Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Modi-Trump मैत्रीचा मास्टरस्ट्रोक! इकडे टॅरिफ कमी अन् जयशंकर थेट वॉशिंग्टनमध्ये; भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधाना नवी दिशा

India US Bilateral Relation : भारताचे परराष्ट्र मंत्री अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर पोहोचले आहे. अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी करताच दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी चर्चेचे नियोजन केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 03, 2026 | 02:38 PM
S. Jaishankar on America Visit

S. Jaishankar on America Visit

Follow Us
Follow Us:
  • परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अमेरिकेच्या दौऱ्यावर
  • महत्वपूर्ण खनिजे आणि द्विपक्षीय व्यापारावर होणार चर्चा
  • भारतावरील टॅरिफ कमी होताच अमेरिकेशी धोरणात्मक संबंधांना नवी दिशा
S. Jaishankar on America Visit : वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिकेत रखडेलेला व्यापार करार आता पूर्ण होताना दिसत आहे. सोमवारी (०२ फेब्रुवारी) मध्यरात्री अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावरील टॅरिफ कमी केले आहे. यामुळे भारताच्या अनेक महत्वपूर्ण क्षेत्रातील व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान या निर्णयानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) थेट वॉशिंग्टन दौऱ्यावर पोहोचले आहेत. येथे ते अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची भेट घेणार असून द्विपक्षीय संबंधावर आणि महत्वपूर्ण खनिज सहकार्यावर, तांत्रिक आणि आर्थिक सुरक्षा वाढविण्यावर चर्चा करणार आहेत. ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यात झालेल्या संवादानंतर जयशंकर याचा हा दौरा होत असून याला अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे.

India-US Trade Deal : ट्रम्पचा राग निवळला अन् व्यापाऱ्यांचा आला सुवर्णकाळ; भारतातील ‘या’ क्षेत्रांना होणार फायदा

भारत-अमेरिका द्विपक्षीय चर्चा

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ४ फेब्रुवारीपर्यंत अमेरिकेत असणार आहेत. यावेळी राजधानी वॉशिंग्टन येथे मंगळवारी (०३ फेब्रुवारी) पहिली द्विपक्षीय बैठक घेतील. या बैठकी दोन्ही देशांतील प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर अनेक मुद्यांवरही चर्चा होणार आहे. यामध्ये रशिया युक्रेन युद्ध, मध्य पूर्वेतील सद्य परिस्थिती, परस्पर आर्थिक आणि धोरणात्म सहकार्यावरही चर्चा होणार आहे.

तसेच बुधवारी (०४ फेब्रुवारी) दुसरी द्विपक्षीय बैठक होणार आहे. यामध्ये महत्वाच्या खनिजांवर चर्चा होईल. भविष्यातील खनिज पुरवठा वाढवणे, धोरणात्मक सहकार्याला बळकटी देणे यांसारख्या विषयांवर सविस्तर चर्चा केली जाईल. यावेळी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स देखील सहभागी होण्याची शक्यता आहे.

ट्रम्प-मोदी चर्चेचा परिणाम

ही उच्चस्तरीय बैठक अध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील फोन संभाषणानंतर होत आहे. या संभाषणात दोन्ही नेत्यांनी नव्या व्यापार कराराची घोषणा केली होती. सुरुवातील अमेरिकेने भारतावर ५०% टॅरिफ लादले होते. परंतु पंतप्रधान मोदींशी झालेल्या चर्चेनंतर आणि व्यापाराच्या घोषणेनंतर हे टॅरिफ कमी करण्यात आले आहे. सध्या अमेरिकेने भारतावर १८% टॅरिफ लादले आहे. यामुळे उच्चस्तरीय आणि द्विपक्षीय बैठकांना अधिक वेग आला आहे. यामुळेच जयशंकर यांचा दौरा अत्यंत महत्वपूर्ण आणि सकारात्मक पाउल मानला जात आहे. यामुळे दोन्ही देशांतील व्यापार उद्दिष्ट्ये स्पष्ट होतील.

मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील Tariff घटवले, PM Modi सह फोनवर बोलल्यानंतर Donald Trump ने केली घोषणा

💡

Frequently Asked Questions

  • Que: परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अमेरिकेच्या दौऱ्यावर का गेले आहे?

    Ans: परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अमेरिकेशी द्विपक्षीय संबंधावर आणि महत्वपू्ण खनिजांवर चर्चेसाठी अमेरिकेला गेले आहेत.

  • Que: एस. जयशंकर अमेरिकेत मार्को रुबियो यांच्याशी कोणत्या मुद्यांवर चर्चा करणार आहेत?

    Ans: एस. जयशंकर अमेरिकेत मार्को रुबियो यांच्याशी द्विपक्षीय संबंधावर आणि महत्वपूर्ण खनिज सहकार्यावर, तांत्रिक आणि आर्थिक सुरक्षा, प्रादेशिक सहकार्य आणि काही आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा करणार आहेत.

  • Que: एस. जयशंकर यांचा अमेरिका दौरा महत्वाचा का मानला जात आहे?

    Ans: अलीकडेच पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष ट्रम्प यांच्या चर्चा झाल्यानंतर व्यापाराची मोठी घोषणा करण्यात आली होती. तसेच भारतावरली टॅरिफही कमी झाले होते. यामुळे द्विपक्षीय व्यापार सहकार्या वाढविण्यासाठी जयशंकर याचा अमेरिका दौरा महत्वाचा मानला जात आहे.

Web Title: India us trade deal s jaishankar on america visit to strengthen bilateral relations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • narendra modi
  • S. Jaishankar
  • Tarrif

संबंधित बातम्या

UNGA 2026 : युद्धाच्या छायेत मोठी राजनैतिक घडामोड; UN महासभेत ट्रम्प-इराण राष्ट्राध्यक्षांची होणार भेट? जगाचे लक्ष न्यूयॉर्ककडे
1

UNGA 2026 : युद्धाच्या छायेत मोठी राजनैतिक घडामोड; UN महासभेत ट्रम्प-इराण राष्ट्राध्यक्षांची होणार भेट? जगाचे लक्ष न्यूयॉर्ककडे

S. Jaishankar UNGA Speech: संयुक्त राष्ट्रांच्या 81 व्या महासभेत एस. जयशंकर मांडणार भारताची भक्कम भूमिका; ‘या’ दिवशी होणार भाषण
2

S. Jaishankar UNGA Speech: संयुक्त राष्ट्रांच्या 81 व्या महासभेत एस. जयशंकर मांडणार भारताची भक्कम भूमिका; ‘या’ दिवशी होणार भाषण

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय
3

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय

Indian Aarmy : भारतीय सैन्याच्या प्रशिक्षित श्वानांचा धडकी भरवणारा युद्ध अभ्यास; श्वानांचे कौशल्य पाहून अमेरिकन सैन्य थक्क!
4

Indian Aarmy : भारतीय सैन्याच्या प्रशिक्षित श्वानांचा धडकी भरवणारा युद्ध अभ्यास; श्वानांचे कौशल्य पाहून अमेरिकन सैन्य थक्क!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.