Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top International Headlines Today : यूक्रेनचा रशियामध्ये कहर सुरुच; 72 तासांत तीन हजाराहून सैनिकांची हत्या

International Breaking news live: आज 13 मार्च 2025 रोजी परदेशात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी इथे मिळतील. जगाशी संबंधित सर्व ब्रेकिंग न्यूजसाठी हे पेज रिफ्रेश करत रहा...

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 13, 2025 | 05:33 PM
Breaking Latest World News International News Headlines Live updates News in marathi

Breaking Latest World News International News Headlines Live updates News in marathi

Follow Us
Close
Follow Us:

एकीकडे जगात व्यापारयुद्ध सुरू झाले आहे, तर दुसरीकडे अमेरिकन शेअर बाजार आणि भारतासह सर्व आशियाई बाजारांमध्ये प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अमेरिकन बाजारातील घसरणीमुळे मंदीची भीतीही वाढत आहे. दरम्यान, रिच डॅड, पुअर डॅड या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी इतिहासातील सर्वात मोठ्या घसरणीचा इशारा दिला आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर (आता एक्स) वर एक पोस्ट शेअर केली आहे.

केवळ इशारे देण्यापुरते मर्यादित न राहता कियोसाकीने आपली गुंतवणूक धोरणही शेअर केले. तो म्हणाला, ‘मी रिअल इस्टेट, सोने, चांदी आणि बिटकॉइन खरेदी करत राहीन.’ उल्लेखनीय आहे की याआधीही कियोसाकीने या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता.

The liveblog has ended.
  • 13 Mar 2025 05:16 PM (IST)

    13 Mar 2025 05:16 PM (IST)

    चीनच्या हेरगिरीला आळा घालण्यासाठी तैवानने आखली ‘ही’ नवी योजना; जाणून घ्या

    तैवान आणि चीनमधील संघर्ष गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. तैवान स्वत:ला स्वतंत्र देश मानतो, तर चीन त्याला आपल्या देशाचा भाग मानतो आणि सतत तैवानवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो. हा संघर्ष जगजाहीर आहे. तैवानच्या म्हणण्यानुसार, चीन हा त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेला कमकुवत करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. हेरगिरी, सायबर हल्ले, खोटी माहिती पसरवणे, आणि ग्रे झोन टॅक्टिक्स यांचा यामध्ये समावेश आहे. यावर आळा घालण्यासाठी तैवानच्या सरकारने एक मोठी योजना आखली आहे. तैवान पुन्हा एकदा लष्करी न्यायाधीशांना नियुक्त करण्याचा विचार करत आहेत.

  • 13 Mar 2025 04:23 PM (IST)

    13 Mar 2025 04:23 PM (IST)

    पॅलेस्टिनी समर्थक विद्यार्थी आक्रमक; डोनाल्ड ट्रम्प विरोधात जोरदार घोषणाबाजी, कारण काय?

    अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये मंगळवारी (11 मार्च) ट्रम्प प्रशासनाविरोधी पॅलेस्टिनी समर्थकांनी मोठा मोर्चा काढला. हा मोर्चा प्रामुख्याने मध्य पूर्व संकट, अमेरिका विद्यापीठांमधील विद्यार्थी आंदोलन, तसेच ट्रम्प प्रशासनाच्या स्थलांतर धोरणांवरविरोधात होता. या आंदोलनात अनेक लोक सहभागी झाले, आणि पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले. काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठासाठी असलेली 400 मिलियन डॉलरची फेडरल फंडिंग रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयानंतर मोठ्या प्रमाणात मोर्चा सुरु झाला.

