Breaking Latest World News International News Headlines Live updates News in marathi
International breaking Live News Marathi : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात पुन्हा एकदा आक्रमक धोरण स्वीकारत १०४ टक्के अतिरिक्त कर लागू केला आहे. अमेरिकेच्या या व्यापारधोरणामुळे अमेरिका-चीन व्यापारयुद्धात नव्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, चीनने आश्चर्यकारक पाऊल उचलत भारताकडे मैत्रीपूर्ण हात पुढे केला आहे. “हिंदी-चीनी भाई भाई” या जुन्या घोषणेचा आधार घेत चीनने भारतीय नागरिकांना मोठ्या प्रमाणावर व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे. १ जानेवारी ते ९ एप्रिल २०२५ या कालावधीत, भारतातील चिनी दूतावास आणि वाणिज्य दूतावासांनी तब्बल ८५,००० भारतीयांना व्हिसा जारी केले आहेत. दिवसभरातील सर्व अपडेट्स खाली वाचा…






