन गुप्तचर अहवालानुसार, असे घडलेले नाही. दिवसभरातील सर्व अपडेट्स खाली वाचा…
25 Jun 2025 05:32 PM (IST)
अमेरिकेच्या बंकर बस्टर हल्ल्यानंतर इराणचा अणुकार्यक्रम उद्ध्वस्त झाल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जाहीर करत असतानाच, पेंटागॉनच्या गुप्तचर अहवालाने संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ माजवली आहे. या अहवालात स्पष्ट सांगितले आहे की, इराणच्या अणुस्थळांचे फारसे नुकसान झालेले नाही आणि केवळ २ लहान तांत्रिक गोष्टी पूर्ण केल्या तर इराण लगेच अण्वस्त्र तयार करू शकतो.
Not “totally obliterated”. Trump didn’t wait for damage report following his bombing of Iran’s N plants. Pentagon assessment is that Iran’s fissile material remains intact. Trump doesn’t know “what the fuck” he’s doing. Australia should dissociate itself from this US president. pic.twitter.com/7l7djZvoHR
— Quentin Dempster (@QuentinDempster) June 24, 2025
credit : social media
25 Jun 2025 04:59 PM (IST)
एन. सत्य मूर्ती या तज्ज्ञाच्या मतानुसार, तुर्की गेल्या दोन दशकांपासून हिंद महासागर क्षेत्रात (IOR) कायमस्वरूपी उपस्थिती निर्माण करण्याच्या रणनीतीवर काम करत आहे. चीनसारखे महासत्ता बनण्याच्या मार्गावर तुर्की सध्या पाकिस्तान, मालदीव यांसारख्या देशांशी सैनिकी-सामरिक सहकार्य वाढवून आपल्या प्रभावाचे वर्तुळ विस्तारत आहे.
Turkish and Pakistani navies held joint exercises in the Eastern Mediterranean 🇵🇰🇹🇷
Pakistani Navy corvette, namely the PNS Babur, which is one of the corvettes of the Turkish MILGEM project built by the Turkish shipyard for the Islamabad Navy, is currently sailing in the… pic.twitter.com/tvDJjwL7us
— Global Defense Insight (@Defense_Talks) June 12, 2024
credit : social media
25 Jun 2025 04:06 PM (IST)
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सौदी अरेबियाच्या क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी संवाद साधून भारताशी चर्चेसाठी तयारी दर्शवली आहे. त्यांनी सौदी नेतृत्वाला विनंती केली आहे की, भारताशी शांततापूर्ण चर्चा घडवून आणण्यासाठी ते मध्यस्थी करावी. शरीफ यांनी स्पष्टपणे नमूद केले की, POK, सिंधू पाणी करार, दहशतवाद, आणि व्यापाराशी संबंधित सर्व मुद्द्यांवर पाकिस्तान चर्चेसाठी तयार आहे. पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, शाहबाज शरीफ यांनी सौदी क्राउन प्रिन्स यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि भारताशी संबंध सुधारण्यासाठी सौदी अरेबियाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
🚨🇮🇳🇵🇰Pak PM offers 'meaningful dialogue' with India - Radio Pakistan
"Pakistan is ready to engage in a meaningful dialogue with India on all outstanding issues, including Jammu and Kashmir, water, trade and terrorism," Shehbaz Sharif told Saudi Arabia's Crown Prince. pic.twitter.com/aOwUGLHYRL
— Sputnik India (@Sputnik_India) June 25, 2025
credit : social media
25 Jun 2025 04:03 PM (IST)
Israel Iran War News Marathi : तेहरान : इराण आणि इस्रायलमध्ये १२ दिवसांपासून सुरुअसलेला संघर्ष आता निवळला आहे. मात्र तणाव अद्यापही कायम आहे. याच वेळी इराणने भारताचे देखील आभार मानले आहे. इस्रायलसोबतच्या युद्धादरम्यान भारत आणि भारतीय जनतेने दिलेले पाठिंव्याबद्दल भारताचे आभार मानले आहेत.