  • 13 Mar 2025 02:43 PM (IST)

    13 Mar 2025 02:43 PM (IST)

    मंदिरात शिर नसलेली ऐतिहासिक मूर्ती सापडली

    कंबोडियातील जगप्रसिद्ध अंगकोर वाट मंदिर संकुलात पुरातत्वशास्त्रज्ञांनी एक महत्त्वाचा शोध लावला आहे. भारतीय आणि कंबोडियन तज्ज्ञांच्या पथकाला येथे १२ व्या किंवा १३ व्या शतकातील एका ऐतिहासिक बुद्ध मूर्तीचे धड सापडले आहे. विशेष म्हणजे हे धड जवळजवळ एक शतकापूर्वी सापडलेल्या डोक्याशी जुळते, ज्यामुळे त्याची ओळख टिकवून ठेवता येते. उत्खननादरम्यान, ही मूर्ती एकूण २९ तुकड्यांमध्ये सापडली, जी एकत्र जोडल्यावर संपूर्ण मूर्ती बनते असे दिसते.

  • 13 Mar 2025 02:27 PM (IST)

    13 Mar 2025 02:27 PM (IST)

    पुतिन रशियात या १५ वर्षांच्या तरुणांना बॉम्ब बनवायला लावतात!

    युक्रेन आणि रशिया यांनी अनेकदा एकमेकांवर तोडफोडीसाठी नागरिकांची भरती केल्याचा आरोप केला आहे. पण यावेळी प्रकरण अधिक धोकादायक आहे. रशिया केवळ तरुणांना दिशाभूल करत नाही तर त्यांचा वापर करून त्यांना मारत आहे. युक्रेनियन शहरात इवानो-फ्रँकिव्हस्कमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • 13 Mar 2025 02:08 PM (IST)

    13 Mar 2025 02:08 PM (IST)

    पाकिस्तान आणि चीन दोघांनाही एकाच वेळी धडा शिकवणारा बीएलए कमांडर

    पाकिस्तानमध्ये अलिकडेच झालेल्या ट्रेन अपहरणानंतर, बलुच लिबरेशन आर्मी आणि त्यांचे कमांडर इन चीफ बशीर झेब चर्चेत आहेत. झेबच्या नेतृत्वाखाली बीएलएने पाकिस्तानी सैन्याला एक कठीण आव्हान दिले आहे. २०१८ मध्ये बीएलएची कमान हाती घेतल्यानंतर, जेबने ते एक शक्तिशाली संघटना बनवले आहे. खिशातील युक्त्या आणि आत्मघाती बॉम्बर्सचा वापर हा पाकिस्तानसाठी एक मोठा चिंतेचा विषय आहे.

  • 13 Mar 2025 01:50 PM (IST)

    13 Mar 2025 01:50 PM (IST)

    रशियाच्या युद्धबंदीसाठी चार अटी

    • पहिली अट यूक्रेनला नाटो सदस्यत्व मिळू नये अशी अटी रशियाने अमेरिकेसमोर ठेवली आहे. रशियाला भिती आहे की, यूक्रेनला नाटोचे सदस्यत्व मिळाल्यास त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.
    • तसेच कोणत्याही आंतरराष्ट्रीय सैन्य गटाने यूक्रेनमध्ये आपले लष्कर तैनात करु नयेत, रशियाच्या विरोधात आघाडी तयार करु नये ही दुसरी अत्यंत महत्त्वाची अट पुतिन यांनी मांडली आहे.
    • तिसरी अट म्हणजे रशियाने क्रीमीया, डोनेत्स्क, लुहान्स्क, झापोरिझ्झिया आणि खेरसॉन या चार भागांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळावी.
    • आणि चौथी शेवटची अट म्हणजे नाटोचा विस्तार थांबवावा, कारण रशिया नाटोला त्यांच्या सुरक्षेसाठी धोकादायक मानतो.

    रशियाच्या या अटींमुळे अमेरिकेसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अटीं मान्य झाल्या तरच युद्धबंदीसाठी सहमती मिळेल असे रशियाने म्हटले आहे. मात्र या अटींमुळे अमेरिका आणि नाटो देशांची सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता आहे.

