Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UK Train Crash: ब्रिटनमध्ये हाय-स्पीड ट्रेन रुळावरून घसरली; 3 डबे उलटले, प्रवाशांनी केले या भीषण दृश्याचे वर्णन

Train Derailment News: दक्षिण इंग्लंडमध्ये एक वेगवान प्रवासी रेल्वेगाडी रुळावरून घसरल्याने, तिचे तीन डबे उलटले आणि अनेक प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. यामुळे घबराट पसरली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 14, 2026 | 01:52 PM
High-speed train derails in Britain 3 carriages overturn passengers describe horrific scene

High-speed train derails in Britain 3 carriages overturn passengers describe horrific scene

Follow Us
Follow Us:
  • दक्षिण इंग्लंडमध्ये भीषण रेल्वे अपघात
  • अनेक प्रवासी जखमी, २ जणांची प्रकृती गंभीर
  • रेल्वे वाहतूक ठप्प अन् चौकशीचे आदेश

दक्षिण इंग्लंडमधील (England) ईस्ट ससेक्स (East Sussex) प्रांतात एका प्रवासी ट्रेनचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लंडन व्हिक्टोरिया स्टेशनवरून ईस्टबोर्नकडे (London Victoria to Eastbourne) जाणारी साउदर्न रेल्वेची हाय-स्पीड ट्रेन लेवेस शहराजवळ वेगाने जात असताना अचानक रुळावरून घसरली. या दुर्दैवी अपघातात ट्रेनचे ३ डबे थेट रुळावरून खाली उतरून एका बाजूला उलटले आणि उतारावरून घसरत बाजूच्या शेतात गेले. या अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण ब्रिटनमध्ये खळबळ उडाली असून आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

हा अपघात गुरुवारी दुपारी सुमारे पावणेचार वाजण्याच्या सुमारास घडला. ट्रेनमध्ये सुमारे १५० प्रवासी प्रवास करत होते. अचानक झालेल्या भयानक हादऱ्यामुळे आणि आणीबाणीच्या ब्रेकमुळे (Emergency Brakes) डब्यांमधील प्रवाशांचे साहित्य इकडेतिकडे फेकले गेले आणि काचा फुटून अनेक प्रवासी रक्ताच्या थारोळ्यात पडले. सुदैवाने, या भीषण अपघातात कोणाचाही मृत्यू झाल्याची नोंद झालेली नाही, परंतु दोन प्रवाशांना अत्यंत गंभीर दुखापत झाली आहे.

आपत्कालीन यंत्रणांचे शर्थीचे बचावकार्य; हेलिकॉप्टर अन् रुग्णवाहिका दाखल

अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन ब्रिटीश ट्रान्सपोर्ट पोलीस (BTP), ईस्ट ससेक्स फायर अँड रेस्क्यू सर्व्हिस आणि रुग्णवाहिकांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरात कडक बंदोबस्त तैनात करून दुर्घटनाग्रस्त डब्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी खिडक्यांच्या काचा फोडून घाबरलेल्या व जखमी प्रवाशांची सुटका केली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : CENTCOM: सैनिक ‘USS Abraham Lincoln’ वरून समुद्रात उड्या मारून का करत आहेत आत्महत्या? पेंटागॉनने उघड केले सत्य

गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी हवाई रुग्णवाहिका (Air Ambulances/Helicopters) आणि अनेक रुग्णवाहिका बोलावण्यात आल्या. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. रेल्वे लाईनवरील तिसऱ्या रुळामध्ये असणारा विद्युत प्रवाह (Electrified Rail) धोक्याचा ठरू नये म्हणून आधी पॉवर सप्लाय खंडित करण्यात आला आणि त्यानंतर सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

‘डबा उसळला अन् धुराचे लोट उठले’; प्रवाशांनी सांगितला थरारक अनुभव

या अपघातातून बालंबाल बचावलेल्या रॉब ब्रॅडली (Rob Bradley) या प्रवाशाने अपघाताच्या वेळेसचा अत्यंत भयानक अनुभव कथन केला. रॉब हे आपल्या सहा वर्षांच्या मुलीसोबत चौथ्या डब्यातून प्रवास करत होते. त्यांनी सांगितले की, “ट्रेनचा वेग वाढताच ती अचानक जोरजोरात हेलकावे खाऊ लागली. काही सेकंदातच आमचा डबा वरच्या बाजूने उसळला आणि जोरात आपत्कालीन ब्रेक लागले. ब्रेक लागताच लोकांचे लॅपटॉप, बॅगा आणि एअरपॉड्स पुढे फेकले गेले.”

रॉब यांनी पुढे सांगितले की, ट्रेन थांबण्यापूर्वी रुळांवरून बऱ्याच अंतरापर्यंत घसरत गेली आणि मागच्या बाजूने प्रचंड धूर व धुळीचे लोट आत येऊ लागले. जेव्हा त्यांनी मागे वळून पाहिले तेव्हा मागचा भाग पूर्णपणे उघडा झाला होता आणि मागचा डबा उलटून थेट शेतात पडला होता. खिडक्यांच्या काचा फुटल्याने अनेक प्रवाशांच्या डोक्याला आणि अंगाला गंभीर दुखापती झाल्या होत्या.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Donald Trump: व्हाईट हाऊसने ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत खोटे सांगितले? हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जोनाथन रायनर यांचा मोठा दावा

उष्णतेमुळे रुळांना तडे? तपासासाठी चौकशी कमिटी स्थापन

ब्रिटनमध्ये सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू असून तापमानाचा पारा ३० अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. अतिउष्णतेमुळे रेल्वेचे लोखंडी रूळ प्रसरण पावतात (Rail Buckling) आणि वाकतात. प्राथमिक अंदाजानुसार, उष्णतेमुळे रुळांमध्ये निर्माण झालेला दोष या अपघातास कारणीभूत ठरला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तथापि, ‘रेल अपघाती तपास शाखा’ (RAIB) या घटनेची तांत्रिक पाहणी करत असून अपघाताचे अचूक कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

या भीषण अपघातामुळे ससेक्स आणि ब्राइटन मार्गावरील सर्व रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत झाल्या आहेत. नॅशनल रेलने प्रवाशांना या मार्गावरील प्रवास टाळण्याचा इशारा दिला आहे. ब्रिटनच्या परिवहन सचिव हायडी अलेक्सायंडर (Heidi Alexander) यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून बाधित प्रवाशांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

Web Title: Britain high speed train derails lewes east sussex carriages overturn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • England
  • High Speed Train
  • World news

संबंधित बातम्या

Breaking News : Oracle च्या गोंधळाने AI बूमला धक्का; डेटा सेंटर क्षेत्राच्या तेजीचा नाजूक चेहरा समोर
1

Breaking News : Oracle च्या गोंधळाने AI बूमला धक्का; डेटा सेंटर क्षेत्राच्या तेजीचा नाजूक चेहरा समोर

Spain News : स्पेनच्या लेइदा शहरात बुरखा-नकाबवर बंदी; चेहरा झाकल्यास €750 पर्यंत दंड
2

Spain News : स्पेनच्या लेइदा शहरात बुरखा-नकाबवर बंदी; चेहरा झाकल्यास €750 पर्यंत दंड

US China -चीन-अमेरिकेतील व्यापारयुद्धाला ब्रेक? ३० अब्ज डॉलरच्या शुल्क कपातीवर सहमती; AI वरही चर्चा
3

US China -चीन-अमेरिकेतील व्यापारयुद्धाला ब्रेक? ३० अब्ज डॉलरच्या शुल्क कपातीवर सहमती; AI वरही चर्चा

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
4

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.