The Iranian embassy issues a statement, thanking people of India who 'stood firmly & vocally' with Iran. Statement pic.twitter.com/OVhI2nya58
— Sidhant Sibal (@sidhant) June 25, 2025
25 Jun 2025 03:29 PM (IST)
Axiom-4 mission Launch : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी २५ जून रोजी एक नवा इतिहास रचला आहे. शुभांशू शुक्ला यांनी नासाच्या Axiom-4 मोहीमेंतर्गत अंतराळात उड्डाण घेतले आहे. त्यांच्या उड्डाणावेळी त्यांची आई आणि त्यांच्या कुटुंबीय अत्यंत भावुक झाले. हा क्षण त्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत अभिमाास्पद असल्याचे त्यांच्या वडिलांना म्हटले. नी केवळ देशाचेच नव्हे तर आपल्या कुटुंबीयांचे देखील नाव उंचावले आहेे.
#WATCH लखनऊ: भारतीय वायुसेना के ग्रुप कैप्टन और अंतरिक्ष यात्री शुभांशु शुक्ला की मां आशा शुक्ला अपने बेटे के लिए खुशी से भावुक हो गईं, जो #AxiomMission4 का हिस्सा है। pic.twitter.com/s2mSrJtWIt
— ANI_HindiNews (@AHindinews) June 25, 2025
25 Jun 2025 01:52 PM (IST)
अमेरिकेच्या न्यूयॉर्कच्या २०२५च्या मेयरपदासाठी निवडणुका होणार आहेत. यासाठी जोरदार लढत सुरु आहे. यामध्ये प्रथमच भारतीय वंशांचे आणि मुस्लिम समाजातील जहरान ममदानी उमेदवारपदी उभे राहिले आहेत. दरम्यान मंगळवारी (२४ जून) रात्री न्यू यॉर्कच्या महापौरपदासाठी डेमोक्रॅटिक प्रायमरीमध्ये ममदानींना मोठा विजय मिळला आहे. यामुळे त्यांची महापौर बनण्याची शक्यता अधिक वाढली आहे. ममदानींनी प्रसिस्पर्धी आणि माजी गव्हर्नर ॲंड्र्यू कुओमो यांचा पराभव केला आहे.
25 Jun 2025 01:20 PM (IST)
सध्या इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी लागू झाली आहे. मात्र दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण अद्यापही आहेच. याच दरम्यान इराणने इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादविरुद्ध मोठी कारवाई देखील केली होती. यामुळे मोसादला मोठा झटका मिळाला होता. याअंतर्गत बुधवारी (२५ जून) सकाळी इस्रायलसाठी जासूसी करणाऱ्या आणि हत्येचा कट रचणाऱ्या तीन जणांना फाशीची शिक्षा दिली आहे. तसेच गेल्या १२ दिवसांत इस्रायलसाठी हेरगिरी करणाऱ्या ७०० जणांना अटक केली आहे.
25 Jun 2025 01:07 PM (IST)
ही माहिती एका जागतिक वृत्तसंस्थेने इराणच्या सरकारी माध्यम नूरन्यूजच्या हवाल्याने दिली आहे. तेहरानस्थित तस्निम वृत्तसंस्थेनेही या घडामोडीला दुजोरा देत संसदीय समितीचे प्रवक्ते इब्राहिम रेझाई यांचे विधान प्रसिद्ध केले आहे. त्यांनी सांगितले की, “इराणच्या अणुसुविधांवर सुरक्षा हमी मिळेपर्यंत IAEA ला कोणतीही माहिती, तपासणीची परवानगी किंवा देखरेखीचे कॅमेरे बसवण्याची मुभा दिली जाणार नाही.”
Iran's parliament has passed a bill halting cooperation with the IAEA.