  • 13 Mar 2025 01:28 PM (IST)

    13 Mar 2025 01:28 PM (IST)

    Russia-Ukraine War: यूक्रेनचा रशियामध्ये कहर सुरुच; 72 तासांत तीन हजाराहून सैनिकांची हत्या

    एकीकडे यूक्रेन शांततेसाठी युद्धबंदीचा प्रस्ताव सादर करत आहे, तर दुसरीकडे रशियाच्या सैन्यानवर हल्ला सुरुच ठेवला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे सैन्य कुर्स्कवर पुन्हा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. याचदरम्यान यूक्रेनियन लष्कराने रशियाने सैनिकांवर हल्ला करण्यात व्यस्त आहेतो. गेल्या 72 तासांता रशियाचे 3 हजाराहून अधिक सैनिक मारले गेले आहेत. यूक्रेनने 11 मारच रोजी केलेल्या हल्ल्यात 1300, 12 मार्च रोजी 1430 आणि 13 मार्च म्हणजे आज केलेल्या हल्ल्यात 1200 रशियन सैनिकांचा खात्मा केला आहे

  • 13 Mar 2025 12:42 PM (IST)

    13 Mar 2025 12:42 PM (IST)

    मार्क कार्नी उद्या कॅनडाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार

    कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांचा शपथविधी समारंभ उद्या (14 मार्च) पार पडणार आहे. मार्क कार्नी कॅनडाचे 24 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. भारतीय वेळेनुसार, रात्री 8.30 वाजता राजधानी ओटावा येथे रिडो हॉलच्या बॉलरुममध्ये शपथ समारंभ होणार आहे. कार्नी यांच्याव्यतिरिक्त त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यही यादरम्यान शपथ घेणार आहेत. 9 फेब्रुवारी रोजी झालेल्या लिबरल पक्षाच्या निवडणुकीत 85.9% मतांनी विजय मिळवला. मार्क कार्नी कॅनडाचे विद्यमान पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची जागा घेतील.

  • 13 Mar 2025 12:19 PM (IST)

    13 Mar 2025 12:19 PM (IST)

    भारतात महिला सुरक्षेचा प्रश्न कळीचा; परदेशी तरुणीवर राजधानी दिल्लीत अत्याचार

    राजधानी दिल्लीत महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या वाढत्या घटना दिल्लीतील पोलिसांसाठी आणि नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. आता पुन्हा एकदा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीत एका परदेशी महिलेवर अत्याचार करण्यात आला आहे. या ब्रिटीश तरुणीवर देशाची राजधानी दिल्लीमध्ये लैंगिक अत्याचार झाल्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे दिल्लीसह देशातील सर्वांना मोठा धक्का बसला आहे. सध्या दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

    संपूर्ण प्रकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा

  • 13 Mar 2025 11:55 AM (IST)

    13 Mar 2025 11:55 AM (IST)

    रशिया युद्धबंदीसाठी तयार पण ठेवल्या ‘या’ चार अटी

    गेल्या तीन वर्षाहूंन अधिक काळ सुरु असलेल्या रशिया-यूक्रेन युद्धबंदीसाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान सौदी अरेबियामध्ये अमेरिका आणि यूक्रेनियन अधिकाऱ्यांमध्ये 11 मार्च 2025 रोजी रशिया-यूक्रेन युद्ध थांबवण्यासाठी एक बैठक पार पडली. या बैठीकत 30 दिवसांच्या युद्धबंदीचा प्रस्तावर सादर करण्यात आला. या प्रस्तावाला यूक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सहमती दर्शवली मात्र, रशियाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

  • 13 Mar 2025 11:46 AM (IST)

    13 Mar 2025 11:46 AM (IST)

    हातात तिरंगा घेऊन मॉरिशसमध्ये पंतप्रधान मोदींना पाहण्यासाठी जमली गर्दी

    भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अनेकदा लोकांची गर्दी रस्त्यावर जमताना दिसली आहे, पण मॉरिशसमध्ये जे दिसले ते अनोखे होते. पीएम मोदी मॉरिशसमधील गंगा तलावावर पोहोचले तेव्हा त्यांची एक झलक पाहण्यसाठी अनेक किलोमीटरपर्यंत लोकांची रांग लागली होती. काहींच्या हातात (मॉरीशसचा) ध्वज होता, काहींच्या हातात तिरंगा होता तर काहींच्या हातात पुष्पगुच्छ होते.

