britain mass rally elon musk statement tommy robinson
लंडनमध्ये झालेल्या स्थलांतरविरोधी रॅलीत लाखो लोकांचा सहभाग, टॉमी रॉबिन्सन नेतृत्वात आंदोलन.
एलोन मस्क यांनी “लढा नाहीतर मरा” असे वादग्रस्त विधान करून राजकीय वातावरण तापवले.
ब्रिटनमधील या असंतोषाची तुलना नेपाळ व फ्रान्समधील अराजक परिस्थितीशी केली जात आहे.
ब्रिटनमध्ये स्थलांतरविरोधी चळवळीने जोर धरला असून लंडनच्या रस्त्यावर शनिवारी (१३ ऑगस्ट) लाखो लोक उतरले. उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते टॉमी रॉबिन्सन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या विशाल रॅलीने सरकारला थेट आव्हान दिले. परंतु खऱ्या अर्थाने वाद निर्माण झाला तो अब्जाधीश उद्योगपती एलोन मस्क यांच्या विधानामुळे. त्यांनी निदर्शकांना उद्देशून म्हटले “तुमच्याकडे फक्त दोनच मार्ग आहेत, लढा नाहीतर मरा.”
एलोन मस्क यांनी स्थलांतराच्या वाढत्या लोंढ्यामुळे ब्रिटन संकटात सापडल्याचा दावा केला. ते म्हणाले, “या धोरणामुळे देशाचा विनाश होईल. हिंसेची आग थांबवण्याचा मार्ग नाही. म्हणून लढण्यासाठी तयार राहणे हाच एकमेव पर्याय आहे.” एवढ्यावरच न थांबता त्यांनी पंतप्रधान केयर स्टारमर यांच्या सरकारला तातडीने पदच्युत करण्याची मागणी केली. “संसद बरखास्त करून नव्याने निवडणुका घ्याव्यात,” असे मस्क ठामपणे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने रॅलीत उत्साह तर वाढला, पण राजकीय वर्तुळात चिंता पसरली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Kumari Devi : नेपाळची शक्तिदायिनी कुमारी देवी; आजही एक आलौकिक रहस्य, जिने आधीच वर्तवले होते देशाचे भविष्य
रॅलीदरम्यान “आम्हाला आमचा देश परत हवा आहे” अशा घोषणा देण्यात आल्या. काही ठिकाणी निदर्शक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याचेही वृत्त आहे. इंग्लिश डिफेन्स लीग (EDL) शी संबंधित असलेले टॉमी रॉबिन्सन हे ब्रिटनमध्ये स्थलांतरविरोधी चेहरा मानले जातात. त्यांच्या नेतृत्वाखालील या चळवळीला काहींनी “अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आंदोलन” म्हटले, तर इतरांनी ती थेट स्थलांतरविरोधी मोहिम असल्याचे सांगितले.
“You either fight back, or you die. You either fight back, or you die. And that’s the truth.”
Elon Musk addresses Tommy Robinson and millions of British patriots in London at Unite the Kingdom. pic.twitter.com/46INJXP59i
— Ian Miles Cheong (@stillgray) September 13, 2025
credit : social media
ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या असंतोषाची तुलना नेपाळ व फ्रान्समधील अलीकडील आंदोलनांशी केली जात आहे. नेपाळमध्ये बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि राजेशाही पुनरागमन यासारख्या मुद्द्यांवर तरुणांनी जोरदार आंदोलन केले. त्याचप्रमाणे फ्रान्समध्ये सरकारच्या कायदे व आर्थिक धोरणांविरोधात जनतेने रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. सुरुवातीला शांततेत सुरू झालेले हे आंदोलन नंतर हिंसक झाले. पोलिस व निदर्शकांमध्ये संघर्ष, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड आणि जखमींच्या संख्येत वाढ अशी परिस्थिती निर्माण झाली.
ब्रिटनमधील स्थलांतराचा प्रश्न हा केवळ सामाजिक नसून थेट राजकीय संकटात बदलत चालला आहे. आर्थिक ताण, सांस्कृतिक बदल आणि सुरक्षा धोके या सर्वांचा दाखला देत विरोधक सरकारवर हल्लाबोल करत आहेत. एलोन मस्कसारख्या जागतिक उद्योगपतीने थेट सरकारविरोधी विधान केल्याने हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावरही गाजू लागला आहे.
या आंदोलनानंतर ब्रिटनसमोर काही ठोस प्रश्न उभे राहिले आहेत
सरकार स्थलांतर धोरणात बदल करेल का?
विरोधकांना सत्ता परिवर्तनाचा मार्ग मोकळा होईल का?
की नेपाळ आणि फ्रान्सप्रमाणे येथेही हिंसक अराजकता उसळेल?
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Tariff War : ‘आम्ही युद्धाचा कट रचत…’ अमेरिकेच्या टॅरिफ दादागिरीवर आता ड्रॅगन चवताळला
एकीकडे लोकशाहीत आंदोलन करणे हा नागरिकांचा हक्क मानला जातो, परंतु “लढा नाहीतर मरा” अशा शब्दांत आंदोलनाला उत्तेजन देणे हा लोकशाहीच्या चौकटीबाहेरचा भाग आहे. एलोन मस्क यांचे विधान केवळ ब्रिटनपुरते मर्यादित न राहता, संपूर्ण युरोपमध्ये स्थलांतरविरोधी भावना आणखी पेटवू शकते, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.