
Bangladesh-Myanmar Border Firing
Iran Protest : इराणमध्ये राजेशाहीचे संकेत? सिंह आणि सुर्यच्या चिन्हांकित जुना ध्वज पुन्हा फडकला
दोन्ही देशांत गेल्या अनेक काळापासून तणावाचे वातावरण असताना गोळीबाराची घटना घडली आहे. यामुळे सीमेजवली राहणाऱ्या नागरिकांचा या फटकाल बसला आहे. लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याचे सांगितले जात आहे. या चकामकीत एका चिमुकलीचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीमेवर कॉक्स बाजार प्रांतात बांगलादेशी रोहिंग्या आणि म्यानमारच्या अराकान बंडखोर गट आणि सशस्त्र दलांमध्ये संघर्ष झाला आहे.
कॉक्स बाजार प्रांत हा जगातील सर्वात मोठ्या रोहिंग्या जमातीच्या निर्वासितांचा प्रदेश आहे. हा प्रांत म्यानमारच्या राखीन भागात येते. यामुळे येथील अराकन आणि सशश्त्र दलांचा रोहिंग्या बांगलादेशींशी सतत संघर्ष होत असतो. याचा परिणाम हो तेथील नागरी आणि प्रादेशिक सुरक्षेवर होते.
शिवाय म्यानमारमध्ये आधीच सरकारच्या सशस्त्र दल आणि अरकरान आर्मीमध्ये संघर्ष होत असतो. गेल्या काही काळात अराकन आर्मी सशस्त्र दलाच्या नियंत्रणाखालील प्रदेशांवर पकड मजबूत करत आहे. यामुळे प्रचंड दबाव वाढला असताना रोहिंग्या आणि अराकन गटांमधील संघर्ष अधिक चिंता निर्माण करत आहे. शिवाय सीमेपलीकडे बांगलादेशातही हिंसाचाराचे वातावरण आहे. अशा परिस्थिती बांगलादेश आणिु म्यानमारच्या सीमांवर परिस्थिती बिघडण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
सध्या या गोळीबारानंतर परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. स्थानिक बांगलादेशी नागरिक आणि रोहिंग्या गटांनी त्यांच्या देशाच्या सीमा सुरक्षकांविरोधात मोर्चाही सुरु केला आहे. तसेच म्यानमारमध्येही अराकरन आर्मी आणि सरकारी लष्करी सशस्त्र दलांमध्ये संघर्ष सुरु आहे. यामुळे ही परिस्थिती सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक मानली जात आहे.
याच वेळी मान्यानमारमध्ये सत्तापालटाच्या पाच वर्षानंतर सार्वत्रिक निवडणुकाही सुरु आहे. या निवडणुकांचा पहिला टप्पा २८ डिसेंबर रोजी लष्करी प्रशासनाच्या नियंत्रणाखाली पार पडला आहे. आज याचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. देशात पुन्हा लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी या निवडणुका घेतल्या जात असल्याचे लष्कराने म्हटले आहे. परंतु याला मानवाधिकार संघटना, विरोध पक्ष आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने विरोध केला आहे. सध्या मान्यानमारमध्ये लष्कराच्या कडेकोट बंदोबस्तामध्ये मतदान पार पडत आहे.