Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Deportation : न अपील, न दाद! अमेरिकेतून हजारो भारतीयांची होणार हकालपट्टी; ट्रम्प सरकारचा मोठा प्लॅन

US Deportation Update : अमेरिकेतून पुन्हा भारतीयांना हाकलण्यात येणापर आहे. हजारो भारतीयांना डिटेन्शन केंद्रात ठेवण्यात आले आहे. गेल्या काही काळात बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात अमेरिकेने कारवाई अधिक कडक आणि तीव्र केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 19, 2026 | 04:38 PM
US Deportation

US Deportation

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा मोठा झटका
  • हजारो भारतीयांवर पुन्हा डिपोर्टेशनची टांगती तलवार
  • यापूर्वी २०२५ मध्येही हजारो लोकांना पाठवले होते मायदेशी
US Deportation News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात (Illegal Immigration) कारवाई पुन्हा अधिक तीव्र केली आहे. याचा सर्वाधिक फटका भारतीयांना बसत असून सुमारे १८ हजार भारतीयांची परत मायदेशी रवानगी होण्याची शक्यता आहे. यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांची चिंता वाढली आहे.

US Visa Rules : व्हिसा नियमात मोठा बदल! US मध्ये राहण्याची मर्यादा आता ४ वर्षे; लाखो भारतीयांना धोका

ट्रम्प सरकारने स्थलांतर धोरणे अधिक कठोर करत मोठ्या प्रमाणात छापेमारी सुरु केली आहे. अमेरिकेचे इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) विविध राज्यांमध्ये कारवाई करत आहे. बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणाऱ्यांना तातडीने ताब्यात घेतले जात आहे.

डिपोर्टेशन मोहिमेला गती

डिपोर्टेशन मोहिमेला अधिक गती मिळाली असबन यासाठी ट्रम्प सरकारने टेक्सासच्या एल पासो आणि कॅलिफोर्नियात डिटेंशन सेंटर उभी केली आहे. या ठिकाणी अवैधरित्या अमेरिकेत राहणाऱ्यांना ताब्यात ठेवण्यात येत आहे. या केंद्रात हजारो स्थलांतरितांना ठेवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

कायदेशीर संधी कमी

धक्कादायक बाब म्हणजे स्थलांतरविषयक प्रकरणे हातळणाऱ्या काही वकिलांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. वकिलांच्या मते, पूर्वी संबंधित व्यक्तींना आपली बाजू मांडण्याची संधी मिळत होती. मात्र, ट्रम्प सरकारने अनेकांना डिटेन्शन सेंटमध्ये पाठवल्याने त्यांना कोणताही कायदेशीर मार्गाचा वापर करुन आपली बाजू मांडणे अशक्य जात आहे.

२०२५ मध्ये हजारो भारतीयांची हाकलपट्टी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या कार्यकाळाची शपथ घेतल्यानंतर बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून आतापर्यंत हजारो भारतीयांना मायदेशी परत पाठवण्यात आले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०२५ अमेरिकेतून ३५६७ भारतीय नागरिकांना डिपोर्ट करण्यात आले होते. तर २०२६ जून मध्ये १०७६ लोकांना मायदेशी पाठवण्यात आले आहे.

फेब्रुवारी २०२५ मध्ये अमेरिकेने पहिल्यांदाच १०४ भारतीयांनुा लष्करी विमानाद्वारे परत पाठवले होते. यावेळी काही नागरिकांच्या हतात आणि पायात बेड्या असल्याचे फोटो समोर आले होते. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

ट्रम्प यांच्या दुसऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या काळात अमेरिकेतील स्थलांतर धोरण अधिक कठोर होत आहे. यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांची चिंता वाढली आहे. अवैधपणे वास्तव करणाऱ्या भारतीयांवर सर्वाधिक परिणाम होत आहे.

India Japan Bullet Train : भारतावर जपानच्या माजी मंत्र्यांचा गंभीर आरोप; बुलेट ट्रेन प्रकल्पावरुन वाद

Web Title: Us deportation trump plan to deport thousands of indians

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Illegal immigration
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू
1

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य
2

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य

PM Modi-Meloni: मेलोनी यांच्या नावे ऐतिहासिक विक्रम! इटलीतील सर्वाधिक काळ टिकलेले सरकार; पंतप्रधान मोदींची भावूक पोस्ट
3

PM Modi-Meloni: मेलोनी यांच्या नावे ऐतिहासिक विक्रम! इटलीतील सर्वाधिक काळ टिकलेले सरकार; पंतप्रधान मोदींची भावूक पोस्ट

Nepal Flood : त्रिशुली-3A जलविद्युत बोगद्यात 9 दिवसांनंतर चमत्कार, 2 कामगारांची जिवंत सुटका, पहा VIDEO
4

Nepal Flood : त्रिशुली-3A जलविद्युत बोगद्यात 9 दिवसांनंतर चमत्कार, 2 कामगारांची जिवंत सुटका, पहा VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.