The measure will bar IAEA inspectors from accessing Iran until the security of its nuclear facilities is ensured. pic.twitter.com/f2cMSAWHkN
— Seyed Mohammad Marandi (@s_m_marandi) June 25, 2025
credit : social media
25 Jun 2025 12:43 PM (IST)
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्रायली कारवाईला "बेकायदेशीर" संबोधले असून, त्यांनी म्हटले की "इराणची अणुक्षमता धोकादायक असली, तरी त्यावरील हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीबाहेर होता." मॅक्रॉन यांच्या या विधानामुळे फ्रान्सने स्पष्ट संकेत दिले आहेत की, जागतिक स्थैर्य राखण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आणि मुत्सद्दीपणा आवश्यक आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांतील फ्रान्सचे राजदूत जेरोम बोनाफॉन्ट यांनीही गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले, “जर इराणने लवकरच आंतरराष्ट्रीय अणुकरारात परतण्याचा मार्ग निवडला नाही, तर फ्रान्ससह युरोपमधील अनेक देश त्यांच्यावर पुन्हा निर्बंध लादण्याचा विचार करत आहेत.”
🚨 Breaking: The IDF confirms Iran launched missiles into Israel even after Trump‑brokered ceasefire began. Netanyahu warned any breach would be met with a ‘forceful’ response, so looks like the truce started with conflict, not calm. pic.twitter.com/8qQUg0kIdm
— Runims (@RealRunims) June 24, 2025
credit : social media
25 Jun 2025 12:14 PM (IST)
Axiom-4 mission Launch : आजचा दिवस भारताच्या अंतराळ इतिहासातील सुवर्णक्षण आहे. भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी अमेरिकेच्या स्पेसएक्स आणि अॅक्सिओम स्पेस यांच्या Axiom-4 (Ax-4) मोहिमेअंतर्गत अंतराळात झेप घेतली आहे. ही मोहीम भारतासाठी विशेष आहे. शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) जाणारे पहिले भारतीय ठरले आहेत.
25 Jun 2025 11:39 AM (IST)
अमेरिकन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उपाध्यक्ष व्हान्स यांनी म्हटले की, "इराणच्या फोर्डो, नतांझ आणि इस्फहान या तीन प्रमुख अणुउद्योग स्थळांवर अमेरिकेने हल्ला केल्यानंतर, 400 किलो युरेनियम गायब झाल्याचे निष्पन्न झाले आहे." हे युरेनियम 60 टक्क्यांपर्यंत समृद्ध असून, अणुबॉम्ब तयार करण्यासाठी आवश्यक असलेला 90 टक्क्यांपर्यंतचा स्तर गाठायला फक्त काही आठवडे लागले असते, असे त्यांनी स्पष्ट केले.
Tonight, Iran still has 400kg of enriched Uranium. "Somewhere"
The Ayahtollah Ali Khamenei is still in power.
Iranians are on the street proclaiming Victory. The vast majority of its missile forces intact.
And Israels "impregnable" defences dont look so impregnable anymore pic.twitter.com/UakqV9KMum
— Chay Bowes (@BowesChay) June 24, 2025
credit : social media
25 Jun 2025 11:12 AM (IST)
2019 मध्ये भारताच्या विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना पकडल्याचा दावा करणारे पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी मेजर मुईझ यांना दक्षिण वझिरिस्तानमध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या दहशतवादी संघटनेने ठार मारल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपमधील वरिष्ठ अधिकारी असलेल्या मुईझ यांच्या मृत्यूने पाकिस्तानच्या लष्करात खळबळ उडाली आहे.
Pakistan Army's Major Moiz Abbas killed by Pak Taliban (TTP) in South Waziristan today.
Moiz claim to fame was that he got the credit for "capturing" India's Wing Commander Abhinandan Varthaman in February 2019. pic.twitter.com/2EKIf74cHr
— Incognito (@Incognito_qfs) June 24, 2025
credit : social media
25 Jun 2025 10:48 AM (IST)
स्पेसएक्सने आपल्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून दिलेल्या माहितीनुसार, प्रक्षेपणासाठी हवामान ९० टक्के अनुकूल आहे. "सर्व काही नियोजनानुसार सुरू आहे आणि हवामान देखील सहकार्य करत आहे," असे स्पेसएक्सने म्हटले आहे. त्यामुळे अडथळा न येता अॅक्स-४ मोहिमेचे उड्डाण अपेक्षित वेळेस होण्याची शक्यता आहे.