  • 13 Mar 2025 11:30 AM (IST)

    13 Mar 2025 11:30 AM (IST)

    सुनिता विल्यम्स यांच्या परतीचा प्रवास पुन्हा लांबणीवर

    गेल्या 9 महिन्यांपासून भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळात स्थानकात अडकल्या आहेत. त्यांच्या परत येण्यासाठी नासा एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्ससोबत मिळून काम करत आहे. दोन दिवसांपूर्वी 16 मार्च रोजी दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर परतणार असल्याची अधिकृत माहिती नासाने जाहीर केली होती. मात्र, अंतराळवीरांची परत येण्याची योजना आणखी लांबणीवर पडली आहे.

  • 13 Mar 2025 11:17 AM (IST)

    13 Mar 2025 11:17 AM (IST)

    ट्रम्पच्या टॅरिफमुळे अमेरिकेत मंदी येऊ शकते का?

    डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, मेक्सिको आणि कॅनडावर लादलेल्या शुल्कामुळे देशाला मंदीचा सामना करावा लागणार आहे की काय, अशी चिंता वाढत आहे. अनेक अमेरिकन आता मंदीची शक्यता किती आहे आणि अर्थव्यवस्थेला घसरण झाल्यास त्याचे काय परिणाम होतील याचा विचार करत आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलच्या मते, गोल्डमन सॅक्सने अलीकडेच अमेरिकेत पुढील वर्षी मंदीची शक्यता 15% वरून 20% पर्यंत वाढवली आहे. अत्यंत खराब आर्थिक डेटा असूनही ट्रम्प प्रशासनाने आपल्या धोरणांवर ठाम राहिल्यास ही शक्यता आणखी वाढू शकते, असा इशारा फर्मने दिला.

Web Title: Breaking latest world news international news headlines live updates news in marathi nrhp 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2025 | 11:00 AM

Topics:  

  • Donald Trump
  • international news
  • World news

संबंधित बातम्या

World War III : जागतिक युद्धाची चाहूल? अमेरिकेच्या आकाशात दिसलं ‘Doomsday Plane’, ट्रम्पचा नेमका प्लॅन काय?
1

World War III : जागतिक युद्धाची चाहूल? अमेरिकेच्या आकाशात दिसलं ‘Doomsday Plane’, ट्रम्पचा नेमका प्लॅन काय?

युद्धभूमीवर ड्रॅगनचा नवा धमाका! मैदानात उतरवले  ‘हे’ घातक शस्त्र, जाणून घ्या किती शक्तीशाली?
2

युद्धभूमीवर ड्रॅगनचा नवा धमाका! मैदानात उतरवले  ‘हे’ घातक शस्त्र, जाणून घ्या किती शक्तीशाली?

Bangladesh Violence : बांगलादेशातील हिंदू अत्याचारावर PM मोदी काढणार तोडगा? आंतरराष्ट्रीय वर्तुळातून होतीये मागणी
3

Bangladesh Violence : बांगलादेशातील हिंदू अत्याचारावर PM मोदी काढणार तोडगा? आंतरराष्ट्रीय वर्तुळातून होतीये मागणी

Bangladesh-Myanmar सीमेवर जोरदार गोळीबार; रोहिंग्या आणि अराकान बंडखोरांच्या चकमकीत एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4

Bangladesh-Myanmar सीमेवर जोरदार गोळीबार; रोहिंग्या आणि अराकान बंडखोरांच्या चकमकीत एकाचा मृत्यू, अनेक जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.