Axiom-4 mission, carrying Indian astronaut Shubhanshu Shukla to space, will launch today at 12:01 PM IST from Kennedy Space Center, Florida, USA.
The launch was initially scheduled to take off on May 29 but was repeatedly delayed due to technical issues, weather conditions and… pic.twitter.com/kUdiFSsrMw
— All India Radio News (@airnewsalerts) June 25, 2025
credit : social media
25 Jun 2025 10:28 AM (IST)
Ax-4 मोहिमेच्या प्रक्षेपणासाठी हवामान अनुकूल आहे. अॅक्सिओम स्पेसच्या Ax-4 मोहिमेच्या प्रक्षेपणासाठी हवामान ९० टक्के अनुकूल असल्याची माहिती स्पेसएक्सने दिली आहे. स्पेसएक्सने एक्सवर लिहिले आहे की, "सर्व काही ठीक दिसते आहे आणि बुधवारी (दि. 25 जून 2025) अॅक्सिओम स्पेसच्या Ax-4 मोहिमेच्या प्रक्षेपणासाठी हवामान ९० टक्के अनुकूल आहे.
All systems are looking good for Wednesday’s launch of @Axiom_Space’s Ax-4 mission to the @Space_Station and weather is 90% favorable for liftoff. Webcast starts at 12:30 a.m. ET → https://t.co/6RXoybzInV pic.twitter.com/988o685PVF
— SpaceX (@SpaceX) June 24, 2025
credit : social media
25 Jun 2025 09:38 AM (IST)
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प नाटो सहयोगी देशांच्या वार्षिक बैठकीसाठी नेदरलँड्समध्ये पोहोचले आहेत. ते अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांबद्दल आणि इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीबद्दल आनंद व्यक्त करणार होते, परंतु अलिकडच्या अहवालांमुळे त्यांच्या योजना बिघडल्या आहेत.
25 Jun 2025 09:16 AM (IST)
वॉशिंग्टनमध्ये माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की या लोकांना शांत व्हावे लागेल, हे हास्यास्पद आहे. मी जे पाहिले ते मला अजिबात आवडले नाही, ना इस्रायलचा हल्ला ना इराणचे प्रत्युत्तर. ते म्हणाले, "मी पाहिले की आम्ही करारावर स्वाक्षरी करताच इस्रायलने सर्वात मोठा हल्ला केला. यापूर्वी कधीही न पाहिलेला. मला हे अजिबात आवडले नाही. मी इराणवरही खूश नाही. मी त्यांना १२ तास दिले, त्यांनी फक्त एका तासात सर्व काही संपवले."
Trump is PISSED about the ceasefire violations.
"We basically have two countries that have been fighting so long and so hard that they don't know what the f*** they're doing." pic.twitter.com/DVGHuUP3Oj
— Kassy Akiva (@KassyAkiva) June 24, 2025
credit : social media
25 Jun 2025 08:50 AM (IST)
पेंटागॉनचे मुख्य प्रवक्ते शॉन पार्नेल म्हणाले होते की अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांवर अनेक बॉम्ब टाकले आहेत. त्यांनी सांगितले की या काळात ३०,००० पौंड म्हणजेच सुमारे १३,६०७ किलो वजनाचे बॉम्ब टाकण्यात आले आहेत. यामुळे इराणच्या अणुस्थळांचे मोठे नुकसान झाले आहे, परंतु गुप्तचर अहवालांनुसार, इराणची अणु क्षमता पूर्णपणे संपलेली नाही. हे निश्चितच खरे आहे की वेग मंदावेल.
How the US attacked Iranian nuclear facilities pic.twitter.com/C8Mo1mzHjK
— Make L.A. Great Again 🇺🇸 (@lalovestrump) June 22, 2025
credit : social media